मुंबई : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणक्षेत्रात जून-जुलै महिन्यात पावसाने ओढ दिल्यामुळे मुंबईवर पाणी कपातीचे संकट ओढवले.सध्या मुंबईकरांवर 20 टक्के पाणीकपातीचे संकट ओढावले आहे. मात्र, ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून पावसाने चांगलाच जोर धरल्याने मुंबईवरील पाणीसंकट कमी झाले आहे.
ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात धरणक्षेत्रात मुसळधार पाऊस झाल्याने गत 13 दिवसात तीन महिन्यांचा पाणीसाठा जमा झाला आहे. गुरुवार (ता.13) पर्यंत शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये 8 लाख 70 हजार 842 दशलक्ष लिटर पाणीसाठा जमा असून पूर्णक्षमतेच्या 60 टक्के पाणीसाठा आहे. तर आगामी आठवडाभर तलावक्षेत्रात धुवांधार पावसाची शक्यता असल्याने पाणीसाठ्यात वेगाने वाढ होणार आहे.
मुंबईला वर्षभर सुरळीत पाणीपुरवठा करण्यासाठी 14 लाख 47 हजार दशलक्ष लिटर पाण्याची गरज असते. 1 ऑगस्ट रोजी तलावात अवघा 5 लाख 1 हजार 160 दशलक्ष लिटर म्हणजे 34.63 दशलक्ष लिटर पाणीसाठा होता. त्यामुळे सध्या 20 टक्के पाणी कपात सुरु आहे. मात्र, गेल्या 13 दिवसात झालेल्या पावसाने तलावात तीन लाख 69 हजार 697 दशलक्ष लिटर पाण्याची भर पडली आहे. हे पाणी शहराला तीन महिने पुरू शकेल असे असले तरी गेल्या दोन वर्षांच्या तुलनेने कमीच पाणीसाठा तलावांमध्ये आहे. 2019 मध्ये आजच्या दिवसापर्यंत 13 लाख 37 हजार दशलश लिटर आणि 2018 मध्ये 12 लाख 77 हजार दशलक्ष लिटर पाणीसाठा जमा होता.
मुंबईत असलेले विहार आणि तुळशी हे दोन्ही तलाव ओसंडून वाहू लागले आहेत. अप्पर वैतरणा हे धरण नाशिक जिल्ह्यात असून मध्य वैतरणा, मोडकसागर, भातसा आणि तानसा हे तलाव ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यात आहेत. या भागात पुढील सोमवारपर्यंत धुवांधार पावसाचा अंदाज आहे. त्यामुळे तलावातील पाणीसाठा अधिक वेगाने वाढणार आहे.
मुसळधार पावसाचा वाहनांना फटका; वसईमध्ये नादुरुस्त वाहनांची गॅरेजमध्ये गर्दी
तलावातील पाणीसाठा (दशलक्ष लिटर )
तलाव | पाणीसाठा | आवश्यक साठा |
अप्पर वैतरणा | 97141 | 227047 |
मोडकसागर | 90642 | 128925 |
तानसा | 88674 | 145080 |
मध्य वैतरणा | 123058 | 193530 |
भातसा | 435583 | 717037 |
विहार | 27698 | 27698 |
तुलसी | 8046 | 8046 |
----
संपादन : ऋषिराज तायडे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.