Gunratan Sadavarte  
मुंबई

Gunratan Sadavarte : गोडसेचा एकेरी उल्लेख करू नये; गुणरत्न सदावर्ते माध्यमांवर भडकले

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : स्टेट को ऑपरेटिव्ह बँकेतील संचालक मंडळाच्या विजयानंतर गुणरत्न सदावर्ते यांनी नत्थुराम गोडसेच्या घोषणा दिल्या होत्या. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गोडसेचे उद्दातीकरण योग्य नाही अशी जाहिर प्रतिक्रीया दिली होती.

त्यानंतर गुणरत्न सदावर्ते यांनी आपली भूमिका मवाळ केली खरी मात्र नत्थुराम गोडसे यांचा एकेरी उल्लेख केल्यावर ते माध्यमांवर भडकले. गोडसे याला सन्मान द्यायला पाहीजे असे सदावर्ते यांचे म्हणणे होते.

एसटीच्या मध्यवर्ती बँकेची निवडणूकीत विजय मिळवल्यावर सोमवारी (ता.२६ जून) गुणरत्न सदावर्ते यांनी गोडसे यांचे पोस्टर्स फडकवले, गोडसेच्या जयजकार केला होता. उपमुख्यमंत्र्यांच्या विधानानंतर सदावर्ते यांनी आपली भूमिका मवाळ केली. मात्र मंगळवारी बँक मुख्यालयातून बोलताना महात्मा गांधी यांचा उल्लेख नेहमीप्रमाणे बॅरीस्टर एम के गांधी असाच केला.

गांधीचे कर्तुत्व मी नाकारत नाही.देशाच्या स्वातंत्र्यासाठी अनेकजण लढले आहेत असे त्यांनी सांगीतले. या दरम्यान एका पत्रकाराने गोडसे य़ांचा एकेरी उल्लेख केला, त्यावर सदावर्ते संतापले. यापुढे गोडसेचा एकेरी उल्लेख करायचा नाही असा दमच त्यांनी संबधित पत्रकाराला दिला.त्यामुळे सदावर्ते यांचे गोडसे प्रेम कमी झाले नसल्याचे स्पष्ट दिसून आले.

त्याशिवाय, एसटी बँकेच्या आजपर्यंतच्या ७० वर्षांच्या इतिहासात संचालक मंडळाशिवाय इतर कुणीही बँकेच्या सभागृहात पत्रकारांशी संवाद साधला नाही किंवा शक्ती प्रदर्शन केले नाही.मात्र यंदा पंरपरा पायदळी तुडवत सदावर्ते यांनी तिथूनच माध्यमांशी संवाद साधला.याबाबत बोलण्यास एसटी बँकेचे महाव्यवस्थापक सूर्यकांत जगताप यांनी नकार दिला

पवारांवर टिका

आजपर्यंत शरद पवार यांनी केलेलं राजकारण बालिश राजकारण होत. शरद पवारांचे विचार संपवण्याचा काम आम्ही केलं.आम्ही शरद पवार नावाचा विषाणू व्हायरस या निमित्तानं संपवला आहे. बँकेकडून लवकरच परिपत्रक काढून, वंदे मातरम म्हणण्याच्या सुचना द्यावात. प्रत्येक शाखेत नरेंद्र मोदी, निर्मला सीतारमन, देवेंद्र फडणवीस यांची तैलचित्र प्रत्येक शाखेत लावण्याचे निर्देश सदावर्ते यांनी एसटी बँक प्रशासनाला निर्देश दिले.

बँकेत परवानगी शिवाय बेकायदेशीर पत्रकार परिषद घेतलीच कशी?हे कृत्य बेकायदेशीर असून या संदर्भात बँकेच्या अधिकाऱ्यांनी पोलिसात तक्रार द्यावी.

- श्रीरंग बरगे, सरचिटणीस, महाराष्ट्र एस. टी.कर्मचारी काँग्रेस

शरद पवार आणि या बॅंकेचा काहीही संबंध नाही.तरीही केवळ सवंग प्रसिद्धीसाठी पवारांची बँक सदावर्तेनी जिंकली असा खोटा प्रचार केला जात आहे.ही कामगारांची बँक आहे.सदावर्तेंना विजयाचा अहंकार आलेला आहे.

- संदीप शिंदे, अध्यक्ष, महाराष्ट्र एसटी कामगार संघटना

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Results: लोकसभेचा उत्साह सातव्या आसमानावर; विधानसभेत भ्रमाचा भोपला फुटला, काँग्रेसच्या आत्मविश्वासानं MVAचा खेळ केला?

Abhimanyu Pawar won Aausa Assembly Election : औसा मध्ये फडकला भाजपाचा झेंडा! अभिमन्यू पवारांचा भव्य विजय

Kopri Pachpakhadi Assembly Election 2024 Result: येऊन येऊन येणार कोण! कोपरी पाचपाखाडीत एकनाथ शिंदेंचा एकहाती विजय; केदार दिघेंचा लाजिरवाणा पराभव

Karveer Assembly Election 2024 Results : करवीर मतदारसंघात पुन्हा 'चंद्रदीप'; अतिशय चुरशीच्या लढतीत राहुल पाटलांचा अवघ्या काही मतांनी पराभव

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: शरदचंद्र पवार पक्षाचे विजयी उमेदवार अभिजीत पाटील यांनी जीपवर चढून दंड थोपटत विजय साजरा केला

SCROLL FOR NEXT