मुंबई : भारतात कोरोनाच्या रुग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. देशात कोरोनाग्रस्तांचा आकडा आकडा १० हजारांच्या पुढे पोहोचला आहे. त्यामुळे कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन देशात लॉकडाऊन ३ मेपर्यंत वाढवण्यात आला आहे. एकीकडे हा आकडा वाढत चालला आहे, तर दुसरीकडे कोरोनाची नवनवीन लक्षणं समोर येत आहेत. छातीत दुखणं आणि त्यानंतर हृदयविकार होणं हे ही आता कोरोनाचे लक्षणं आहेत ही बाब समोर आली आहे.
सर्दी, खोकला, ताप, डोकेदुखी इत्यादी कोरोनाचे लक्षणं आहेत हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे. मात्र आता काही रुग्णांमध्ये हृदयविकाराचा तीव्र झटका येणं हेही कोरोनाचं लक्षण असल्याची माहिती समोर आली आहे. कोरोनाचं प्रारंभिक लक्षण म्हणून काहीही वृद्ध आणि हृदयविकाराच्या रुग्णांना ह्रिदयविकाराचा झटका येतोय. प्रथमदर्शी हा ह्रिदयविकाराचा झटका आहे असं लक्षात येतं. मात्र चाचणी केल्यानंतर त्या रुग्णाच्या आतड्यांमध्ये कोरोनाचा संसर्ग झाल्यामुळे त्याला कोरोनाचा संसर्ग झाला ही बाब स्पष्ट होत आहे.
मोठी बातमी - मुंबईकरांची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी अखेर नागरिकांना देणार 'या' बहुचर्चित औषधाचा डोस
कसा होता कोरोनाचा हृदयावर परिणाम:
कोरोना रुग्णाच्या रेस्पिरेटरी सिस्टिम म्हणजेच श्वसनक्रियेच्या माध्यमातून शरीरात जातो हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे. मात्र काही रुग्णांमध्ये यामुळे ताप सर्दी खोकला अशी लक्षणं दिसत नाही. तर कोरोना त्यांच्या हृदयाच्या आर्टरीजवर सूज वाढवतो. ज्यामुळे संसर्ग झालेल्या व्यक्तीच्या हृदयापर्यंत रक्ताचा पुरवठा होऊ शकत नाही. त्यामुळे त्यांना हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता असते. तसंच कोरोनामुळे फुप्फुसांवरही गंभीर परिणाम होतो. फुप्फुसांमध्ये कोरोनाचा संसर्ग झाल्यामुळे व्यक्तीचं फुप्फुस खराब होण्याची शक्यता असते. यामुळे हृदयविकाराचा तीव्र झटका येऊ शकतो. हार्ट मसल्सवर सूज आल्यानंतर रुग्णाची ट्रॉपोनीन टेस्ट केली जाते. यात ह्रदयविकाराच्या लक्षणांबद्दल माहिती मिळते. कोरोनाग्रस्त रुग्णांची ही टेस्टही पॉझिटिव्ह आली आहे.
हृदयविकाराच्या रुग्णांनी अशी घ्या काळजी:
हृदयविकाराचे सर्वाधिक रुग्ण हे वृद्ध आहेत किंवा ज्यांना डायबिटीज, ब्लड प्रेशर यासारखे आजार आहेत त्यांना हृदयाचे आजार होण्याची भीती आहे. त्यामुळे अशा रुग्णांनी स्वतःला जपण्याची गरज आहे.
कोरोनामुळे हृदयविकार होतो का यावर अजूनही डॉक्टर अभ्यास करत आहेत. त्यामुळे घाबरून जाऊ नका स्वतःची आणि स्वतःच्या कुटुंबाची काळजी घ्या.
heart problem is one of the symptoms of covid 19 see what researchers are saying about this
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.