मुंबई : हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यातील माळवटा गावातील एका कुटुंबाने मंत्रालयाच्या समोर अंगावर रॉकेल टाकून आत्मदहनाचा प्रयत्न केल्याचा प्रकार घडला आहे. राजू चन्नापा हुनगुंडे असे आत्मदहन करणाऱ्या कुटुंबाचा नाव असून, यावेळी त्यांनी अनेक गंभीर आरोप केलेल आहेत. दरम्यानस पोलिसांनी वेळीच मध्यस्थी केल्याने पुढील अनर्थ टळला आहे. (Hingoli Family Attempts Self immolation In Front OF Mantralaya )
यावेळी आत्मदहनाचा प्रयत्न करणाऱ्या हनगुंडे यांनी सांगितले की, आपण नांदेड जिल्ह्यातील पालम रोड धानोरा काळे येथील जवळपास साडे आठ किलोमीटरच्या रस्त्याचं काम केलं. ज्याची किंमत १ कोटी ७० लाख रुपये आहे. त्यापैकी आपल्याला केवळ १४ लाख रुपये देण्यात आले असून, कामाचे उर्वरित पैसे मागितले म्हणून मला आणि माझ्या कुटुंबाला जबर मारहाण करण्यात आल्याचा गंभीर आरोपही त्यांनी यावेळी केला आहे. दरम्यान, याबाबत आपण काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण (Ashok Chavhan) यांचीदेखील भेट घेतली होती. परंतु तरीदेखील काम न झाले नाही. त्यामुळे अखेर कुटुंबासह आत्मदहन करण्याचा निर्णय घेतल्याचे राजू यांनी सांगितले.
प्रकरण नेमकं काय?
राजू चन्नपा हुनगुंडे (Raju Channapa Hungunde) हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यातील माळवटा गावातील रहिवासी असून ते रत्यांची कामे (Road Contractor) करण्याची कामे करतात. हुनगुंडे यांनी नांदेड जिल्हयातील पालम रोड धानोरा काळे येथील जवळपास साडे आठ किलोमीटरच्या रस्त्याचं काम केलं आहे. ज्यासाठी त्यांना १ कोटी ७० लाख रुपयांचे पैसे येणे होते. मात्र, त्यातील केवळ १४ लाख रुपयेच त्यांना देण्यात आले आहेत. कामाचे इतर पैशांची मागणी केल्यानंतर ते देण्याऐवजी आपल्याला व कुटुंबाला जबर मारहाण करण्यात आली असा आरोप हुनगुंडे यांनी केला आहे. या सर्व प्रकरणाबाबत आणि उर्वरित पैसे मिळण्यासाठी आपण बांधकाम मंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांची देखील भेट घेतली. परंतु, याचा काही फायदा झाला नाही. त्यामुळे अखेर संपूर्ण कुटुंबासह आत्महत्या करण्याचा निर्णय घेतल्याचे राजू यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.