Death in Fire Sakal
मुंबई

Goregaon Fire : गोरेगावात अग्नितांडव! ५० जण जखमी, ७ मृत्यू

गोरेगाव पश्चिम येथील जय भवानी या सात मजली इमारतीत पार्किंगमध्ये लागलेल्या आगीत अनेक कुटुंबे जळून खाक झाली.

सकाळ वृत्तसेवा

मुंबई - गोरेगाव पश्चिम येथील जय भवानी या सात मजली इमारतीत पार्किंगमध्ये लागलेल्या आगीत अनेक कुटुंबे जळून खाक झाली. या इमारतीच्या प्रत्येक मजल्यावर एकूण आठ कुटुंब राहतात. पार्किंग मध्ये मीटरचा स्फोट झाल्याने पहिला ते सात मजले आगीच्या धुरात दिसेनासे झाले.

तळमजला, पहिला आणि दुसर्‍या मजल्यावर राहणाऱ्या नागरिकांना याचा सर्वाधिक त्रास झाला असून धुरामुळे अनेकांना पालिकेच्या जोगेश्वरी ट्रॉमा केअर सेंटरमध्ये दाखल करण्यात आले. रात्री 1.30 च्या सुमारास आग लागल्याने नागरिकांची धावपळ झाली.

अनेक नागरिक घरात, लिफ्टमध्ये , टेरेसवर अडकले. मात्र, आग लागल्या नंतर झालेली धावपळ अनेकांच्या जीवावर बेतली. या इमारतीत वाघरी कुटुंब राहतात. त्यांनी पार्किंगमध्ये जुन्या कपड्यांची बोचकी ठेवली आहेत. आग लागल्यावर ती बोचकी देखील जळाली. या सह गॅस सिलिंडर फुटल्याने आगीचा भडका उडाला. आणि आग टेरेस पर्यत पोहोचल्याचे आगीत जीव मुठीत घेऊन धावणार्‍या २२ वर्षीय संध्या नागोशे हिने सांगितले.

२२ वर्षीय संध्या आणि तिचे पती संतोष (२५) हे याच इमारतीत ६ व्या मजल्यावर राहतात. घराचा दरवाजा उघडला तेव्हा फक्त धूर आणि अंधार होता. आणि फक्त किंचाळन्याचे आवाज येत होते. धुरामुळेच मला ही श्वास घ्यायला  त्रास झाला. मला आधी कूपरला दाखल केले होते. बरे वाटल्यावर मला इथे आणले गेले. आता पतीला एमआयसीयूत दाखल केले आहे. संतोष सर्फ एक्सल कंपनीत काम करतात आणि संध्या घरीच असतात.

चपल घ्यायला गेली आणि अडकली -

पहिल्या मजल्यावर राहणारी १८ वर्षीय तिशा चौगुले हिची परीक्षा सुरू होती. काल रात्री ही अभ्यासाची ती तयारी करत होती. आग लागली  तेव्हा कुटुंब सर्व खाली पळाले. पण, तिशा पुन्हा घरी चपल घ्यायला गेली. तिच्या कुटुंबाला वाटले की ती खाली आली पण ती चुकून दुसर्‍या घरी शिरली. जिथे धूर पसरला होता. ती तिथेच पडली आणि बेशुद्ध झाली. त्यातच तिचा जीव गेला. तिशाला रील्स बनवण्याची आवड होती.

अभ्यासात हुशार आणि घरात सर्वांची आवडती तिशा एका रात्रीत तिच्या कुटुंबाला सोडून गेली. तिशाच्या मृत्यूची बातमी अद्याप तिच्या आईला दिली नाही. कारण त्यांना ही सध्या दाखल केले आहे. तिशाची आई संजना चौगुले येणार्‍या प्रत्येकाला तिशा बदल विचारात असल्याचे तिचे वडील संजय यांनी सांगितले. या सह संजय यांची आई आक्का ताई ही सध्या रुग्णालयात दाखल आहेत.

संजय यांचा आक्रोश -

आग लागल्यावर ती विझवण्यासाठी इमारतीत पाण्याची सोय नव्हती. इमारतीच्या लादी उखडल्या आहेत. तसेच लिफ्ट आधीपासून बंद आहेत. गेल्या 15 वर्षापासुन बोअरींग चे पाणी येत आहे. प्यायला ही पाणी मिळत नाही. आग विझवण्याची कुठलीही यंत्रणा इमारतीत उपलब्ध नसल्याचा आक्रोश तिशाचे वडील आणि या इमारतीचे सचिव संजय चौगुले यांनी व्यक्त केला.

तीन तासानंतर अग्नीशमन दलाची मदत -

रात्री २ च्या सुमारास आग लागूनही तात्काळ अग्नीशमन दलाला संपर्क केला. मात्र तब्बल तीन तासानी अग्नीशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या, तोपर्यंत अनेक जण आत घुसमटले होते.

१२ वर्षांची दिया घुसमटली -

१२ वर्षीय दिया तुषमढ तिच्या कुटुंबासह एका वर्षांपूर्वी गोरेगाव मध्ये रहायला आली. जवळच्या शाळेत शिकणारी दिया खूप हुशार होती. दिया ही घरात छोटी मुलगी होती. जेव्हा आई , वडील आणि 3 बहिणी घराबाहेर गेल्या तेव्हा दियाने बहिणीचा हात सोडला आणि ती हरवली.

धुरात कोण कोणाला न दिसल्याने चुकामूक झाली. आणि दिया बेशुद्ध झाली. दियाची चुलत बहीण किरण तुषमढ हिने सांगितले की, दिया खाली कोसळली होती. तिला लोकानी पायाखाली चिरडले. तिच्या त्वचेला आणि छातीला मार लागल्याचे व्रण होते.

एकाच घरातील तिघे दाखल -

चिरायू जाधव हा शेवटच्या वर्षात शिकतो. पाचव्या मजल्यावर राहत असून त्याचे पूर्ण कुटुंब सध्या रुग्णालयात दाखल आहे. संजय जाधव, साक्षी जाधव आणि चिरायू जाधव यांची प्रकृती स्थिर आहे.

श्वसनाने नागरिक गुदमरले -

या घटनेत सर्वाधिक नागरिकांना गुदमरल्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. धुरामुळे प्रत्येकाचा जीव गुदमरला आणि आगीच्या दाहामुळे लोकांना रुग्णालयात दाखल करून घेतल्याचे ट्रॉमा केअर रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. राजेश सुखदेवे यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT