मुंबई : कोकणात सुरु असलेल्या तुफान पावसाने मुंबईला चांगलेच झोडपून काढले असून तलाव क्षेत्रातही दणदणीत पाऊस झाला आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये दोन दिवसात तब्बल 23 दिवसांचा पाणीसाठा जमा झाला आहे. विहार तलावही बुधवारी रात्री ओसंडून वाहू लागला आहे.
मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये आज सकाळपर्यंत 6 लाख 158 दशलक्ष लिटर (41.47टक्के ) पाणीसाठा जमा आहे. तर 4 ऑगस्ट रोजी 5 लाख 5 हजार 893 दशलक्ष लिटर (34.95 टक्के) पाणीसाठा जमा होता. दोन दिवसात पाणीसाठा 94 हजार 265 दशलक्ष लिटर पाणीसाठा जमा झाला आहे. हे पाणी 23 दिवस पुरु शकेलएवढं आहे. बुधवारच्या एका दिवसात तब्बल 60 हजार 851 दशलक्ष लिटरने पाणीसाठा वाढला आहे. हे पाणी मुंबईला 15 दिवस पुरु शकेल.
अपुऱ्या पावसामुळे मुंबईत सध्या 20 टक्के पाणीकपात लागू करण्यात आली आहे. नियमीत मुंबईला 3750 दशलक्ष लिटर पाण्याचा पुरवठा होतो. तर सध्या 700 दशलक्ष लिटर पेक्षा जास्त पाणी कपात करण्यात आली आहे. मुंबईतील विहार तलावही बुधवारी रात्री ओसंडून वाहू लागला. या तलावातून रोज 80 दशलक्ष लिटरचा पाणी पुरवठा केला जातो. तर तलावात 27 हजार 698 दशलक्ष लिटर पाणीसाठा जमा आहे. गेल्या वर्षी 31 जुलैरोजी हा तलाव भरुन वाहू लागला होता.
तलावातील पाणीसाठा ( दशलक्ष लिटर)
( संपादन - सुमित बागुल )
heavy rainfall gives 23 days of water to mumbai vihar lake overflown
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.