मुंबई: कोरोनामुळे संपूर्ण जगात सध्या लॉकडाऊन आहे. त्यामुळे उद्योगधंदे आणि व्यवसाय प्रभावित झाले आहेत. लॉकडाऊनमुळे छोट्या आणि मध्यम स्वरूपाचे News Publishers डबघाईला आले आहेत. मात्र गुगल कंपनीनं या न्युज पब्लिशर्सची मदत करण्यासाठी मोठं आणि कौतुकास्पद पाऊल उचललं आहे.
जे छोट्या आणि मध्यम स्वरूपाचे न्युज पब्लिशर्स आहेत त्यांना गुगल आर्थिक मदत करणार आहे. त्यासाठी गुगलनं अर्ज मागवायला सुरुवात केली आहे. कोरोनामुळे न्युज पुब्लिशर्सवर आलेल्या आर्थिक संकटाला कमी करण्यासाठी गुगलनं लोकल न्यूजरूम्सना पैसे देण्याची घोषणा केली आहे. गुगल न्युज इनिशिएटिव्हच्या माध्यमातून हे पैसे देण्यात येणार आहे.
हे पैसे देण्यासाठी गुगलनं 'जर्नालिज्म रिलीफ फंड' बनवला आहे. यामध्ये लहानापासून तर मोठ्या न्युज पब्लिशर्सना गुगलकडून आर्थिक मदत केली जाणार आहे. मात्र यासाठी गुगलकडून नक्की किती पैसे दिले जाणार आहेत याची अधिकृत घोषणा करण्यात आली नाहीये.
"लॉकडाउनच्या काळात लोकांना सतत माहिती पुरवण्यामध्ये लोकल न्युज पब्लिशर्सचा मोठा वाटा आहे. मात्र लॉकडाऊनमध्ये आलेल्या आथिर्क संकटामुळे काही न्युज पब्लिशर्स डबघाईला आले आहेत. म्हणून गुगलनं त्यांना मदत करायचं ठरवलं आहे",असं गुगलचे व्हाईस प्रेसिडंट रिचर्ड यांनी म्हंटलंय.
मोठी बातमी - वरळीनंतर मुंबईतील 'या' भागांमध्ये सापडतायत कोरोना रुग्ण, तुम्ही इथं राहात असाल तर पूर्ण काळजी घ्या...
असा करा अर्ज:
हे न्युज पब्लिशर्स करू शकतात अर्ज:
Google.org कडून पत्रकारांना मदत करणाऱ्या दोन संस्थांना १ मिलियन डॉलर्स देण्यात येणार आहेत. यात इंटरनॅशनल सेंटर फॉर जर्नलिस्ट्स आणि कोलंबिया जर्नलिस्म स्कूल, डार्ट सेंटर फॉर जर्नलिज्म अँड ट्रॉमा या संस्थांचा समावेश आहे.
google to start giving journalism relief fund read how to apply
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.