मुंबई

महाराष्ट्रात लॉकडाऊन उठवायचा की नाही? राजेश टोपेंचे स्पष्ट संकेत, म्हणालेत...

सकाळवृत्तसेवा

मुंबई - महाराष्ट्रात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढताना पाहायला मिळतेय. मुंबईत मोठ्या प्रमाणात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आहे. अशात नागरिकांचं लक्ष कोरोनाचा संसर्ग कधी संपणार आणि एकदाचा हा लॉकडाऊन पिरिअड कधी संपणार यावर आहे. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी एक मोठं विधान केलंय. १५ एप्रिलनंतर महाराष्ट्रात सरसकट लॉकडाऊन उठणार असं कुणीही गृहीत धरू नये, असं आरोग्य मंत्री राजेश टोपे म्हणालेत.

राजेश टोपे यांना महाराष्ट्रात १४ एप्रिलनंतर कशा प्रकारे लॉकडाऊन उठवणार याबाबत विचारलं गेलं. यावेळी राजेश टोपे म्हणालेत, १० एप्रिल नंतर लॉकडाऊन उठवायचा का या प्रक्रियेवर चर्चेला सुरवात होणार आहे. महाराष्ट्रातील कोरोनाचा मृत्युदर जास्त आहे. अशात दिवसागणिक महाराष्ट्र आणि मुख्यत्वे मुंबईत कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आहेत. या रुग्णांमध्ये रोज वाढ देखील होतेय, ही चिंतेची बाब आहे. त्यामुळे सरकारसाठी महाराष्ट्रात कोरोना लॉकडाऊन उठवण्याचा निर्णय घेणं अडचणीचं झालंय. दरम्यान महाराष्ट्रातील लॉकडाऊन आणखी वाढणार याचे स्पष्ट संकेत राजेश टोपे यांनी दिलेत. 

काय म्हणालेत आरोग्यमंत्री राजेश टोपे :

लॉकडाऊन उठवण्याच्या संदर्भात एक प्रोटोकॉल असतो. त्या कार्यपध्दतीनेच लॉकडाऊन उठवला जाऊ शकतो. अशात लॉकडाऊन पूर्ण उठवायचा की टप्प्याटप्प्याने उठवायचा या संदर्भातील काही देशांच्या केस स्टडी आपल्याजवळ आहेत. याबाबत याबाबत केंद्र सरकार अभ्यास करून आम्हाला माहिती पाठवतंय. त्या अनुषंगाने निर्णय घेतले जातायत असं राजेश टोपे म्हणालेत. त्यामुळे १५ एप्रिलनंतर महाराष्ट्रात सरसकट लॉकडाऊन उठणार असं कुणीही गृहीत धरू नये, असं आरोग्य मंत्री राजेश टोपे म्हणालेत. 

health minister rajesh tope on maharashtras lockdown and measures after 14th april

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar: शरद पवार यांची पुन्हा भर पावसात सभा, म्हणाले- अनेकवेळा बोलायला उभा राहिलो की पावसाला सुरुवात होते अन्....

BKC Metro Station: मोठी घटना! 40 फूट खोलवर लागली भयंकर आग, अग्निशमन दलाच्या आठ गाड्या घटनास्थळी

RBI: शक्तीकांता दास RBIचे गव्हर्नर राहणार की राजीनामा देणार? तुमच्या खिशावर काय परिणाम होणार?

...तर त्यांना शिवतीर्थ कसा आशीर्वाद देणार? शिवाजी पार्कवरील मोदींच्या सभेवरून आदित्य ठाकरेंचं टीकास्त्र

Malegaon Crime : पोलिसांनी पकडला प्रतिबंधित गुटखा, ११ लाख ३९ हजार ५६० रुपयांचा माल जप्त

SCROLL FOR NEXT