Navi Mumbai sakal
मुंबई

Navi Mumbai: नवी मुंबईत घडली भीषण दुर्घटना, कंटेनर अंगावर पडून कामगार ठार

Chinmay Jagtap

Jasai Accident: जासई येथील इपिक ग्लोबल सर्व्हिसेसच्या कंटेनर यार्डमध्ये कंटेनर अंगावर पडून कामगाराचा चिरडून मृत्यू झाल्याची घटना बुधवारी रात्री घडली. संदीप चौरसिया असे मृत कामगाराचे नाव आहे.

कलमारचालकाच्या निष्काळजीमुळे ही घटना घडल्याचे आढळल्यानंतर उरण पोलिसांनी त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करून त्याला ताब्यात घेतले आहे.

ट्रेलरचालक असलेला संतोष आंधळे हा बुधवारी रात्री ८.३० वाजता कंटेनर यार्डमध्ये रिकामा कंटेनर ठेवण्यासाठी गेला होता. यावेळी कलमारचालक शिशिर खालखो हा ट्रेलरवरील रिकामा कंटेनर उचलून तो बाजूला ठेवत होता. त्याचवेळी कलमारच्या उजव्या बाजूचे लॉक तुटल्याने हा कंटेनर खाली उभ्या असलेल्या कामगार संदीप चौरसिया याच्या अंगावर पडला. त्याखाली चिरडून त्याचा जागीच मृत्यू झाला. उरण पोलिसांनी या घटनेला जबाबदार धरून खालखो याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan : ९८व्या मराठी साहित्य संमेलनाध्यक्षपदी तारा भवाळकर यांची निवड

रोहित, मैं आपसे बोहोत प्यार करती हूँ! मुलीच्या प्रपोजनंतर Rohit Sharma लाजला पण, पत्नी रितिका... Video Viral

गोफण | सुखाची झोप उडाली, वस्तादांचा मोठा गेम

Latest Maharashtra News Updates: छ्त्रपती संभाजीनगर येथून ८०० यात्रेकरू तीर्थयात्रेसाठी विशेष रेल्वेने अयोध्येकडे रवाना - पालकमंत्री अब्दुल सत्तार

Bigg Boss Marathi 5 grand finale LIVE updates - वोटिंग ट्रेंड्समध्ये निक्कीने सूरजला टाकलं मागे

SCROLL FOR NEXT