मुंबई

मुंबईकरांसाठी 'गुड-न्यूज'! आता मालाडमध्येही जंबो कोविड सेंटर

2 हजार 170 बेड्सने सुसज्ज; दररोज 15 लाख लसीकरणाची शासनाची तयारी

विराज भागवत

2 हजार 170 बेड्सने सुसज्ज; दररोज 15 लाख लसीकरणाची शासनाची तयारी

मुंबई: तिसऱ्या संभाव्य लाटेची शक्यता असताना आपल्याला अधिक सावध राहिले पाहिजे, जगात इतरत्र कोरोनाच्या डेल्टा प्लसचा संसर्ग परत वाढत असून आपल्याकडे सध्या रुग्ण संख्या घटत असली तरी आरोग्याचे नियम काटेकोरपणे पाळणे अतिशय महत्वाचे आहे असा संदेश देत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मालाडच्या जंबो कोविड सेंटरचे लोकार्पण केले. शासनाची दररोज 15 लाख लसीकरणाची तयारी असल्याचेही यावेळी स्पष्ट करण्यात आले. MMRDA ने मालाड येथे आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करीत उभारलेल्या समर्पित कोविड रुग्णालयाचे हस्तांतरण आज मुंबई महानगरपालिकेला करण्यात आले. त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. (Good News for Mumbaikars Malad Jumbo Covid Care Center handed over to Mumbai BMC by CM Uddhav Thackeray)

सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या कार्यक्रमात नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, अल्पसंख्यांक विकास मंत्री नवाब मलिक, परिवहन मंत्री अनिल परब, मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख, मुंबई उपनगरचे पालकमंत्री आदित्य ठाकरे, महापौर किशोरी पेडणेकर, मुंबई महानगरपालिका आयुक्त इकबाल सिंह चहल, महानगर आयुक्त एस के श्रीनिवासन उपस्थित होते.

"कोरोनाची दुसरी लाट ओसरली नसून सध्या जरी बेडस रिकामे दिसत असले तरी दुसरी लाट परत उलटू नये म्हणून आपल्याला गर्दी टाळणे, मास्क घालणे हे नियम कटाक्षाने पाळावे लागतील. पुढच्यास ठेच , मागचा शहाणा या म्हणीप्रमाणे आपण जगभर कोरोनाची लाट परत उसळत आहे ते पाहून सावध राहावे लागेल. पहिल्या लाटेच्या वेळेस आपण बीकेसी येथे देशातले पहिले फिल्ड रुग्णालय विक्रमी वेळेत उभारले. आपण आरोग्य सुविधांच्या उभारणीत आणि नागरिकांच्या आरोग्याचे हित जोपासताना कोणतीही उणीव भासू देणार नाही", असे मुख्यमंत्री म्हणाले. तसेच, मुख्यमंत्र्यांनी दररोज 15 लाख लसी देण्याची तयारी असल्याचेही स्पष्ट केले.

मालाडच्या कोविड जंबो कोविड सेंटर आणि इतर नव्या योजनांबद्दल महत्त्वाची माहिती-

• या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर सध्याच्या कोविड सेंटर्समधील बेडची संख्या वाढवण्यासोबतच चार नवीन कोविड सेंटरही सुरु करणार असून त्यापैकीच एक म्हणजे मालाडचे जम्बो कोविड सेंटर. या सेंटरमध्ये २,१७० बेडस् आहेत. त्यात जवळपास ७० टक्के म्हणजेच १ हजार ५३६ ऑक्सिजन बेड्स तर १९० आयसीयू बेड्स आहेत. लहान मुलांसाठी २०० ऑक्सिजन पेडियाट्रिक बेड्स आणि ५० पेडियाट्रिक आयसीयू बेड्स आहेत.

• मालाड जम्बोसह दुसऱ्या टप्प्यामध्ये कांजूरमार्ग, सायन, वरळी रेसकोर्स हे नवीन जम्बो सेंटर देखील सुरु करण्यात येणार आहेत. नेस्को, रिचर्डसन अँड क्रूडास भायखळा आणि एनएससीआय मधील बेडची संख्या वाढवली जात आहे.

• जम्बो कोविड सेंटर्सच्या दुसऱया टप्प्यामध्ये पहिल्या टप्प्यापेक्षाही अधिक म्हणजे ८,३२० इतके बेड उपलब्ध होत आहेत. यात ७० टक्के म्हणजे ५, ९८६ ऑक्सिजन बेड तर १,१४० आयसीयू बेड आहेत. लहान मुलांसाठी स्वतंत्र असे ६०० ऑक्सिजन व १५० आयसीयू बेड आहेत.

