कीर्तीकरांचा घोषित झालेला विजय वायकरांच्या बाजूनं कसा लागला? वायव्य मुंबईत नेमकं काय घडलं?
Mumbai Loksabha Result:  sakal
मुंबई

Mumbai Loksabha Result: कीर्तीकरांचा घोषित झालेला विजय वायकरांच्या बाजूनं कसा लागला? वायव्य मुंबईत नेमकं काय घडलं?

Komal Jadhav (कोमल जाधव)

ठाकरे विरुद्ध शिंदेंच्या उमेदवारांची लढत ही संपूर्ण राज्यात चांगलीच चर्चेत राहिली. वायव्य मुंबई लोकसभा मतदारसंघातली अमोल कीर्तीकर विरुद्ध रवींद्र वायकर यांच्यात लोकसभेची लढाई एकदम अटीतटीची झाली.

वायकरांनी अवघ्या ४८ मतांनी कीर्तीकरांचा पराभव केला. मतमोजणीवेळी खूप रंजक घडामोडी घडलेल्या दिसल्या. सुरुवातीला कीर्तिकरांचा घोषित झालेला विजय पुढे वायकरांच्या बाजूनं कसा लागला?

कीर्तीकर विरुद्ध वायकर आजी माजी सहकारी लोकसभेच्या रिंगणात एकमेकांसमोर उभे ठाकलेले दिसले. यात सुरुवातीपासूनच कीर्तीकरांनी प्रचारात आघाडी घेतली होती. तशीच मतमोजणीतही ते आघाडीवर होते.

पण पुढे मतमोजणीच्या फेऱ्या वाढल्या तशी दोघांमधली लढाई अत्यंत रंगतदार वळणावर येऊन ठेपली. त्यात अवघ्या २००० मतांनी आधी कीर्तीकरांचा विजय झाल्याचं वृत्त आलं.

त्यानंतर वायकरांनी फेरमतमोजणीची मागणी केली. त्यात वायकर ४६ मतांनी आघाडीवर दिसून आले. मग पुढे फेरमतमोजणी झाली, त्यात अवघ्या एका मतानं कीर्तीकर आघाडीवर असल्याचं दिसून आलं.

त्यानंतर जेव्हा अंतिम मतमोजणी झाली, त्यात पोस्टल मतदान अन् एकूण मतमोजणीअंती अखेर वायकरांचा केवळ ४८ मतांनी विजय झाल्याची घोषणा झाली.

त्यामुळे ४ जूनची संध्याकाळ मुंबईतल्या उत्तर पश्चिम मुंबई मतदारसंघानं गाजवली. उत्तर मुंबई म्हणजेच वायव्य मुंबई या लोकसभा मतदारसंघात मराठीसह अन्य भाषिक मतदारांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्याशिवाय या मतदारसंघात विविध धर्माचेही मतदार आहेत.

मात्र, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर राज्यातील राजकीय समीकरणं पूर्ण बदलली. यामुळं वायव्य मुंबई लोकसभा मतदारसंघात दोन शिवसैनिकांमध्येच लढत झाली. खरंतर आता कीर्तीकर आणि वायकर यांच्यातली लढाई पुन्हा कायद्याच्या कचाट्यात येऊ शकते, अशी चर्चा आहे.

कारण सूत्रांच्या हवाल्यानं साम टीव्हीनं दिलेल्या वृत्तानुसार, ठाकरे गट वायव्य मुंबई लोकसभा मतदारसंघातील निकालाला शिवसेना ठाकरे गट आव्हान देणार असल्याची माहिती आहे. या निकालात काही गडबड झाल्याचा ठाकरे गटाला संशय आहे. त्यामुळे या निकालाला ठाकरे गट आव्हान देणार असून पक्षाकडून यासंबंधी कायदेशीर सल्ला घेत असल्याचं कळतंय.

या सगळ्या संदर्भात शिवसेना ठाकरे गट राष्ट्रपतींना सुद्धा पत्र पाठवणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे शिवसेना पक्षाचं नाव, चिन्ह आणि झेंड्याच्या लढाईनंतर आता वायव्य मुंबई लोकसभा मतदारसंघातील निकालामुळे ठाकरे अन् शिंदेंमधला विस्तव पुन्हा तापलेला पाहायला मिळणार.

या लोकसभा मतदारसंघाबाबत सांगायचं झाल्यास, या मतदारसंघातून अमोल कीर्तीकरांची उमेदवारी जाहीर करुन ठाकरेंनी आणि महाविकासआघाडीनं प्रचाराच्या मैदानात सरशी घेतली होती. तर तिकडे, महायुतीत ही जागा शिवसेनेकडे आली तर उमेदवार कोण असेल? याची चर्चा होती.

कारण शिंदेंचे मुंबईतले उमेदवार घोषित करण्याआधी एक पार्श्वभूमी होती. ती म्हणजे लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात शिंदेंच्या शिवसेनेला काही मतदारसंघांमध्ये उमेदवार बदलावे लागले.

शिर्डी, रामटेक, हिंगोली, यवतमाळ-वाशिम इथले उमेदवार शिंदेंनी बदलले होते. तर इकडे मुंबईचं मतदान अगदी पाचव्या टप्प्यात होतं. अन् तिथूनही विद्यमान खासदार गजानन कीर्तीकरांनी मात्र लेकाविरुद्ध निवडणूक लढण्यास नकार दर्शवला होता.

त्यामुळे अमोल कीर्तीकरांविरुद्ध निवडणुकीच्या रिंगणात कोण उतरणार? त्यावेळी काँग्रेस पक्षातून हकालपट्टी करण्यत आलेल्या संजय निरुपमांचं नाव आणि आमदार रवींद्र वायकरांचं नाव चर्चेत होतं.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai, Pune School Closed: मुंबई, पुण्यातील सर्व शाळांना मंगळवारी सुट्टी जाहीर; अतिमुसळधार पावसाचा इशारा

Jasprit Bumrah Video: फुलांची उधळण अन् आईनं आनंदानं धरलेला ठेका, विश्वविजेत्या बुमराहचं घरी जल्लोषात स्वागत

Suyash Tilak :  ‘मुलांच्या हातात मोबाईल देताय तर, किमान इतकं करा’ सुयश टिळकचा पालकांना सल्ला

Lice Outbreaks Selfies: सेल्फीमुळं डोक्यात उवांचं प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढतंय; अभ्यासातील धक्कादायक निष्कर्ष

Maharashtra News Updates : देश-विदेशातील दिवसभरातील घडामोडी वाचा एका क्लीकवर

SCROLL FOR NEXT