International Stadium sakal
मुंबई

International Stadium : बदलापुरात उभं राहतंय आंतरराष्ट्रीय पातळीवरील भव्य स्टेडियम!

आंतरराष्ट्रीय पातळीवरील वानखेडे, ब्रेबॉर्न, डी. वाय पाटील स्टेडियमच्या धर्तीवर आता ठाणे जिल्ह्यात बदलापूर शहरात भव्य असे आंतरराष्ट्रीय पातळीवरील क्रीडा स्टेडियम उभारण्यात येत आहे.

सकाळ वृत्तसेवा

- मोहिनी जाधव

बदलापूर - देशातील महत्त्वाची शहरे त्यात मुंबई शहरात असलेल्या आंतरराष्ट्रीय पातळीवरील वानखेडे, ब्रेबॉर्न, डी. वाय पाटील स्टेडियमच्या धर्तीवर आता ठाणे जिल्ह्यात बदलापूर शहरात भव्य असे आंतरराष्ट्रीय पातळीवरील क्रीडा स्टेडियम उभारण्यात येत असून, या स्टेडियमची पायाभरणी शनिवार २ मार्च रोजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांच्या हस्ते होणार असून, माजी नगराध्यक्ष राजेंद्र घोरपडे यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे बदलापुरातील क्रीडा प्रेमींना मोठी भेट शासनाच्या माध्यमातून लवकरच मिळणार आहे. त्यामुळे बदलापूर शहराला एक वेगळं स्वरुप वलय प्राप्त होणार आहे.

कुळगाव बदलापूर नगरपरिषद हद्दीतील विकास आराखडा मधील, प्रभाग क्रमांक १८ सर्व्हे क्रमांक ५९ ही डीपी मध्ये आरक्षित असलेली जागा नगरपालिकेच्या ताब्यात असून, या जागेवर भव्य असे क्रीडा स्टेडियम तयार करण्यासाठी, जिल्हा वार्षिक योजना सुवर्ण जयंती नगरोत्थान अंतर्गत, जवळपास पाच कोटींचा निधी मंजूर होणार असून, या माध्यमातून या स्टेडियमची पायाभरणी शनिवारी केली जाणार आहे.

जगभरात क्रिकेट, व फुटबॉल यांसारख्या खेळांवर प्रेम करणाऱ्या खेळाडूंची व चाहत्यांची संख्या अधिक आहे. मुंबई सारख्या शहरात असलेले वानखेडे स्टेडियम हे तर, उत्तम खेळपट्टी साठी जगप्रसिद्ध असे स्टेडियम आहे. त्या तुलनेत ठाणे जिल्ह्यात डॉ. डी. वाय. पाटील व दादोजी कोंडदेव स्टेडियम हे दोन स्टेडियम सोडले तर, ठाणे व नवी मुंबई पाठोपाठ झपाट्याने विकसित होत असलेल्या, बदलापूर शहरात स्टेडियम उभारण्यात येईल.

इतकी जागा उपलब्ध असल्याने, बदलापूर शहरात देखील हे आंतरराष्ट्रीय स्टेडियम उभारण्यासाठी, माजी नगराध्यक्ष राजेंद्र घोरपडे हे गेल्या अनेक वर्षांपासून प्रयत्नशील आहेत. त्याचबरोबर त्यांच्या या संकल्पनेला केंद्रीय राजमंत्री कपिल पाटील यांनी देखील पाठिंबा दिला असून, केंद्रीय स्तरावर प्रयत्न करुन बदलापुरात, हे आंतरराष्ट्रीय स्टेडियम उभारण्यासाठी सर्वतोपरी निधी उपलब्ध करून देण्याबाबत, कपिल पाटील यांनी आपला पुढाकार दर्शवला आहे.

त्यातच शासनाच्या मालकीची असलेल्या कात्रप येथील प्रभाग क्रमांक १८ व सर्व्हे क्रमांक ५९ ही जागा, स्टेडियमसाठी विकसित करुन भविष्यात उभ राहणार या स्टेडियममुळे, बदलापूर शहराला एक नवीन झळाळी प्राप्त होणार आहे.

त्यामुळे ठाणे जिल्ह्यात त्याचबरोबर, कर्जत तालुक्या पर्यंतच्या ग्रामीण भागात तयार होणाऱ्या खेळाडूंना, मुंबई शहरात सरावाला जाण्यापेक्षा बदलापुरातच सराव आणि त्यापाठोपाठ, पुढे जाऊन राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय सामने देखील या माध्यमातून भरवले जातील, आणि त्यातून खऱ्या अर्थाने बदलापूर शहराच्या अर्थकारणाला चालना मिळेल व बदलापूर शहर देखील देशातील, एक सुख सुविधांयुक्त शहर म्हणून गणले जाईल असा विश्वास, राजेंद्र घोरपडे यांनी व्यक्त केला आहे.

स्टेडियम चे स्वरुप कसे असणार?

सुमारे १८ एकर जागेत उभ्या राहणाऱ्या या स्टेडियम ची बांधणी ही वानखेडे स्टेडियमच्या धर्तीवर होणार असून, या ठिकाणी साधारण २० ते २५ हजार इतकी आसन व्यवस्था करण्यात येणार आहे. ज्या ठिकाणी खेळाडूंसाठी ड्रेसिंग रुम, दर्षकांसाठी वेगवेगळ्या गॅलरी, लॉबी, बसण्यासाठी आरामदायी आसन व्यवस्था, प्रसाधन गृह, खानपाण्याचा सोयी, स्वच्छता गृह, या सुविधा दिल्या जाणार आहेत.

सुरक्षेच्या दृष्टीने उच्च दर्जाची सेवा पुरवली जाणार आहे. तसेच या ठिकाणी गो ग्रीन संकल्पना अंतर्गत खेळपट्टी, जिथे क्रिकेट, फुटबॉल असे राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय सामने खेळवले जाऊ शकतील. यासाठी पार्किंग ची सोय, वॉटरप्रूफिंग, ऑरगॅनिक फर्टीलायझर चा वपर करत खेळपट्टी उभारली जाणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manipur Politics: मणिपूरमध्ये भाजप सरकार पडणार? मोठ्या पक्षानं पाठिंबा काढून घेतला, अडचणी वाढल्या!

Viral Video: तू T20 संघात राहण्यासाठी पात्र नाहीस... Babar Azam ला फॅन्सने तोंडावर अपमान करताच राग अनावर

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी पंकजा मुंडेंचे मानले जाहीर आभार ! म्हणाले, तू महाराष्ट्राच्या डोळयावरची पट्टी काढली अन् ...

फायर नहीं वाइल्ड फायर..! बहुप्रतिक्षित Pushpa 2 चा Trailer रिलीज; पण लाँचसाठी पाटणाची निवड का केली?

Baba Siddique Murder Case : बाबा सिद्दीकी हत्याकांडातील आरोपी सलमानभाई वोहरा पोलिसांच्या जाळ्यात

SCROLL FOR NEXT