मुंबई : दिवाळीमध्ये विविध बाजारपेठांमध्ये झालेल्या तोबा गर्दीचे परिणाम आता दिसायला सुरवात झालीये. गेले काही दिवस अगदी पाचशेच्या खाली आलेली कोरोना रुग्णसंख्या आता झपाट्याने वाढताना पाहायला मिळतेय. काल पुन्हा एकदा मुंबईतील कोरोना रुग्णांचा आकडा ९०० पार गेलाय. तर दिल्लीत कोरोनाचा कहर पाहायला मिळतोय. या धर्तीवर आता राज्याकडून महत्त्वाचे निर्बंध लादले जाण्याची शक्यता आहे. केवळ मुंबईतच नव्हे तर राज्यात आणि देशात अनेक ठिकाणी हीच स्थिती आहे. दिल्लीची वाटचाल पुन्हा एका लॉकडाऊनच्या दिशेने आहे. अशात महाराष्ट्र राज्य सरकारकडून काही कठोर पावले पुन्हा उचलली जाण्याची शक्यता आहे
महत्त्वाची बातमी : वीज बिलात सवलत न दिल्यास तीन दिवसांनी मंत्रालयात शिरणार, भाजपचा सरकारला अल्टिमेटम
एकीकडे दिवाळीत झालेली भयावह गर्दी आणि दुरीकडे देशात सुरु होणारी थंडी यामुळे मुंबईसह राज्यात तसेच देशात कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्य सरकारकडून मुंबई-दिल्ली-मुंबई विमान सेवा आणि रेल्वे सेवा बंद करण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र शासन तसा विचार करत असल्याचं समजतंय. त्यामुळे कोरोनाला आळा घालण्यासाठी, करोनाचा वाढता प्रसार अंडी धोका नजरेत ठेऊन महाराष्ट्र राज्य सरकार दिल्ली-मुंबई-दिल्ली विमानसेवा तसेस रेल्वे सेवा बंद करण्याची शक्यता आहे.
महत्त्वाची बातमी : ३१ डिसेंबरपर्यंत महापालिका, सरकारी आणि सर्व खासगी शाळा बंदच राहणार, इकबाल सिंह चहल यांचा निर्णय
पाचशेच्या खाली आलेला आकडा पुन्हा गेला नऊशेवर
दिवाळीदरम्यान बाजारांमध्ये, खरेदीसाठी झालेल्या गर्दीचा पारिणाम आता कोरोना रुग्णसंख्येत झालेल्या वाढीच्या स्वरूपात पाहायला मिळतोय. केवळ मुंबईतच नव्हे तर इतर मोठ्या शहरांमध्ये देखील हीच स्थिती आहे. मुंबईत काल कोरोनाचे 924 नवे रुग्ण सापडले असून मुंबईतील एकूण रुग्णसंख्या 2,72,449 झाली आहे. मुंबईतील कोरोना रुग्णांची हीच रुग्णसंख्या गेल्या काही दिवसांपूर्वी पाचशेच्या खाली आलेली होती. मात्र काल मुंबईत 924 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झालेली आहे.
government is planning suspend railways and domestic air service between mumbai and delhi
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.