mumbai high court esakal
मुंबई

Mumbai Fire : वारंवार होणाऱ्या आगीच्या घटनासंदर्भात दाखल याचिकेवर उच्च न्यायालयात सुनावणी

मुंबईत आगीच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. या शहरात दररोज आगीच्या घटना घडत असून नागरिकांनी जीव गमावल्याच्या बातम्या रोज वाचनात येत आहेत.

सकाळ वृत्तसेवा

मुंबई - मुंबई उच्च न्यायालयाने शुक्रवारी मुंबई महानगरपालिकेला शहरातील इमारतींमध्ये आगीच्या दुर्घटनामुळे उद्भवलेल्या परिस्थिती हाताळण्यासाठी केलेल्या उपाययोजनांचे तपशील प्रतिज्ञापत्राद्वारे दाखल करण्याचे निर्देश दिले. मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय आणि न्यायमूर्ती आरिफ एस डॉक्टर यांच्या खंडपीठासमोर वकील आभा सिंग यांनी दाखल केलेल्या जनहित याचिकेवर शुक्रवारी सुनावणी केली.

न्यायालयाचे निर्देश

अधिवक्ता आदित्य प्रताप यांनी आभा सिंग यांच्या वतीने न्यायालयात युक्तिवाद केला. मुंबई महापालिका हद्दीतील अग्निशमन केंद्रांची संख्या, अशा अग्निशमन केंद्रांवर तैनात असलेले कर्मचारी आणि आग लागल्यावर अधिकाऱ्यांनी दिलेल्या प्रतिसादाची वेळ याविषयीही न्यायालयाने महापालिकेला माहिती देण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच शॉर्ट सर्किट हे आग लागण्याचे एक प्रमुख कारण असल्याने विद्युत जोडणी आणि त्यांच्या देखभालीशी संबंधित आवश्यकता आणि नियमांची माहिती न्यायलयाने मुंबई महापालिकडे मागितली आहे.

शासनावर ताशेरे

मुंबईत दररोज आगीच्या घटना घडत असून, त्यात नागरिकांचा जीव जाणे गंभीर असल्याचे सांगत मुंबई उच्च न्यायालयाने अग्नि शमनाच्या सुरक्षा नियम आणि नियमांच्या अंमलबजावणीबाबत राज्य सरकारवर बुधवारच्या सूनवणीत ताशेरे ओढले होते. आगीच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. या शहरात दररोज आगीच्या घटना घडत असून नागरिकांनी जीव गमावल्याच्या बातम्या रोज वाचनात येत आहेत.

या बाबतीत “कोणताही हलगर्जीपणा स्वीकारता येणार नसल्याचे खडे बोल उच्च न्यायालयाने सुनावले.राज्य सरकारला कोणती पावले उचलण्याची गरज आहे हे सांगणे न्यायलयाचे काम नसून शासनाला समस्येकडे गंभीर दखल घेण्याचा सल्ला उच्च न्यायालयाने दिला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray: निकालाची धडकी? उद्धव ठाकरेंचा प्लॅन बी! 'लाईव्ह'चं शस्त्र उगारलं, पुन्हा दगा टाळण्यासाठी उमेदवारांना एकत्र आणलं

Chh. Sambhajihnagar Election Reslut : घसरलेला टक्का कुणाच्या पथ्यावर? तिरंगी लढतीत बाजी कोण मारणार, याची उत्सुकता

Virat Kohli च्या रनमशीनला ब्रेक! १७ वर्षात सर्वाधिक कमी सरासरीची नोंद, पाहा प्रत्येक वर्षाचा बॅटिंग अ‍ॅव्हरेज

Nashik Vidhan Sabha Vote Counting: देवळालीचा निकाल सर्वप्रथम, नाशिक पश्‍चिम सर्वांत उशिरा; जिल्ह्यात उद्या मतमोजणी

Latur Assembly Election 2024 : अठरा हजार कोटी निधी आणल्याचा दावा, पण विकास दिसला का?

SCROLL FOR NEXT