Mumbaikars Social-Media
मुंबई

मुंबईकरांना दिलासा; कोरोनाचा रिकव्हरी रेट 90 टक्क्यांवर

मार्च महिन्याच्या मध्यानंतरची ही एका दिवसातील सर्वात कमी रुग्णसंख्या ठरली

मिलिंद तांबे

मुंबईत आज मार्चनंतरची एका दिवसातील सर्वात कमी रुग्णसंख्या

मुंबई: मुंबईकरांसाठी दिलासादायक बातमी असून कोरोनाचा रिकव्हरी रेट 90 टक्क्यांवर गेला आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यातील कोरोना (Coronavirus) प्रादुर्भावाचे मुख्य केंद्र ठरलेल्या मुंबईत (Mumbai) कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने कमी होत आहे. गेल्या 24 तासांत मुंबईत 2 हजार 554 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. मार्च महिन्याच्या मध्यानंतरची ही एका दिवसातील सर्वात कमी रुग्णसंख्या ठरली आहे. कोरोनाची दुसरी लाट (Second Wave) अधिक जीवघेणी ठरली. एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला मुंबईत दिवसाला साधारण 10 हजार नवे कोरोना रुग्ण आढळत होते. त्यामुळे रुग्णालयांमध्ये भीषण स्थिती उद्भवली होती. ऑक्सिजनअभावी (Medical Oxygen) अनेक रुग्णांना अन्यत्र हलवावे लागल्याचे प्रकारही घडले होते. मात्र, गेल्या काही दिवसांत यामध्ये टप्प्याटप्प्याने घट होत हा आकडा आता 2500 येऊन स्थिरावला आहे. हे मुंबईतील परिस्थिती सुधारत असल्याचे द्योतक आहे. (Good News for Mumbaikars as Corona Patients Recovery Rate Increased)

मुंबईत ड्राइव्ह इन लसीकरण

मुंबई महानगरपालिकेने ज्येष्ठ आणि दिव्यांग व्यक्तींच्या लसीकरणासाठी दादरमधये विशेष सोय केली आहे. दादरच्या कोहिनूर पार्किंग लॉटमध्ये ड्राईव्ह इन व्हॅक्सिनेशन सुरु करण्यात आले आहे. मंगळवारपासून या उपक्रमाचा शुभारंभ झाला त्यानंतर दिवसभरात 227 वाहनांमधून आलेल्या 417 ज्येष्ठ आणि दिव्यांगांचे लसीकरण करण्यात आले.

कोरोनाबाधितांची वारंवार टेस्ट नको

कोरोना काळात टेस्ट करणाऱ्या प्रयोगळशाळांवर प्रचंड ताण पडत आहे. त्यामुळे हा ताण कमी करावा यासाठी आरसीएमआरने कोविड टेस्ट संदर्भात महत्त्वपूर्ण सूचान जारी केल्या आहेत. "आंतरराज्यीय प्रवास करताना आता प्रवाशांना आता आरटीपीसीआर टेस्ट करण्याची आवश्यकता नाही. यातून प्रयोगशाळांवरील भार उलट कमी होईल. त्यातूनच कोरोना संक्रमणाला रोखता येईल", असं आरसीएमआरने म्हटलं आहे.

टेस्टिंगविषयी नेमक्या गाईडलाईन्स काय?

1) ज्या लोकांचा रिपोर्ट एकदा कोरोना पॉझिटिव्ह आला आहे, त्यांनी पुन्हा आरटीपीसीआर टेस्ट करु नये.

2) कोरोनापासून बरं झाल्यानंतर पुन्हा आरटीपीसीआर टेस्ट करण्याची आवश्यकता नाही.

3) आंतरराज्यीय प्रवास करणाऱ्यांसाठी आता आरटीपीसीआर टेस्ट करण्याती आवश्यकता नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amol Javle Won Raver Assembly Election 2024 Result Live: रावेर विधानसभा मतदार संघातून अमोल जावळे विजयी

Vaijapur Assembly Election 2024 Result Live: वैजापुरात शिवसेना विरुद्ध शिवसेना लढतीत रमेश बोरनारे यांनी मारली बाजी

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates : डॉ. हिकमत उढाण यांचा 2309 मतांनी विजय, सहाव्यांदा टोपेंचा विजय रोखला

Gangapur Assembly Election 2024 Result Live: भाजपचे प्रशांत बंब विजयी, सतिश चव्हाणांवर केली मात

Tanaji Sawant won Paranda Assembly Election 2024 : परांडा मतदारसंघात तिरंगी लढाईत तानाजी सावंत तानाजी सावंत यांनी मारली बाजी

SCROLL FOR NEXT