मुंबई

हिंगणघाटातील पीडितेच्या मृत्यूनंतर अजित पवार 'शिक्षेबद्दल' म्हणालेत..

सकाळवृत्तसेवा

मुंबई - आज सकाळीच महाराष्ट्राला सुन्न करणारी बातमी समोर आली. हिंगणघाटमधील निर्भया अखेर जीवन मरणाच्या झुंजीत अपयशी ठरलीये. सात दिवसांच्या लढ्यानंतर हिंगणघाटमधील पीडितेने आपले प्राण सोडलेत. हिंगणघाट जळीतकांडातील तरुणीच्या मृत्यूनंतर आता राज्यभरातून अत्यंत संतप्त प्रतिक्रिया येताना पाहायला मिळतायत. 3 फेब्रुवारीरोजी नेहमीप्रमाणे ती आपल्या कॉलेजमध्ये शिकवायला जात होती. तेंव्हा आरोपी विक्की नगराळेने तिचा पाठलाग करत, अत्यंत थंड डोक्याने सकाळी सव्वा सात वाजताच्या सुमारास तिच्या अंगावर पेट्रोल टाकून पेटवून दिलं. 

हिंगणघाटातील निर्भयाच्या मृत्यूनंतर आता राज्यभरातून संतप्त प्रतिक्रिया येतायत. यावर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे.

"हिंगणघातली निर्भयाला आपण वाचवू शकलो नाही ही महाराष्ट्राच्या मातीसाठी अत्यंत लाजिरवाणी घटना आहे. येत्या काळात महाराष्ट्रातील सरकार अशा घटनांकडे अधिक संवेदनशीलपणे आणि गुन्हेगारांसोबत अधिक कठोरपणे वागेल तशी भूमिका घेताना पाहायला मिळेल. येत्या काळात आरोपीला जी शिक्षा मिळेल ती इतरांवर जरब बसवणारी असेल. मी तिच्या कुटुंबियांच्या आणि हिंगणघाट मधील नागरिकांच्या दुःखात सहभागी आहे. पुन्हा अशा प्रकारचे नाराधान निर्माण होऊ न देणं हीच हिंगणघाट मधील मृत बहिणीला आपली आदरांजली असेल", असं महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणालेत.  

पीडित शिक्षिकेवर नागपूरच्या ऑरेंज सिटी इस्पितळात उपचार सुरु होते. तिला कृत्रिम श्वसनयंत्रणा म्हणजेच व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलेलं. डॉक्टरांकडून तिला औषधं देऊन हृदयाचे ठोके आणि ब्लड प्रेशर वाढवण्याचा प्रयत्न केला जात होता, असं ऑरेंज सिटीमधील डॉक्टरांनी सांगितलं. मात्र, उपचारादरम्यान आज सकाळी हृदयविकाराच्या झटक्याने २४ वर्षीय पीडित शिक्षिकेचा दुर्दैवी मृत्यू झालाय. तिनं आज सकाळी ६.५५ मिनिटांनी नागपूरच्या ऑरेंज सिटी इस्पितळात अखेरचा श्वास घेतला.

पीडितेच्या दुर्दैवी मृत्यू झाल्याने आरोपी विक्की नगराळे याला फाशीशी शिक्षा व्हावी अशी सर्वच स्तरातून मागणी केली जातेय.   

hinganghat nirbhala lost her fight with life reaction of dcm ajit pawar on this matter

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Israel PM Netanyahu: इस्रायली पंतप्रधानांच्या घरावर बॉम्ब हल्ला; संरक्षण मंत्री म्हणाले, आता हद्द झाली...

Latest Maharashtra News Updates : राजनाथ सिंह यांनी हायपरसॉनिक क्षेपणास्त्राच्या यशस्वी उड्डाण चाचणीबद्दल सशस्त्र दल आणि उद्योगाचे अभिनंदन केले

Uric Acid Home Remedies: युरिक अ‍ॅसिडची समस्या असल्यास सकाळी रिकाम्यापोटी 'ही' गोष्ट पाण्यात उकळून प्यावी, मिळेल आराम

Hasan Mushrif : 'ED प्रकरणात कोर्टानं मला क्लीन चिट दिलीये, शरद पवारांना याची माहिती नाही'; काय म्हणाले मुश्रीफ?

Navneet Rana: मोठी बातमी! नवनीत राणांच्या प्रचारसभेत राडा, अंगावार खुर्च्या फेकण्याचा प्रयत्न! नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT