Hitendra Thakur sakal
मुंबई

Hitendra Thakur: बहुजन विकास आघाडीला आत्मचिंतनाची गरज; पालघर मध्ये सलग चौथा पराभव

संदीप पंडित

Hitendra Thakur: पालघर मतदारसंघाची मतमोजणी मंगळवारी पार पडली. यात पालघरमधील सर्वात मोठा पक्ष असलेल्या बहुजन विकास आघाडीला बालेकिल्ल्यांसह सहाही विधानसभा मतदारसंघात मोठ्या पिछेहाटीला सामोरे जावे लागले आहे.

आश्चर्याची बाब अशी की, डहाणू , विक्रमगड व पालघर या तिन विधानसभा मतदारसंघात बहुजन विकास आघाडीला केवळ 60 हजार मते मिळाली.ही मते बविआसाठी राजकीयदृष्ट्या मोठी पिछेहाट म्हणावी लागेल.

याआधीच्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादी व मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या पाठिंब्याने लढणाऱ्या बविआला यावेळी मात्र वसई, विरार बाहेरील आपल्या राजकीय अस्तित्वाची जाणीव प्रभावामुळे बविआ ला झाली असावी. याबाबत आता बविआच्या नेत्यांनी आत्मचिंतन करायला हवे. कारण पालघर लोकसभे मध्ये सलग चौथ्यांदा हरण्याची बविआने विक्रम केला आहे.

लोकसभेच्या निवडनुआ लागल्यावर आपल्या तीन विधान सभा मतदार संघावर अवलंबुन बहुजन विकास आघाडी निवडणुकीला सामोरी जात असल्याचे आज पर्यंतचे चित्र होते. बविआला प्रत्येकवेळी दोन्ही काँग्रेस आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षा पाठिंबा देत आला होता. यावेळी मात्र या बविआच्या जुन्या मित्रांनी त्यांची साथ सोडल्याचे निवडणुकीच्या निकालावरून दिसून येते. हक्काच्या बालेकिल्ल्यात अर्थात वसई, नालासोपारा व बोईसर अशा मतदारसंघांत बहुजन विकास आघाडीचे राजेश पाटील यांना मताधिक्य मिळाले नाही. सलग चारवेळा बविआला पालघरमध्ये पराभव स्विकारावाला लागला असल्याने यापुढे बविआने पालघर लोकसभा निवडणूक लढवन्या पूर्वी आत्मचिंतन करण्याची वेळ आली आहे.

आश्चर्याची बाब आणखी अशी की, वसई विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीच्या भारती कामडी यांचे मताधिक्य हे बविआच्या राजेश पाटील यांच्यापेक्षा जास्त आहे. . तर येथे भाजपचे हेमंत सावरा यांना 76 हजार 307 इतके मताधिक्य मिळाले.

ठाकरे गटाच्या भारती कामडी यांना 66888, तर बविआचे राजेश पाटील यांना 50868 इतकी मते मिळाली. आमदार हितेंद्र ठाकूरांच्या बालेकिल्ल्यात भाजपच्या हेमंत सावरा यांनी राजेश पाटील यांच्यापेक्षा तब्बल 25 हजार 439 इतकी जास्त मते घेतली आहेत. येथे विधानसभेला बविआला फटका बसण्याची शक्यता राजकीय चाणक्य वर्तविता आहेत.

नालासोपाऱ्यातही बविआचे राजेश पाटील यांना 79 हजार 460 मते मिळाली, तर भाजपच्या हेमंत सावरा यांना 1 लाख 36 हजार 818 मते मिळाली. तर ठाकरे गटाच्या भारती कामडी यांना 66 हजार 150 इतकी भरीव मते मिळाली आहेत. विधानसभेला येथे देखील बविआसाठी धोक्याची घंटा वाजली आहे. बोईसर मतदारसंघात बविआला 65 हजार 291 मते, महाविकास आघाडीला 62 हजार 706 मते तर भाजपला 1 लाख 4 हजार 439 मते मिळाली. बोईसरमध्ये भाजपचा बोलबाला दिसला. त

र भारती कामडी यांनी राजेश पाटील यांच्यासमोर मोठे आव्हान उभे केल्याने बोईसरमध्येही बविआला अपेक्षित यश मिळालेले नाही. उलट विधानसभेला ही जागा जिंकताना बविआला अथक परिश्र््रम घ्यावे लागणार आहेत इतके नक्की. त्याशिवाय पालघर विधानसभेत बविआचे राजेश पाटील यांना केवळ 23 हजार 530, भारती कामडी यांना 64 हजार 352 तर हेमंत सावरा यांना 93 हजार 591 मते मिळाली.

