मुंबई : हेमंत नगराळे (Hemant Nagarele) यांची मुंबईच्या पोलीस आयुक्तपदावरुन बदली करण्यात आली आहे. त्यामुळं आता संजय पांडे (Sanjay Pandey) हे मुंबईचे नवे पोलीस आयुक्त असतील. नगराळे यांच्यावर महाविकास आघाडीतील काही नेते नाराज होते त्यामुळं त्यांची उचलबांगडी करण्यात आल्याचं बोललं जात आहे. दरम्यान, नगराळेंकडं सुरक्षा महामंडळाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
संजय पांडे हे १९८६ च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. पांडे हे पोलिस महासंचालक असताना हायकोर्टाच्या निर्णयामुळं त्यांना पायउतार व्हावं लागलं होतं. मात्र, महाविकास आघाडी सरकारनं पांडे यांना पोलीस आयुक्त या पुन्हा डीजी दर्जाच्या पदावर बसवून त्याचं पुर्नवसन केलं आहे. पांडे हे जुलैमध्ये निवृत्त होणार असून पुढील सहा महिने ते मुंबई पोलीस आयुक्तपदावर कार्यरत असतील.
दरम्यान, संजय पांडे यांच्याकडं पोलीस महासंचालकपद देण्यात आलं त्यापूर्वी हेमंत नगराळेंकडं हे पद होतं. पण खंडणी प्रकरणात परमवीर सिंग यांची उचलबांगडी झाल्यानं नगराळे यांच्याकडं मुंबई पोलीस आयुक्तपदाची जबाबदारी सोपवण्यात आली होती.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.