anil.jpg 
मुंबई

अनिल देशमुख आज गृहमंत्रीपदाचा राजीनामा देणार?

सकाळवृत्तसेवा

राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर झालेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांच्या प्रकरणात आज मुंबई उच्च न्यायालयाने महत्त्वाचा आदेश दिला आहे. अनिल देशमुख यांच्यावरील भ्रष्टाचाराच्या आरोपांची सीबीआय चौकशी करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत. मुंबई उच्च न्यायालयाने सीबीआयला १५ दिवसांच्या आत अनिल देशमुखांवरील आरोपांची प्राथमिक चौकशी सुरु करण्याचे निर्देश दिलेत. 

आधी या प्रकरणात राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरु होते. पण आता थेट न्यायव्यवस्थेने गृहमंत्र्यांच्या सीबीआय चौकशीचे आदेश देणे, ही गंभीर बाब आहे. त्यामुळे अनिल देशमुख गृहमंत्रीपदाचा राजीनामा देण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, आज दुपारी गृहमंत्री अनिल देशमुख शरद पवार यांची भेट घेण्याची शक्यता आहे. शरद पवार यांच्या सोबत चर्चा केल्यानंतर अनिल देशमुख मुख्यमंत्र्यांकडे राजीनामा पाठवण्याची शक्यता आहे. कारण एखाद्या चौकशीला सामोरे जात असताना एखाद्या पदावर राहणं हे योग्य नाही.

उद्धव ठाकरे सुद्धा राजीनाम्यासाठी आग्रही
महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरील भ्रष्टाचाराच्या आरोपांची चौकशी करण्यासाठी राज्य सरकारने एक सदस्यीय समिती स्थापन केली असली, तरी गृहमंत्रीपदावरुन देशमुखांना बदलण्यासाठी उद्धव ठाकरे आग्रही आहेत. गृहमंत्री देशमुखांची चौकशी सुरु आहे. त्यामुळे त्यांच्याकडून गृहखाते काढून घेऊन, दुसऱ्या खात्यात त्यांची बदली करावी, अशी उद्धव ठाकरेंची भूमिका असल्याचे शिवसेनेतील अंतर्गत सूत्रांनी सांगितले. 
 

देवेंद्र फडणवीस काय म्हणाले...
"मुंबई उच्च न्यायालयाने गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरील भ्रष्टाचाराच्या आरोपांची प्राथमिक सीबीआय चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. आम्ही उच्च न्यायालयाच्या या निर्णयाचं स्वागत करतो. निदान या निर्णयानंतर अनिल देशमुखांनी गृहमंत्रीपदाचा राजीनामा दिला पाहिजे" अशी मागणी राज्याचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केली. ते घाटकोपरमध्ये भाजपा आमदार पराग शाह यांनी उभारलेल्या कोविड आयसोलेशन सेंटरच्या कार्यक्रमात बोलत होते. 

"अनिल देशमुख गृहमंत्रीपदाचा राजीनामा देत नसतील, तर मुख्यमंत्र्यांनी त्यांच्याकडून राजीनामा घेतला पाहिजे. नैतिकतेच्या आधारावर एखाद्या मंत्र्याच्या विरुद्ध न्यायालयााने सीबीआय चौकशी सांगितल्यानंतर त्यांनी त्या पदावर राहण अयोग्य आहे" असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hatkanangale Assembly Election 2024 Results : हातकणंगले मतदारसंघात महायुतीच्या अशोकराव मानेंनी 46 हजार 397 मतांनी मिळवला विजय

राष्ट्रपती बनण्याचं स्वप्न पाहणाऱ्या अभिजीत बिचुकलेंना आमदारही बनता येईना ; निवडणुकीत मिळालेल्या मतांचा आकडा वाचून बसेल धक्का !

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: ठाण्यात केदार दिघेंचे डिपोझिट जप्त

Dilip Sopal won Barshi Assembly Election : बार्शीमध्ये दिलीप सोपलचं! शिवसेना शिंदेच्या राजेंद्र राऊतचा पराभव

Rais Shaikh Won In Bhiwandi East Assembly Election : भिवंडी पूर्वेत रईस शेख विजयी; शिवसेनेच्या संतोष शेट्टींचा मोठ्या फरकाने पराभव

SCROLL FOR NEXT