Dahanu News: जीवनाचा दर्जा उंचावण्यासाठी, घरगुती नळजोडणीद्वारे स्वच्छ पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यासाठी, जलजीवन मिशन योजनेअंतर्गत हर घर नळ योजनेची अंमलबजावणी, पाणी पुरवठ्यात अनियमितता दूर करणे, त्याचबरोबर डहाणू तालुक्यातील आणि गावांना सूर्या प्रकल्प, अस्वाली धरण आणि कुरझे धरणातून पिण्याचे पाणी पुरवावे, या मागणीसाठी डहाणू पंचायत समितीवर कष्टकरी संघटनेमार्फत हंडा मोर्चा काढण्यात आला.
के. टी. नगर येथून कष्टकरी संघटनेमार्फत डहाणू पंचायत समितीवर अध्यक्ष ब्रायन लोबो, मधुबाई धोडी यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी (ता. ९) महिलांच्या डोक्यावर हंडा-कळशी आणि पाण्याची कावड घेऊन हंडा मोर्चा काढण्यात आला. त्यात हजारो आदिवासी बांधव सहभागी झाले होते. शिष्टमंडळामार्फत गटविकास अधिकारी पल्लवी सस्ते, जलजीवन मिशनचे शाखा अभियंता कुशल पाटील यांना निवेदन सादर करण्यात आले. त्यानंतर मागण्याबाबत सविस्तर चर्चा केली.
त्या वेळी हर घर नळ जोडणीद्वारे पाणीपुरवठा करण्यासाठी सर्व त्या उपाययोजना करण्यात येत आहेत. योजनेत असणाऱ्या त्रुटी दूर करण्यात येऊन अनियमितता दूर करण्याचे आश्वासन गटविकास अधिकारी पल्लवी सस्ते यांनी दिले.
भूगर्भातील पाण्याची पातळी कमी कमी होत आहे. त्यासाठी धरणातील पाणी पिण्यासाठी वापरले जाणे हा उपाय आहे. सूर्या प्रकल्पाचे पाणी आदिवासी आणि इतर स्थानिक लोकांना देण्यात यावे, जलजीवन मिशन अंतर्गत असणाऱ्या पाणीपुरवठा योजना, पूर्णपणे अंधारात आहेत, त्यासाठी ग्रामसभा घेऊन संबंधित अधिकारी उपस्थित राहून लेखी तपशील सादर करण्यास द्यावा, पाणीपुरवठा योजनेची कामे अर्धवट ठेवणाऱ्या ठेकेदारावर कारवाई करण्यात यावी
. ग्रामस्थांनी सूचवलेल्या जागेवर विहिरी बांधण्यात यावी. त्यासाठी अतिरिक्त निधी उपलब्ध करून द्यावा. पाण्याच्या टाक्याचा दर्जा निकृष्ट असल्याने पाणी गळती होत आहे. तसेच, अनेक घरापर्यंत जलवाहिन्या गेलेल्या नाहीत, त्यांना एमएमआरडीएमार्फत वाहिन्या न देता विहिरी बांधून अनावश्यक खर्च केला जात असल्याचे निवेदनात म्हटले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.