मुंबई : मुंबई पालिकेच्या प्रसिद्ध डॉ. आर एन कूपर रुग्णालयातील पाच मृतदेह पडून होते. त्यातील धक्कादायक बाब म्हणजे त्यातील काही मृतदेग हे विलगीकरण कक्षात २२ तारखेपासून २३ तारखेपर्यंत पडून होते. करोनाच्या दहशतीचे या मृतदेहांना आवरणात गुंडाळून शवागरात ठेवण्यासाठी देखील कुणी तयार नाही. त्यामुळे विलगीकरण कक्षातील इतर रुग्णांना दहशतीमध्ये राहावे लागलं.
कूपर रुग्णालयात कोरोना रुग्ण तसेच संशयितांवर उपचार केले जातात. तिथे विलगीकरण कक्ष सुरू करण्यात आला असून त्यात काही रुग्णांना दाखल करण्यात आले आहे. त्यातील एका रुग्णांचा परवा दुपारी 12 वाजता मृत्यू झाला. त्याचा मृत्यू होऊन 24 तास उलटून गेले तरी त्याचा मृतदेह उचलला गेला नाही. तर दुसऱ्या रुग्णाचा परवा रात्री 9 मृत्यू वाजता झाला व तिसऱ्या रुग्णाचा मृत्यू रात्री उशिरा झाला. महत्वाचे म्हणजे हे तीनही मृतदेह २३ तारखेपर्यंत विलागीकरण कक्षातच पडून होते. यासह एकूण पाच मृतदेह अंत्यसंस्काराच्या प्रतीक्षेत असल्याची देखील बाब समोर येतेय.
या तीनही मृत व्यक्तींना कोरोना संशयित म्हणून विलगिकरण कक्षात दाखल करण्यात आले होते. त्यांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. त्यांचे मृतदेह उचलण्यासाठी कामगार नसल्याचे समजते. जे कामगार उपलब्ध आहेत त्यांच्याकडे सेफ्टी किट नसल्याने त्यांनी मृतदेहाला हात लावण्यास नकार दिला आहे. त्यामुळे ते मृतदेह विलागीकरण कक्षातच पडून आहेत. याबद्दल मनसेचे वांद्रे येथील विभाग प्रमुख अखिल चित्रे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे तक्रार ही दाखल केली आहे.
मृतदेह हे कोरोना संशयित रुग्णांचे असल्याने कर्मचारी अश्या रुग्णांना हात लावायला तयार होत नसल्याने विलगीकरण कक्षात काही मृतदेह पडून असल्याचे रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ पिनाकीन गुज्जर यांनी मान्य केले. एक मृतदेह महिलेचा असल्याने तो मृतदेह उचलण्यासाठी महिला कामगार उपलब्ध नसल्याने अडचण झाल्याचे ही ते म्हणाले. अश्या मृतदेहांच्या पंचनाम्यासाठी पोलिस ही सहकार्य करत नाहीत त्यामुळे वेळ लागत असल्याचे ही त्यांचे म्हणणे आहे. मात्र विलगीकरण कक्षातील मृतदेह बाहेर काढून त्यांची विल्हेवाट लावण्यास सुरुवात केली असल्याचे सांगत विलागीकरण कक्षात उपचार घेत असलेल्या बाकी रुग्णांना काही अडचण येणार नसल्याचे ही त्यांनी स्पष्ट केले.
horrible indecent observed in kupar hospital of mumbai bodies of covid patients kept for long time
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.