मुंबई

दिलासा! पाच हजार कोरोनामुक्त 80 वर्षांहून अधिक वयाचे; भीती न बाळगण्याचे आरोग्यमंत्र्यांचे आवाहन

भाग्यश्री भुवड


मुंबई : राज्यात आतापर्यंत कोरोनामुक्त झालेल्यांपैकी 5000 रुग्णांचे वय 80 वर्षांहून अधिक आहे. तर, 90 वर्षांपुढील जवळपास 600 लोक बरे झाले आहेत. त्यामुळे कोरोनाची भीती न बाळगता सावधतेने त्याचा सामना करा, असे आवाहन आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी नागरिकांना केले आहे. 

कोरोनारुग्ण 10 ते 12 दिवसांमध्ये या आजारातून बाहेर पडू शकतात. त्यामुळे भीती बाळगू नका. काळजी घेत काम करत रहावे हाच सध्या कोरोनाबरोबर जगण्याचा महत्त्वाचा सिद्धांत आहे, असे राजेश टोपे यांनी म्हटले आहे. कोरोना विषाणुचा मुख्य गुणधर्मच जास्तीत जास्त प्रमाणात पसरणे हा आहे. परंतु, जगभरात जवळपास 80 टक्के लोक लक्षणविरहीत आहेत. यातील सौम्य लक्षण असलेल्या रुग्णांची रोगप्रतिकार शक्ती कोव्हिड केंद्रात केवळ 10 दिवसांत वाढत आहे. तर, केवळ 2 ते 3 टक्के रुग्ण गंभीर असल्याचे आरोग्यमंत्री म्हणाले. चाचण्यांसाठी शासनाच्या आणि खासगी अशा एकूण 369 लॅबमधून 24 तासांत अहवाल येत आहेत. राज्यात अँटीजेन आणि अँटीबॉडी चाचण्याही वाढवल्या असल्याने घाबरण्याचे कारण नाही, असे आरोग्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

नाते जपत आजारावर मात करा!
पनवेलमधील एका घटनेत लक्षणविरहित आई कोरोनामुक्त झाली. मात्र, त्यानंतर तिला घरात घेण्यास मुल घाबरू लागली. हा आजार बरा होतो. मात्र हा आजार झालेल्यांशी वाळीत टाकल्याप्रमाणे वागू नका. नातेसंबंध जपत आजारावर मात करा, असे आवाहन आरोग्यमंत्री टोपे यांनी केले आहे. लोक भीतीपोटी खूप चुका करतात. एखादा कोरोनाबाधीत झाल्यास पॅनिक होण्याची गरज नाही, असेही त्यांनी सांगितले.

---------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sunil Tingre: शरद पवार ईडीला घाबरले नाहीत, तुमच्या नोटिशीला काय घाबरणार! सुप्रिया सुळेंचा टिंगरेंना टोला

DY Chandrachud: सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांचा कार्यकाळ अखेर संपला! ‘या’ महत्वाच्या खटल्यांवर दिले निर्णय

Latest Maharashtra News Updates: दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचा एका क्लिकवर....

Vadgaon Sheri News : पोर्शे अपघात प्रकरणी टिंगरेंनी दिली शरद पवार यांना नोटीस - सुप्रिया सुळे

Sakal Natya Mahotsav 2024 : संकर्षण कऱ्हाडे यांच्या उत्तमोत्तम नाटकांची रसिकांना मेजवानी १५ ते १७ नोव्हेंबरला

SCROLL FOR NEXT