मुंबई

धारावीत कोरोना हद्दपार, मग दादर अजूनही डेंजर झोनमध्ये का?

सकाळन्यूजनेटवर्क

मुंबई- कोरोना व्हायरसनं सर्वत्र थैमानं घातलं आहे. दिवसेंदिवस कोरोनाबाधितांचा आकडा वाढताना दिसतोय. मुंबईत या व्हायरसचा सर्वाधिक प्रार्दुभाव झाला आहे. शहरात कोरोना रुग्णांचा आकडा वाढत चालला आहे. बुधवारी दिवसभरात मुंबईत १३८१ नवे रुग्ण आढळून आले. त्यामुळे मुंबईत एकूण रुग्णसंख्या ८७, ५१३ वर पोहोचली आहे. सुरुवातीला मुंबईत धारावी शहर हे कोरोनाचं हॉटस्पॉट ठरलं होतं. मात्र आता धारावीतील कोरोना नियंत्रणात आला आहे.  येथे अवघा एक रुग्ण सापडल्याने सर्वानाच आश्चर्याचा धक्का बसला. धारावीतील कोरोनाचा प्रार्दुभाव रोखण्यात मुंबई महापालिका प्रशासनाला यश आलं आहे. मात्र धक्कादायक म्हणजे दादर भाग हा अजूनही डेंजर झोनमध्ये आहे. त्यामुळे या भागातील कोरोना रुग्णाचा आकडा नियंत्रणात आणणं हे आरोग्य प्रशासनासमोर नवं आव्हानं आहे. 

बुधवारी धारावीत केवळ तीन नवे रुग्ण आढळून आले. तर दादरमध्ये ४० आणि माहिममध्ये २४ रुग्ण सापडलेत. धारावी, दादर आणि माहिममधील कोरोना रुग्णांची संख्या ४ हजार ६८१ वर पोहोचली आहे. 

दादरमध्ये १ जुलै ते ८ जुलैपर्यंत सापडले इतके रुग्ण 

१ जुलै- २१
२ जुलै- १२
३ जुलै- २७
४ जुलै- २६
५ जुलै- १६
६ जुलै- २८
७ जुलै- २० 
८ जुलै- ४०

गेल्या आठ दिवसांत दादरमध्ये एकूण १९० रुग्ण सापडलेत. दादरच्या तुलनेत धारावीत गेल्या ८ दिवसांत ७० रुग्ण आढळून आलेत. यामुळे आशिया खंडातील सर्वात मोठी आणि दाटीवाटीची झोपडपट्टी असलेल्या धारावीत कोरोनावर नियंत्रण मिळवणं शक्य झालं आहे. मात्र दादरसारख्या भागात उच्चशिक्षित लोकं असूनही रुग्णसंख्या कमी होण्यापेक्षा त्यात वाढ होताना दिसत आहे. यामुळे आरोग्य प्रशासनानं या भागासाठी चिंता व्यक्त केली आहे. 

दादरमध्ये क्वॉरंटाइन सेंटर, चेस द व्हायरस, कॉन्टॅक्ट ट्रेसिंग आदी गोष्टीची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत असूनही या ठिकाणची रुग्णसंख्या वाढू लागली आहे. 

एकेकाळी धारावी हा कोरोनाचा हॉटस्पॉट

धारावी हा कोरोनाचा हॉटस्पॉट होता. आतापर्यंत येथे 82 मृत्यू झाले असून येथील रुग्णसंख्या 3335 पर्यंत गेली होती. दररोज शंभरावर रुग्ण या ठिकाणी आढळत होते. त्यामुळे येथे कोरोनाची भीती निर्माण झाली होती.  लॉकडाऊनमुळे या भागातील छोटे मोठे उद्योग धंदे ठप्प झाले होते. आता इथले उद्योग धंदे पुन्हा सुरू झालेत. येथे अवघा एक रुग्ण सापडल्याने सर्वानाच आश्चर्याचा धक्का बसला. आता धारावीने मोकळा श्वास घेतल्याचे दिसून येत आहे. धारावीत कोरोना नियंत्रणात आलाय. 

hotspot dharavi corona virus cases control dadar cases increase

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dolly Chaiwala: डॉली चायवाला भाजपचा स्टार प्रचारक! नागपूरमध्ये केला महायुतीसाठी प्रचार

SA vs IND: 23 Six, 17 Fours! जोहान्सबर्गच्या मैदानात सॅमसन-तिलकचं वादळ; भारताचं द. आफ्रिकेला तब्बल 284 धावांचं लक्ष्य

SA vs IND: संजू सॅमसनने तिसऱ्या शतकासह रचला इतिहास! तिलक वर्मानेही ठोकली सलग दुसरी Century

Assembly Elections: २४ ते ३० मतदारसंघ महत्त्वाचे! दोन्ही आघाड्यांना बंडाचा फटका बसणार,'शांती' यज्ञासाठी पळापळ सुरू

Dhruv Rathee: ध्रुव राठीचं चॅलेंज आदित्य ठाकरेंनी स्वीकारलं! ‘मिशन स्वराज’साठी शेअर केली मुद्द्यांची यादी

SCROLL FOR NEXT