तसेच विक्रमगड मतदारसंघात राजेश पाटील यांना अवघी 22 हजार 70 मते मिळाली. तर भारती कामडी यांना 72 हजार 844 मते मिळाली. तसेच हेमंत सावरा यांना 1 लाख 6 हजार 53 मते मिळाली. तसेच डहाणू मतदारसंघात राजेश पाटील यांना केवळ 12 हजार 792 मते मिळाली. भारती कामडी यांना 83 हजार 882 मते मिळाली. तर हेमंत सावरा यांना 83 हजार मते मिळाली. डहाणूत केवळ 883 मतांची आघाडी महाविकास आघाडीला मिळाली आहे. या सर्वाचा विचार करता येणाऱ्या विधानसभा मतदानाच्यावेळी पालघरमध्ये भाजप-शिंदे गटाचे उमेदवार बविआला धोबिपछाड देत मुसंडी मारू शकतात.

असा राजकीय जाणकारांचा अंदाज आहे. अर्थात विधानसभेला चित्र हे लोकसभेपेक्षा खूपच वेगळे असते. त्यामुळे बविआ येथे कमबॅकसद्ध करू शकते. असा राजकीय जाणकारांचा अंदाज आहे. मात्र सहाही विधानसभा मतदारसंघात मोठी पिछेहाट झाल्याने बविआसमोर ते मोठे संकट असणार आहे.

बविआचे सर्वेसर्वा आमदार हितेंद्र ठाकूर हे नेहमी म्हणतात कि, माझा कार्यकर्ता हाच नेता आहे. परंतु आता बविआ मध्ये कार्यकर्ताच राहिलेला नसून सारेच नेते झाले आहेत. तर येथील नगरसेवक हे काळ्या काचेच्या गाडीतून फिरताना रस्त्यावर उतरत नसल्याचा आरोप कार्यकर्ते करत आहेत.

त्यामुळे आता हितेंद्र ठाकूर यांनी लोकसभा आणि जिल्हा परिषद निवडणुकी पूर्वी वसई, नालासोपारा सोडून इतर ३ मतदार संघात पक्ष बांधणीकडे लक्ष देण्याची गरज आहे.

जिल्हा परिषदेलाही वसई तालुक्यात आता फक्त ४ जागा राहिल्या असून, त्यापैकी याघडीला बविआ कडे २ जागा तर २ जागा विरोधकांकडे आहेत. त्यामुळे जिल्ह्यावर वर्चस्व राखायचे असेल तर हितेंद्र ठाकूर यांनी आता जिल्ह्यावर लक्ष केंद्रित करायला हवे. त्याच बरोबर येणारी विधान सभा आणि महापालिका निवडणूक लक्षात घेऊन वसई विरार मध्ये तयार झालेले संस्थानिक मोडीत काढायला हवेत तरच विधान सभा ,जिल्हा परिषद आणि महानगर पालिकेत पुन्हा एकदा चांगले यश मिळू शकेल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'हा जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार', IND vs BAN सामन्याविरोधात हिंदू संघटना आक्रमक, मालिका रद्द होणार?

Aaditya Thackeray : महायुती गद्दारांचा चेहरा घेऊन विधानसभा लढणार का?

Raj Thackeray: डॉ. अजित रानडेंना कुलगुरु पदावरुन हटवल्यानंतर राज ठाकरेंची पोस्ट; राज्यासह केंद्र सरकारला सुनावले खडेबोल

Sanjay Gaikwad: संजय गायकवाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल; वडेट्टीवारांचा जोरदार हल्ला

दोन टप्प्यात निवडणुका कुठे होणार? सुरत आणि गुवाहाटीला का? शिंदेंच्या वक्तव्यावर आदित्य ठाकरेंची खोचक टीका

SCROLL FOR NEXT