Corona Fight Corona Fight
मुंबई

मुंबईला दिलासा! झोपडपट्टी परिसरात 'कंटेन्मेंट झोन'मध्ये घट

मुंबईला दिलासा! झोपडपट्टी परिसरात 'कंटेन्मेंट झोन'मध्ये घट सील केलेल्या मजल्यांची संख्या मात्र 1,800 हून जास्त Good News for Mumbaikars as Number of Containment Zones decreased in slum areas and buildings vjb 91

मिलिंद तांबे

मुंबई: शहरातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या नियंत्रणात आली आहे. त्यामुळे कंटेन्मेंटच्या संख्येतदेखील घट झाली आहे. झोपडपट्टी आणि चाळींच्या परिसरात केवळ तीन तर इमारती परिसरात 62 'कंटेन्मेंट झोन' आहेत. शनिवारी 424 नवे कोरोना बाधित रुग्ण तर 9 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. मुंबईत कोरोना संसर्ग वेगाने नियंत्रणात येत असल्याचे दिसते. झोपडपट्टी परिसरात असणारे 3 कंटेन्मेंट झोन हे एस, आर दक्षिण आणि एम पूर्व विभागात आहेत. आतापर्यंत 2,791 कंटेन्मेंट झोन हटवण्यात आले आहेत. (Good News for Mumbaikars as Number of Containment Zones decreased in slum areas and buildings vjb 91)

इमारत परिसरात 62 'कंटेन्मेंट झोन' असून सर्वाधिक 'कंटेन्मेंट झोन' हे के पश्चिम विभागात 15 त्या खालोखाल एस 10, एम पूर्व 8, जी उत्तर 7, डी 5, एम पश्चिम 4 तर पी उत्तर, एन, जी दक्षिण, एफ दक्षिण, ई विभागात प्रत्येकी दोन 'कंटेन्मेंट झोन' आहेत. 66,080 कंटेंटमेंट झोन शिथिल झाले आहेत. झोपडपट्टी परिसरात इमारतींच्या तुलनेत जरी कमी 'कंटेन्मेंट झोन' असले तरी त्यातील लोकांची संख्या ही इमातींमधील लोकांपेक्षा अधिक आहे. झोपडपट्टी परिसरातील 3 'कंटेन्मेंट झोन'मध्ये 5 हजार घर तर 25 हजार लोकांचा समावेश आहे. तर सोसायट्यांमधील 62 'कंटेन्मेंट झोन'मध्ये 4 हजार घर आणि 16 हजार लोकांचा समावेश आहे.

सील केलेल्या मजल्यांची संख्या मात्र मोठी असून 1,810 मजले सील करण्यात आले आहेत. आर एस विभागात सर्वाधिक 205 मजले सील झाले आहेत. सील करण्यात आलेल्या मजल्यांवर 73 घर असून त्यात 2 लाख 77 हजार लोकं वास्तव्यास आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BMC मध्ये कोट्यवधींचा घोटाळा, RTIकडून खुलासा, ट्विट करत काँग्रेस नेत्याचे महायुतीवर टीकास्त्र

Shri Thanedar: ट्रम्प लाट असूनही मराठमोळ्या नेत्याने उधळला विजयाचा गुलाल! दुसऱ्यांदा बनले अमेरिकेचे खासदार, कोण आहेत श्री ठाणेदार ?

"तो सेटवर खूप..." अक्षय कुमारच्या सहकलाकाराचा खळबळजनक खुलासा ; "त्याच्या दोन-तीन गर्लफ्रेंड्स..."

USA Election 2024: राष्ट्राध्यक्ष बनल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा डान्स व्हिडिओ व्हायरल! सोशल मीडियावर मिम्सचाही पाऊस

Latest Marathi News Updates live: महाविकास आघाडीच्या सभेत जयस्तुते गाण्याच सादरीकरण

SCROLL FOR NEXT