cancer 
मुंबई

#HopeOfLife : जाणून घेऊया केमोथेरपी उपचारपद्धतीबाबत..

डॉ.डोनाल्ड बाबू

मुंबई : केमोथेरपी या उपचारपद्धतीद्वारे औषधांचा वापर करून रुग्णाच्या शरीरातील कर्करोगाच्या पेशी नष्ट केल्या जातात. कर्करोग झाल्यावर शरीरात कर्करोगाच्या पेशींची वाढ झपाट्याने होत असल्याने त्यावर उपाय म्हणून ही सर्वाधिक वापरली जाणारी उपचारपद्धती आहे. केमोथेरपीचा वापर रुग्णांची तत्कालीन परिस्थिती लक्षात घेत बहुतांश वेळी एकेरी किंवा अन्य उपचार पद्धतींसोबत समांतर केला जातो.
जरी केमोथेरपी ही कर्करोगावरील उपचारासाठी वापरली जाणारी प्रभावी उपचारपद्धती असली, तरी त्याचे अनेक दुष्परिणामही आहेत. 

केमोथेरपी का केली जाते?
कर्करोगाच्या रुग्णांवर उपचारासाठी केमोथेरपी वेगवेगळ्या प्रकारे वापरली जाते. इतर उपचारपद्धतींच्या तुलनेत केमोथेरपीचा वापर सर्वाधिक केला जातो. इतर उपचारपद्धतींचा वापर केल्यानंतर शरीरात राहिलेल्या कर्करोगाच्या पेशी नष्ट करण्यासाठी केमोथेरपीचा वापर केला जातो. त्यासाठी वेळेनुसार आणि परिस्थितीनुसार डॉक्‍टर निर्णय घेतात. केमोथेरपीचा वापरासोबत रेडिएशन आणि शस्त्रक्रिया करण्याची शक्‍यता असल्यास त्यास न्यूओॲडज्युवन्ट थेरपी म्हणतात. त्याशिवाय कर्करोगाचे लक्षणे शोधण्यासाठी सुरुवातीला प्राथमिक केमोथेरपीकरून पेशी मारल्या जातात. त्याला वैद्यकीय भाषेत पॅलिएटिव्ह केमोथेरपी म्हणतात. कर्करोगासोबतच इतर आजारांमध्ये केमोथेरपी उपचारपद्धती ही प्रभावी ठरली आहे. उदा. रक्‍ताच्या कर्करोगामधील बोन मॅरो ट्रान्सप्लान्ट, प्रतिकारशक्तीशी संबंधित आजार आदी.

केमोथेरपीमुळे उद्भवणारे धोके

  • केमोथेरपीमुळे रुग्णांमध्ये विविध प्रकारचे दुष्परिणाम जाणवतात. त्यातील प्रत्येक औषधांचा परिणाम वेगवेगळा असतो; मात्र प्रत्येक औषधाचा दुष्परिणाम होतोच असे नाही. 
  • मळमळ, उलट्या, डायरिया, केसगळती, भूक मंदावणे, चक्कर येणे, ताप, तोंडाला फोड येणे, अंगदुखी, बद्धकोष्ठता आदी दुष्परिणाम जाणवतात. यापैकी बरेच उपचारायोग्यही असतात.
  • मात्र काही दुष्परिणाम अनेक दिवस जाणवतात. तसेच गंभीरही असतात. उदा. फुप्फुसातील पेशींना बाधा, हृदयविकार, वंध्यत्व, किडनीविकार, मज्जासंस्थेवर परिणाम, दुसरा कर्करोग होण्याची शक्‍यता, आदी.
  • तुम्ही केमोथेरपी घेत असाल किंवा घेतली असेल आणि भविष्यात कधीही त्रास जाणवल्यास तत्काळ डॉक्‍टरांशी संपर्क साधावा.

केमोथेरपीची पूर्वतयारी
रुग्णाच्या अवस्थेनुसार केमोथेरपीची कोणती प्रक्रिया आणि पद्धत राबवावी, याबाबत डॉक्‍टरांकडून निर्णय घेतला जातो. तत्पूर्वी काही पूर्वसूचना रुग्णांना आणि नातेवाईकांना दिल्या जातात. बहुतांश वेळी केमोथेरपी देण्यासाठी रुग्णाच्या शरीरात काही उपकरणे बसवली जातात. उदा. कॅथेटर, स्टेन्ट, पम्प आदी. त्याद्वारे केमोथेरपी दिली जाते. तत्पूर्वी रुग्णांची तपासणी केली जाते. जेणेकरून रुग्णाचे शरीर केमोथेरपी घेण्यास सक्षम आहे की नाही तपासले जाते. रक्ततपासणी करून रुग्णाच्या किडनी, यकृत आणि हृदयावर केमोथेरपीचा परिणाम होणार नसल्याची खात्री केली जाते. प्रसंगी केमोथेरपीमुळे रुग्णाला वंध्यत्व येण्याची शक्‍यता असते. त्यावेळी रुग्णाला नंतर पालक व्हायचे असल्यास तत्पूर्वी रुग्णांचे वीर्य किंवा स्त्रीबीज जतन करून त्याचा भविष्यात वापर करण्यासाठी जतन करण्याचा सल्ला दिला जातो. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sakal Podcast: फास्ट फूडमुळे अपेंडिक्सचा धोका अधिक ते मोबाइल, लॅपटॉप वापराने टेस्टिंग थंबच्या तक्रारी वाढल्या

आजचे राशिभविष्य - 17 नोव्हेंबर 2024

Uddhav Thackeray : भाजपचा ‘सत्ता जिहाद’ महाराष्ट्राची जनता संपवेल! : उद्धव ठाकरेंची गर्जना

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 17 नोव्हेंबर 2024

साप्ताहिक राशिभविष्य : (१७ नोव्हेंबर २०२४ ते २३ नोव्हेंबर २०२४)

SCROLL FOR NEXT