मुंबई : गेल्या महिन्याभरात मुंबईतील कोरोना रुग्णवाढ नियंत्रणात ठेवण्यात यश आल्याचे सांगण्यात येते. राज्यातील रुग्णांना आकडा भरमसाट वाढत असताना मुंंबईतील रुग्णवाढ 800 ते 1200 च्या दरम्यान ठेवण्यात यश आल्याचा दावा राज्य टास्क फोर्सच्या सदस्या मनीषा म्हैसकर यांनी केला आहे.
राज्यातील कोरोना बधितांचा आकडा दररोज वाढत असून एका दिवसातील रुग्णांचा सर्वाधिक 7,862 वर गेला आहे. राज्यात दररोज सरासरी 4 हजार ते 6 हजार रुग्ण सापडत आहेत. या तुलनेत मुंबईचा आकडा नियंत्रणात ठेवण्यात यश आले आहे. गेल्या महिन्याभरात मुंबईतील रुग्णांचा आकडा 800 ते 1200 च्या दरम्यान ठेवण्यात यश आले असल्याचे म्हैसकर यांनी आपल्या फेसबुक पोस्टमधून सांगितले आहे.
मोठी बातमी : कोरोना व्हायचा तेव्हा होईल, पण पिण्याच्या पाण्यातील आळ्यांमुळे नागरिकांचा जीव धोक्यात...
मुंबईतील रुग्णवाढीचा दर हा महिन्याभरापूर्वी 8 टक्क्यांवर गेला होता. तो आता 1.54 टक्क्यांवर आला आहे. मुंबईतील सर्वाधिक रुग्णासंख्या असलेल्या वॉर्डमधील रुग्णवाढीचा दर हा 2 टक्क्यांच्या आसपास आहे. 3 जून रोजी मुंबईतील रुग्णसंख्या ही 43,262 इतकी होती तर 8 जुलै रोजी 87,513 इतकी म्हणजे दुपट झाली. रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी वाढला असून तो 35 दिवसांवर गेला आहे.
मुंबईतील रुग्णालयांतील बेडची संख्या 17 हजाराने वाढवण्यात आली आहे. 7 हजार बेड, 240 आयसीयू तसेच 100 व्हेंटिलेटर रिकामे असल्याचे ही सांगण्यात येते. म्हैसकर यांनी याचे श्रेय मनपा आयुक्त इकबालसिंह चहेल यांना दिले असून 'चेस द व्हायरस,' 'रिच आउट टू द पेशंट,' 'एव्हरी लाईफ मॅटर,' हे सूत्र राबवल्यामुळे हे यश मिळाले असल्याचे ही त्या म्हणाल्या.
कोरोना संसर्गाशी दोन हात करत असतांना आपण यातून बरेच काही शिकणे गरजेचे असल्याचे ही त्या म्हणतात. कोरोना वर अद्याप कोणतेही ठोस औषध सापडलेले नाही, त्यामुळे आपल्या या विषाणू सोबतच जगावे लागणार आहे. त्यामुळे आपण स्वतावर काही बंधने घालणे महत्वाचे असून मॉल, सिनेमा, थेटर, शॉपिंग, परदेशी पर्यटन, सलून, जिम यांसारख्या गोष्टी टाळायला हव्यात असे त्या म्हणाल्या. कोरोनावर कोणतेही औषध उपलब्ध नसल्याने शाससनाने आखून दिलेल्या निर्देशांचं पालन करणे आवश्यक असल्याचे ही त्या शेवटी म्हणाल्या.
( संपादन - सुमित बागुल )
good job mumbai corona in mumbai is under control but not yet fully gone
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.