commissioner Vikas Dhakane sakal
मुंबई

Ulhasnagar News : सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या पदरात पडणार दिवाळीपूर्वी ग्रॅच्युइटीच्या थकबाकीचे पैसे; आयुक्त विकास ढाकणे यांचे आश्वासन

महानगरपालिकेतून सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना निवृत्तीच्या दिवशी मिळायला हवी असलेली ग्रॅच्युइटी, सातव्या वेतन आयोगाचा फरक आणि इतर लाभांची देणी पाच-दहा वर्षांपासून थकलेली होती.

दिनेश गोगी

उल्हासनगर - मृत्यूपूर्वी ग्रॅच्युइटी, रजा रोखिकरन आणि 7 व्या वेतन आयोगाच्या फरकाची एकत्रित रकम आमच्या पदरात पडणार काय?अशी हाक देण्यासाठी शेकडो सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी दोन दिवस आंदोलन केल्यावर उल्हासनगर महानगरपालिका आयुक्त विकास ढाकणे यांनी दिवाळीपूर्वी ग्रॅच्युइटीच्या थकीत रकमेपैकी दरमहा 50 हजार रुपये देण्याचे आश्वासन दिले आहे.

त्यामुळे सेवनिवृत्तांनी कायद्याने वागा लोकचळवळचे राज असरोंडकर, प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. स्वप्निल पाटील यांच्या नेतृत्वाखाली केलेले मृत्यूपूर्वीच्या आंदोलनाच्या लढ्याला यश आले आहे. तसेच आयुक्त विकास ढाकणे यांनी सोमवारी 23 तारखेला 7व्या वेतन आयोगाच्या फरकाच्या रकमेबाबत बैठक बोलावली असून त्यात सकारात्मक निर्णय होण्याची शक्यता आहे.

महानगरपालिकेतून सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना निवृत्तीच्या दिवशी मिळायला हवी असलेली ग्रॅच्युइटी, सातव्या वेतन आयोगाचा फरक आणि इतर लाभांची देणी पाच-दहा वर्षांपासून थकलेली होती. प्रशासनाकडून केवळ दरमहा दोन हजार रुपये देऊन या थकबाकीची तुटपुंजी भरपाई केली जात होती.

त्यामुळे आर्थिक अडचणींचा सामना करणारे सेवानिवृत्त कर्मचारी 'कायद्याने वागा' लोकचळवळीचे राज असरोंडकर, प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. स्वप्निल पाटील यांच्या नेतृत्वाखाली हक्क मिळवण्यासाठी रस्त्यावर उतरले होते. कर्मचाऱ्यांनी संतप्त होऊन, 'जर उपोषणा दरम्यान आमचा मृत्यू झाला तर आमच्या कुटुंबाला एकरकमी थकबाकी मिळावी,' अशी मागणी केली होती.

यामुळे परिस्थिती आणखी तणावपूर्ण होण्याची शक्यता होती. भाजपा आमदार कुमार आयलानी, राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष भारत (गंगोत्री) राजवानी, राष्ट्र कल्याण पार्टीचे अध्यक्ष शैलेश तिवारी आणि इतर नेत्यांनी या आंदोलनात सक्रिय सहभाग नोंदवला. उल्हासनगरचे आमदार कुमार आयलानी यांनी आंदोलकांसोबत आयुक्त विकास ढाकणे यांची भेट घेऊन कर्मचाऱ्यांना एकरकमी रक्कम मिळावी अशी मागणी केली.

त्याचप्रमाणे आमदार बच्चू कडू आणि शिंदे गटाचे प्रवक्ते किरण सोनवणे यांनीही मुख्यमंत्र्यांपर्यंत हा मुद्दा पोहोचवण्याचे आश्वासन दिले आहे. ढाकणे यांनी दिवाळीपूर्वी पासून ग्रॅच्युइटीच्या थकबाकीचे दरमहा 50 हजार रुपये देण्याचे तसेच पुढील वर्षभरात थकबाकीची उर्वरित रक्कम चुकवली जाईल असे आश्वासन दिले.

'यापुढे सेवनिवृत्तांना सेवनिवृत्तीच्या दिवशीच सर्व देणी मिळतील'

सेवनिवृत्तांसाठी केलेल्या आंदोलनाचा फायदा यानंतर सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही होणार आहे. कारण यापुढे सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची देणी भविष्यात सेवानिवृत्तीच्या दिवशीच दिली जातील यासाठी महानगरपालिकेची आर्थिक सक्षमता वाढवण्याचा निर्धार आयुक्तांनी व्यक्त केला. अशी माहिती कायद्याने वागा लोकचळवळचे राज असरोंडकर, प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. स्वप्निल पाटील यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar Interview : ‘लाडकी बहीण’च्या यशामुळे ‘पंचसूत्री’चा घाट! उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा दावा

Prataprao Pawar : ‘ग्लोबल प्राइड ऑफ महाराष्ट्र’ पुरस्काराने प्रतापराव पवार यांचा लंडनमध्ये सन्मान

Kartik Purnima 2024 Wishes: आज कार्तिक पौर्णिमा, देव दिवाळीनिमित्त प्रियजनांना द्या मराठीतून खास शुभेच्छा

ढिंग टांग : तुमच्या मनातला मुख्यमंत्री कोण…?

आजचे राशिभविष्य - 15 नोव्हेंबर 2024

SCROLL FOR NEXT