Sameer Wankhede esakal
मुंबई

Sameer Wankhede : समीर वानखडे यांच्या याचिकेवर ११ जूनला सुनावणी

सकाळ वृत्तसेवा

मुंबई - कथित अनियमिततेबद्दल दोन वेगवेगळ्या प्रकरणात एनसीबीचे माजी मुंबई झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्या विरुद्ध एनसीबीने चौकशी सुरू केली आहे. या चौकशीला वानखेडे यांनी आक्षेप घेतला असून या प्रकरणावरील सुनावणी मुंबई उच्च न्यायालयाने ११ जूनला ठेवली आहे तोपर्यंत कोणतेही समन्स न बजावण्याचे न्यायालयाने निर्देश एनसीबीला दिले आहेत.

सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरण तसेच अंमली पदार्थ बाळगणाऱ्या नायजेरियन नागरिकावर कारवाई केल्या प्रकरणी एनसीबी मुंबईचे माजी विभागीय संचालक समीर वानखेडे यांची एनसीबीने प्राथमिक चौकशी सुरू केली होती. नोव्हेंबर २०२३ ते मार्च २०२४ पर्यंत, एनसीबीने वानखेडे यांना आठ नोटिसा बजावल्या तसेच चौकशी करणाऱ्या एनसीबीचे उपमहासंचालक संजय सिंह यांच्यासमोर हजर राहण्याचे निर्देश दिले.

वानखेडे यांनी ऍड. राजीव चव्हाण यांच्या मार्फत उच्च न्यायालयात याचिका दाखल करून चौकशी आणि त्यांना बजावलेल्या नोटिसांना आव्हान दिले आहे. न्या. रेवती मोहिते डेरे आणि न्या. मंजुषा देशपांडे यांच्या समोर आज (ता.६) सुनावणी घेण्यात आली. न्यायालयाने या प्रकरणावरील सुनावणी तहकूब करत जूनमध्ये ठेवली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lonavala Bus Container Accident : लोणावळ्याजवळ खासगी बस-कंटेनरची भीषण धडक; 23 पैकी 11 प्रवासी गंभीर जखमी

बोपदेव अत्याचार प्रकरण! मुख्य आरोपीबाबत मोठी माहिती समोर, पोलीस कठोर कारवाई करण्याच्या तयारीत

IND vs NZ 1st Test : सर्जरी झाली, त्याच गुडघ्यावर चेंडू आदळलाय...! ऋषभ पंतच्या दुखापतीवर Rohit Sharma चे मोठे अपडेट्स

Imtiaz Jaleel यांचं ठरलं! नांदेड लोकसभा पोटनिवडणूक लढवणार, भावी खासदार उल्लेख; कार्यकर्त्यांकडून पोस्ट व्हायरल

Kangana Ranaut : कंगनाचा बहुप्रतीक्षित इमर्जन्सी सिनेमाला अखेर मिळालं सेन्सॉर प्रमाणपत्र ; अभिनेत्री म्हणाली...

SCROLL FOR NEXT