File Photo 
मुंबई

फक्त तांदळावर अजून किती दिवस जगायचे?

मयुरी चव्हाण काकडे

कल्याण  :  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र लॉकडाऊन जाहिर करण्यात आले असून अशा गंभीर परिस्थितीत कोणीही गरीब उपाशी राहू नये म्हणून शासनाने 3 महिन्याचे धान्य व मोफत तांदूळ व डाळ देण्याचे घोषित केले आहे. सध्या कल्याण डोंबिवलीमध्ये शिधाधारकांना तांदूळ मोफत मिळत असले तरी कोणत्याही प्रकारची डाळ अद्याप मिळाली नाही. जवळपास सर्वच दुकानांमध्ये डाळ शिल्लक राहिली नसून गहू सुद्धा दिसेनासे झाले आहेत. त्यामुळे रोज तांदळावरच पोट भरायची वेळ आलेल्या शिधाधारकांनी तांदळावरच अजून किती दिवस जगायचे?  असा सवाल उपस्थित केला आहे.

केशरी आणि पिवळ्या रेशन कार्ड धारकांना महिन्यानुसार प्रति व्यक्ती 5 किलो तांदळाचे वाटप होत आहेत. मात्र केंद्र शासनाने महिन्याभरापूर्वी एका कार्ड मागे 1 किलो मोफत डाळही देण्याचे घोषित केले होते. मात्र रेशन दुकानात डाळ मिळत नसल्याच्या तक्रारी रोज येत असल्याचे रेशनिंग कृती समितीच्या सदस्यांनी सकाळशी बोलताना सांगीतले. तर याबाबत काही रेशन दुकानदारांना संपर्क साधला असता 6 महिन्यापूर्वीच धान्याचे चलन भरण्यात आले असून शासन खूप अगोदरच पैसे घेऊन त्याचा वापर करत असल्याचा गौप्यस्फोट नाव न छापण्याच्या अटीवर केला आहे. तर मोफत डाळही अद्याप प्राप्त झाली नाही नसल्याचे त्यांनी म्हणाले.

दरम्यान तहसीलदार कार्यालयाशी संपर्क साधला असता एप्रिल महिन्यासाठीचा चणाडाळ आणि तुरडाळीचा पुरवठा उपलब्ध झाला असून यामध्ये 65 क्विंटल  तूरडाळ आणि 115 क्विंटल चणाडाळ आहे. सर्व प्रक्रिया पूर्ण करून लवकरच डाळींच्या वितरणाला सुरवात होणार असल्याचे सांगण्यात आले. 

शिधाधारक डाळीपासून वंचितच 
नियमित 1 किलो तूरडाळ व चणाडाळ खरेदीसाठी शिधाधारकांना प्रत्येकी 55 ते 45 रुपये मोजावे लागत आहे. मात्र या नियमित डाळींचा साठाही शिल्लक राहिला नसून मोफत डाळही अजून उपलब्ध झाली नसल्याने पोषणयुक्त डाळींपासून गोरगरीबांना मुकावे लागत आहे. 

नागरिकांच्या तक्रारींनंतर गहू काही प्रमाणात उपलब्ध झाले असून डाळी शिल्लकच नसल्याचे सांगण्यात आले. आमची समिती ग्राहक आणि शासन यांच्यामधील दुवा साधण्याचे काम करते. अधिक माहिती घेतली असता बहुतांश दुकानदारांनी गेल्या नोव्हेंबर महिन्यातच धान्याचे चलन भरले असून शासनांकडूनच वेळकाढूपणा केला जात असल्याचे दिसून येते. 
-    विशाल जाधव,
 सदस्य, रेशनिंग कृती समिती

नुसत्या तांदळावर अजून किती दिवस चुली पेटवायच्या?  शासनाने लवकर मोफत डाळ द्यावी. आधीच रोजगार नसल्याने खाजगी दुकानातून डाळ घेणे परवडत नाही. 
-    मनोज  विचारे,
 रिक्षाचालक

दृष्टीक्षेपात 
- राज्यातून रोज सुमारे 200 तक्रारी समितीकडे दाखल 
- स्थलांतरित शिधाधारकालाही शिधा मिळणे अनिवार्य 
-  अनेक शिधाधारकांना ऑनलाइन धान्य वाटपाबाबत माहिती शोधता येत नाही. 
-  किरकोळ दुकानात डाळींच्या दरात 10 ते 25 टक्क्यांनी वाढ

How many more days to live on rice alone?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar: शरद पवार यांची पुन्हा भर पावसात सभा, म्हणाले- अनेकवेळा बोलायला उभा राहिलो की पावसाला सुरुवात होते अन्....

BKC Metro Station: मोठी घटना! 40 फूट खोलवर लागली भयंकर आग, अग्निशमन दलाच्या आठ गाड्या घटनास्थळी

RBI: शक्तीकांता दास RBIचे गव्हर्नर राहणार की राजीनामा देणार? तुमच्या खिशावर काय परिणाम होणार?

...तर त्यांना शिवतीर्थ कसा आशीर्वाद देणार? शिवाजी पार्कवरील मोदींच्या सभेवरून आदित्य ठाकरेंचं टीकास्त्र

Malegaon Crime : पोलिसांनी पकडला प्रतिबंधित गुटखा, ११ लाख ३९ हजार ५६० रुपयांचा माल जप्त

SCROLL FOR NEXT