Thane News : शिक्षण व्यवस्थेत आमूलाग्र बदल घडविण्यासाठी, सर्वांना उत्तम दर्जाचे शिक्षण देण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे केले. विद्या प्रसारक संस्था आणि संकल्प सेवा मंडळ यांच्या डी.एल.बी. डिग्री कॉलेजचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज संपन्न झाले,
त्यावेळी ते बोलत होते. यावेळी शिक्षणमंत्री दीपक केसरकर, माजी महापौर नरेश मस्के, जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, प्रांताधिकारी उर्मिला पाटील, विद्या प्रसारक संस्थेचे अध्यक्ष देवराम भोईर आदी मान्यवर उपस्थित होते.
आजच्या स्पर्धेच्या युगात प्रत्येकाला चांगले शिक्षण मिळणे, ही काळाची गरज आहे. शासन त्यादृष्टीने प्रयत्नशील आहे. ठाण्यात अनेक विकास प्रकल्प सुरू आहेत. येत्या काळात ठाण्याचा सर्वांगीण विकास होणारच, विकासाबरोबरच पर्यावरण रक्षणही होईल,
याकडेही कटाक्षाने लक्ष दिले जात आहे. विद्या प्रसारक संस्थेचे अध्यक्ष देवराम भोईर यांनी शिक्षण क्षेत्रातील १९७२ साली पाहिलेले “केजी टू पीजी” (KG TO PG) हे स्वप्न पूर्णत्वास नेण्याचा प्रयत्न निश्चित सफल होईल.
या शिक्षण संकुलामध्ये स्मार्ट क्लासरूम, कम्प्युटर लॅब, ठाण्यातील सर्वात मोठे ग्रंथालय, कॉलेज प्लेसमेंट व करियर गाईडन्स सेंटर त्याचबरोबर विधी महाविद्यालय, मास मीडिया व कम्युनिकेशन महाविद्यालय, अशी विविध महाविद्यालये सुरु होत आहेत.
गरजूंना शिक्षण देण्याचे पुण्य काम या संस्थेतून होत आहे, असेच चांगले काम करीत राहा, शासन आपल्या पाठीशी निश्चित उभे आहे, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन सुप्रसिध्द आरजे अमित काकडे यांनी केले तर विद्या प्रसारक संस्थेचे अध्यक्ष देवराम भोईर यांनी सर्व मान्यवरांचे आभार मानले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.