• पहिला आणि दुसरा असे दोन्ही टप्पे मिळून जम्बो कोविड सेंटर्समधील एकूण बेड संख्या आता १५ हजार ६२७ होते आहे. त्यात ९,१९३ ऑक्सिजन बेड, १,५७२ आयसीयू बेड आहेत.

• यामध्ये लहान मुलांसाठी एकूण १,२०० ऑक्सिजन पेडियाट्रिक बेड आणि १५० पेडियाट्रिक आयसीयू बेड उपलब्ध असतील.

• जम्बो सेंटर्सच्या दुसऱया टप्प्यामध्ये आपण ऑक्सिजन बेड, आयसीयू बेड आणि पेडियाट्रिक बेडची संख्या अधिकाधिक असेल, यावर भर दिला आहे.

• जम्बो सेंटर्सच्या संख्येमध्ये जर आपण महानगरपालिकेची प्रमुख रुग्णालये, उपनगरीय रुग्णालये, सेव्हन हिल्स हॉस्पिटल यांची बेरीज केली तर आता एकूण बेडसची संख्या ही १९ हजार ९२८ म्हणजे जवळपास २० हजार इतकी होते आहे.

• पहिल्या व दुसऱ्या लाटेमध्ये मिळून आतापर्यंत सुमारे ७७ हजारांपेक्षा अधिक रुग्णांना या जम्बो कोविड सेंटरमध्ये उपचार झाले आहेत.

• जम्बो कोविड सेंटर्सच्या पहिल्या टप्प्यामध्ये बीकेसी कोविड सेंटर, गोरेगाव नेस्को कोविड सेंटर, वरळी एनएससीआय संकूल, मुलूंड रिचर्डसन ऍण्ड क्रूडास, भायखळा रिचर्डसन ऍण्ड क्रूडास आणि दहिसर जम्बो कोविड सेंटर असे प्रमुख सहा कोविड सेंटर सुरु.

• या ६ जम्बो कोविड सेंटर्समध्ये मिळून ७ हजार ३०७ बेडस् आहेत. ज्यात ३ हजार २०७ ऑक्सिजन बेड तर ४३२ आयसीयू बेड आहेत. सोबत लहान मुलांसाठी ६०० बेडदेखील आहेत.

• संभाव्य तिसऱया लाटेमध्ये लहान मुलांना देखील कोविडची बाधा होवू शकते, हे लक्षात घेऊन लहान मुलांसह नवजात बाळांसाठी स्वतंत्र व जास्तीत जास्त बेड उपलब्ध करणे आवश्यक आहे. यामध्ये जवळपास ११ हजार बेड हे ऑक्सिजन सह तर २,३४८ आयसीयू आहेत.

• सोबतच, लहान मुलांसाठी १,५०० ऑक्सिजन पेडियाट्रिक बेड आणि २३० पेडियाट्रिक आयसीयू बेड उपलब्ध असतील. नवजात बाळांसाठी ६० बेडदेखील यामध्ये बनविण्यात आले आहेत.

• कोविड-१९ विषाणूचा प्रादुर्भाव सुरु झाल्यापासून आतापर्यंत (दि.२७ जून २०२१) मुंबईत एकूण ७ लाख २० हजार ३५६ बाधित रुग्ण आढळले. यापैकी ६ लाख ९४ हजार ०८२ (९६.३५ टक्के) रुग्ण पूर्णपणे बरे झाले आहेत.

• इतक्या मोठ्या संख्येने रुग्ण बरे होण्यासाठी नियमित रुग्णालयांसोबतच जम्बो कोविड सेंटर्सनीदेखील खऱया अर्थाने मोलाचा हातभार लावला आहे.

• मुंबईत जवळपास २० हजारावर कोविड बेड उपलब्ध आहेत. म्हणजेच बाधितांवर उपचारांसाठी पुरेशा संख्येने बेड उपलब्ध आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aheri Assembly Election Results 2024 : बापाने केला लेकीचा पराभव! अहेरी मतदारसंघात धर्मरावबाबा आत्राम यांनी मारली बाजी

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: शरदचंद्र पवार पक्षाचे विजयी उमेदवार अभिजीत पाटील यांनी जीपवर चढून दंड थोपटत विजय साजरा केला

khadakwasla Assembly Election 2024 Result Live: खडकवासलात भाजपचा विजयाचा चौकार, भीमराव तापकीर यांनी पुन्हा मारली बाजी

Rajan Naik Nalasopara Assembly Election 2024 Result : नालासोपाऱ्याचा गड भाजपचाच; राजन नाईक यांचा दणदणीत विजय

Dapoli Assembly Election 2024 Results : दापोलीत आमदार योगेश कदमांनी राखला गड; ठाकरे गटाच्या संजय कदमांचा केला पराभव

SCROLL FOR NEXT