मुंबई : महाराष्ट्रात कोरोना व्हायरसनं थैमानं घातलं आहे. अशातच मुंबईतही कोरोनाबाधितांचा आकडा सर्वाधिक आहे. शनिवारी केंद्र सरकारनं पाचव्या टप्प्यातील लॉकडाऊनची घोषणा केली. लॉकडाऊनचा पाचवा टप्पा हा 1 जून ते 30 जूनपर्यंत असणार आहे. त्यात आता अटीशर्थींसह राज्यातील शासकीय कार्यालय टप्प्या टप्प्याने सुरू होणारेय. त्यामुळे सरकारी कार्यालयांसाठी नवीन मार्गदर्शक सुचना जारी करण्यात आल्या आहेत. आरोग्य खात्यानं ही नियमावली दिली आहे. यात कार्यालय आणि कर्मचाऱ्यांनी काय खबरदारी घ्यायची आहे याबाबत नियमावली जाहीर केली आहे. या नियमावलीमध्ये यामध्ये दररोज सुरक्षित वावराच्या नियमांसोबत थर्मल स्क्रिनिंग, सॅनिटायझर, मास्क वापरणं बंधनकारक असणार आहे.
सरकारनं नव्या सुचना जारी केल्या असल्या तरी कार्यालय कधीपासून सुरू होणार याबाबत अद्याप कोणताही घोषणा करण्यात आलेली नाही आहे. राज्याचे प्रधान सचिव प्रदीप व्यास यांनी नवीन गाइडलाइनची एक प्रत जाहीर केली आहे. राज्य सरकारच्या सार्वजनिक आरोग्य विभागानं काढलेल्या अधिकृत परिपत्रकाद्वारे चार टप्प्यात या मार्गदर्शक सूचना जाहीर करण्यात आल्या आहेत.
1) सरकारी कार्यालये सुरु करण्यापूर्वी त्यांमध्ये काय आवश्यक बदल करण्यात यावेत.
2) या कार्यालयांमध्ये काम करणाऱ्या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांसाठी सर्वसाधारण सूचना देण्यात आल्यात.
3) एखाद्या सरकारी कार्यालयातील अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांना कोरोनाचा संसर्ग झाल्यास काय करायचं याबाबतच्या सूचना दिल्यात.
4) कार्यालयाच्या निर्जंतुकीकरण करतानाचा कुठली खबरदारी बाळगायची याबाबत भाष्य करण्यात आलं आहे.
कार्यालयासाठी असे असतील सर्वसाधारण नियम
- कार्यालयात येणाऱ्या प्रत्येक कर्मचारी-अधिकारी आणि कामानिमित्त येणाऱ्या प्रत्येकाचे थर्मल-इन्फ्रारेड थर्मामीटरने स्क्रिनिंग करणे बंधनकारक असणार आहे.
- हवा खेळती राहण्यासाठी दार-खिडक्या उघडी ठेवावी.
- सर्व कर्मचाऱ्यांनी तीन पदरी असलेल्या मास्कचा वापर करणे बंधनकारक असणार आहे.
- तोंडाला आणि नाकाला सतत हात लावणे टाळावे. तोंड, नाक आणि डोळ्यांना हात लावू नये, जेणेकरून व्हायरसचा फैलाव रोखता येईल.
- कार्यालयात 20 सेकंदापर्यंत हॅन्डवॉश आणि साबणानं हात धुणे
- खोकला-सर्दी झालेली असेल तर टीश्यू पेपर, स्वच्छ धुतलेल्या रूमालाचा वापर करावा.
- कार्यालयात दोन कर्मचाऱ्यांमध्ये किमान तीन फुटाचे अंतर राखणे बंधनकारक असणार आहे. कर्माचाऱ्यांची बैठक व्यवस्थाही त्याप्रमाणेच करता येणार
- कार्यालयात प्रवेश करणाऱ्या अभ्यागत अर्थात कामानिमित्त जाणाऱ्या व्यक्तीने मास्क वापरणे बंधनकारक असेल.
- कार्यालयाच्या प्रत्येक प्रवेशद्वारावर सॅनिटायझरची व्यवस्था असणे बंधनकारक.
- स्वच्छतागृहात साबण, हॅण्डवॉशची व्यवस्था करणे बंधनकारक, स्वच्छतागृहाचा वापर केल्यास हात साबणाने धुणे बंधनकारक.
- लिफ्ट, बेल, बटन, टेबल-खुर्ची आणि इतर उपकरणे दिवसातून तीन वेळा 2 टक्के सोडियम हायपोक्लोराईटने स्वच्छ पुसून घ्यावी लागणार
- कॉम्प्युटर, प्रिंटर, स्कॅनर दिवसातून दोन वेळा अल्कोहल मिश्रीत सॅनिटायझरने पुसून घ्यावीत.
- कार्यालय साबण आणि पाण्याने धुवून घेणे. शौचालये दिवसातून तीनवेळा सोडियम हायपोक्लोराइट, डिटर्जंटनं साफ करण्यात यावे
- या सर्व मार्गदर्शक कार्यालयाच्या दर्शनी भागात लावणे बंधनकारक असेल.
- अधिकारी- कर्मचाऱ्यांसाठीची नियमावली खालीलप्रमाणे
- एकाच गाडीतून तीनपेक्षा अधिक लोकांनी प्रवास करणं टाळावा.
- ई-ऑफिसचा वापर जास्तीत जास्त करावा, ई-मेलवरून फाईल्स शक्यतो पाठवून द्याव्या.
- वर्क फ्रॉम होमच्या पर्यायाचा वापर अधिक करणे.
- कमीत कमी अभ्यागतांना कार्यालयात प्रवेश देण्यात यावा.
- येणाऱ्या प्रत्येकाचे स्क्रीनिंग थर्मल-इन्फ्रारेड थर्मामीटरने स्क्रिनिंग करणे बंधनकारक असणार आहे.
- मिटींग्ज शक्यतो व्हिडीओ कॉन्फरंसिंगच्या माध्यमातून घ्याव्या. प्रत्यक्ष घेण्याचे जास्त टाळावं.
- येत्या काळामध्ये ऑफिसमध्ये बसून एकत्र डबा खाणे, किंवा एकत्र जमा होणे टाळावे.
- एखाद्या कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण झाल्यास
- कर्मचाऱ्यांचे शारीरीक तापमान 100.4 डिग्रीपर्यंत असल्यास लगेचच हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात येईल.
- संबधित कर्मचाऱ्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यास 14 दिवस कार्यालयीन प्रवेश देण्यात येणार नाही. त्याबाबत आरोग्य विभागाच्या आदेशाचे पालन करावे.
- पॉझिटिव्ह व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या व्यक्तीचे जे 3 फूटापेक्षा कमी अंतरावरील आणि 15 मिनिटांपेक्षा जास्त कालावधीत असतील तर त्यांचे हाय रिस्क मध्ये वर्गीकरण करण्यात येईल.
- तीन फुटाहून जास्त अंतराने संपर्कात आलेल्यांना लो रिस्कमध्ये वर्गीकरण करावे.
- हाय रिस्क मध्ये गणना केलेल्या व्यक्तींची संस्थात्मक विलीगीकरणात रवानगी करण्यात येणार.
Government offices will start in phases, there will be rules
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.