Fresh air in Mumbai sakal media
मुंबई

मुंबईतील हवेचा दर्जा सुधारला; नागरिकांनी घेतला मोकळा श्वास

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील (Mumbai) हवेचा दर्जा खराब पातळीवर (air pollution) गेला होता. आज मात्र त्यात सुधारणा दिसून आली. मुंबईचा आजचा हवा गुणवत्ता निर्देशांक १०६ सह ‘मध्यम’ नोंदवला गेला. पीएम १० ची नोंद झाल्याने तीव्र प्रदूषणामुळे चिंताग्रस्त झालेल्या मुंबईकरांना आज मोकळा श्वास घेता (good quality air) आला. आखाती देशातून आलेल्या धुळीच्या वादळांचा फटका मुंबईला बसला होता. धुळीचे कण मोठ्या प्रमाणावर मिसळल्याने हवेचा दर्जा खालावला होता. काही ठिकाणी तीव्र प्रदूषण नोंदवले गेले होते. धुळीची वादळे शमल्यानंतरही हवेचा दर्जा सुधारलेला नव्हता.

परिणामी मुंबईकरांकडून चिंता व्यक्त होत होती. दमट हवामान आणि थंड वातावरणामुळे हवेत धुळीचे कण कायम असल्याने प्रदूषण कमी झालेले नव्हते. धुळीची वादळे शमल्यानंतर परिस्थितीत सुधारणा होईल, असे सफर संस्थेचे प्रकल्प संचालक डॉ. गुफरान बेग यांनी सांगितले होते. मात्र, त्यानंतरही हवेचा दर्जा न सुधारल्याने आवाज फाऊंडेशनने मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून चिंता व्यक्त केली होती. आता मात्र धुळीचे वादळ पूर्ण शमले आहे. थंडीचा जोर कमी झाला आहे. शिवाय वाऱ्याचा वेग वाढल्याने हवेचा दर्जा सुधारला आहे, असे बेग म्हणाले.

भांडुपमध्ये ६६ आणि वरळीत ६५ अशी समाधानकारक हवा गुणवत्ता निर्देशांकाची नोंद झाली आहे. मुंबईसह कुलाबा, मालाड, माझगाव, बोरिवली, बीकेसी, चेंबूर, अंधेरी आणि नवी मुंबई परिसरात हवा गुणवत्ता निर्देशांक मध्यम नोंदवला गेला.

परिसर एक्यूआय पीएम दर्जा
भांडुप ६६ १० समाधानकारक
वरळी ६५ १० समाधानकारक
कुलाबा ११० १० मध्यम
मालाड १९३ २.५ मध्यम
माझगाव १७६ २.५ मध्यम
बोरिवली १२४ १० मध्यम
बीकेसी १९३ २.५ मध्यम
चेंबूर १०६ १० मध्यम
अंधेरी १२२ १० मध्यम
नवी मुंबई १५२ २.५ मध्यम

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dolly Chaiwala: डॉली चायवाला भाजपचा स्टार प्रचारक! नागपूरमध्ये केला महायुतीसाठी प्रचार

SA vs IND: 23 Six, 17 Fours! जोहान्सबर्गच्या मैदानात सॅमसन-तिलकचं वादळ; भारताचं द. आफ्रिकेला तब्बल 284 धावांचं लक्ष्य

SA vs IND: संजू सॅमसनने तिसऱ्या शतकासह रचला इतिहास! तिलक वर्मानेही ठोकली सलग दुसरी Century

Assembly Elections: २४ ते ३० मतदारसंघ महत्त्वाचे! दोन्ही आघाड्यांना बंडाचा फटका बसणार,'शांती' यज्ञासाठी पळापळ सुरू

Dhruv Rathee: ध्रुव राठीचं चॅलेंज आदित्य ठाकरेंनी स्वीकारलं! ‘मिशन स्वराज’साठी शेअर केली मुद्द्यांची यादी

SCROLL FOR NEXT