Aditya Thackeray mumbai esakal
मुंबई

मुंबई : हिंदमाता, मिलन सब वे यंदा तुंबणार नाहीत - आदित्य ठाकरे

मिलन सब वे इथल्या साठवण टाक्यांची पाहणी केल्यानंतर मुंबईच्या पालकमंत्र्यांनी व्यक्त केला विश्वास

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : थोड्याशा पावसानंही मुंबईकरांना धडकी भरवणाऱ्या हिंदमाता आणि मिलन सब वे इथं साठवण टाक्यांची निर्मिती करण्यात आली आहे. या टाक्यांमुळं यंदाच्या पावसाळ्यात इथं पाणी तुंबणार नाही, असा विश्वास मुंबईचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केला आहे. मिलन सब वे इथल्या टाक्यांची पाहणी केल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. (Hindmata Milan subway will not be flooded this year says Aditya Thackeray)

पाऊस सुरु झाला की सर्व मुंबईकरांना दोन ठिकाणांची जास्त भीती वाटते ते म्हणजे मिलन सब वे आणि हिंदमाता. आम्ही सर्व राजकीय मंडळी आणि पत्रकार पहिल्यांदा तिथं जाऊन पाहणी करत असतात. हिंदमाता जवळ सेंट झेविअर्सच्या फुटबॉलच्या ग्राऊंडजवळ एका साठवण टाकीचं काम झालं आहे. तर दुसऱ्या टाकीचं काम सुरु आहे. त्याचबरोबर गांधी मार्केटजवळच्या टाकीचंही काम व्यवस्थित झालं आहे. त्यानंतर प्रमोद महाजन उद्यानाजवळही साठवण टाकी तयार करत आहोत, अशी माहिती आदित्य ठाकरे यांनी दिली.

दरम्यान, मिलन सबवे इथं तुंबणाऱ्या पाण्याची समस्या सोडवण्यासाठी इथल्या लायन्स क्कबलच्या मैदानाखाली आपण अशा टाक्या करत आहोत. याचं चांगलं काम सुरु असून यातील आतील पायलिंगचं काम झालं असून पाणीही इथं साठवू शकतो. पुढच्या दहा-पंधरा दिवसात पाणी इथं अडवून बाहेर फेकण्याची परिस्थिती आपण निर्माण करु शकू. पुढच्या वर्षीसाठी ही टाकी पूर्णपणे तयार होईल. हिंदमाता, प्रमोद महाजन उद्यान आणि गांधी मार्केटमधील अशा साठवण टाक्या यशस्वी ठरल्या आहेत. त्यामुळं अशा साठवण टाक्या मुंबई जिथं जिथं पाणी साठण्याची शक्यता आहे तिथं करण्यात येईल, अशी माहिती यावेळी आदित्य ठाकरे यांनी दिली.

साठवण टाकीचा उद्देश काय?

साठवण टाकीचा उद्देश हा आहे की जेव्हा तिथं जोरदार पाऊस पडतो तेव्हा साधारण ५० मिमी प्रतितास पडणाऱ्या पावसाचं पाणी गोळाकरुन ते समुद्रात फेकू शकतो. पण मुंबईची भौगोलिक परिस्थितीनुसार इथं सखल भाग आणि भरतीमुळं मोठ्या प्रमाणावर पाणी शहरात येतं. मग ७०, ८० मिमी किंवा कधीतर २०० मिमी प्रतितास पाऊस पडतो तेव्हा बाहेर पाणी फेकणं किंवा आपोआप जाणं कठीण होतं. त्यामुळं तीन चार तास पाणी तुंबू नये म्हणून ते आपल्याला साठवायला लागतं. यासाठीच्या टाक्या आपण हिंदमाता आणि प्रमोद महाजन उद्यान इथं केल्या आहेत, अशी माहिती आदित्य ठाकरे यांनी दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bank Merger: बँकांचे होणार विलीनीकरण; 43 वरून 28 होणार संख्या, काय आहे सरकारचा प्लॅन?

Nashik News : ‘नाट्यचौफुला’ तून 8 तासांचा नाट्यानुभव; मराठी रंगभूमीच्या इतिहासातील यशस्वी उपक्रम

मी ते कधीही विसरू शकणार नाही... 'वास्तव'च्या सेटवर संजय दत्तने संजय नार्वेकरांना दिलेली अशी वागणूक; म्हणाले-

Prostate Cancer : प्रोस्टेट कॅन्सर म्हणजे नेमकं काय? या गंभीर आजाराची कोणती आहेत लक्षणे? जाणून घ्या..

Jalna Assembly Election 2024 : जालना विधासनभा खोतकरांना रोखण्यासाठी भाजप मैदानात

SCROLL FOR NEXT