मुंबई

दीड दिवसाच्या गणपती विसर्जनावेळी पालिकेच्या आवाहनाला कसा होता प्रतिसाद, वाचा सविस्तर

समीर सुर्वे

मुंबईः लाडक्या बाप्पांना रविवारी दीड दिवस पूर्ण होताच भावपूर्ण वातावरणात निरोप देण्यात आला. नैसर्गिक विसर्जन स्थळे, कृत्रिम विसर्जन स्थळे आणि फिरती विसर्जन स्थळे येथे कोरोनाबाबतचे नियम पाळत गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात आलं.  मुंबई महानगर पालिकेच्या आवाहनाला प्रतिसाद देत मुंबईतील भाविकांनी यावर्षी गणपती विसर्जनाला कृत्रिम तलावांना पसंती दिली. रात्री ९ वाजेपर्यंत ३१, २५५ गणपतीचे विसर्जन झाले होते. त्यातील १७ हजार ७६४ कृत्रिम तलावात विसर्जित करण्यात आल्या. या काळात कोणताही अनुचित प्रकार घडला नसल्याचं महापालिकेच्या नियंत्रण कक्षातून सांगण्यात आले. 

मुंबईत रात्री १२ वाजेपर्यंत एकूण ४० हजार ८२३ गणपती मूर्तीचं विसर्जन करण्यात आलं. त्यात ९७८ सार्वजनिक आणि घरगुती ३९ हजार ८४५ बाप्पाचं विसर्जन झालं. त्यापैकी कृत्रिम तलावात ७१० सार्वजनिक, घरगुती २२ हजार १४९ असे एकूण २२ हजार ८५९ गणरायांचं विसर्जन करण्यात आलं.

मुंबईत गेल्या वर्षी ३२ कृत्रिम तलाव होते. यंदा कोविडच्या पार्श्‍वभूमीवर ही संख्या १६८ पर्यंत वाढविण्यात आली आहे. तसेच,समुद्र किनारे,तलाव अशा ७० नैसर्गिक स्थळावर विसर्जनाला बंदी करण्यात आली असून तेथे मूर्तीदान करावी लागत आहे.  घरगुती मूर्ती २ फुटापर्यंत आणि सार्वजनिक मूर्ती ४ फुटउंची पर्यंत ठेवण्याच्या सुचना महापालिकेने दिल्या होत्या. महापालिकेने केलेल्या प्रयत्नांना मुंबईतील नागरिकांनीही साथ दिली आहे. मुर्तीची उंची नियमानुसार ठेवण्यात आली आहे. कृत्रिम तलावांनाही उत्तम प्रतिसाद मिळत आहे.

मुंबईत संध्याकाळपर्यंत ३० हजार ६३४ घरगुती मुर्तींचे विसर्जन झाले. त्यात १७  हजार २९२ मूर्ती या कृत्रिम तलावात विसर्जित झाल्या. उर्वरीत मूर्ती नैसर्गिक विसर्जन स्थळांवर पालिकेला दान करण्यात आल्या. ६२१ सार्वजनिक गणेशमूर्ती पैकी ४७२  मूर्ती कृत्रिम तलावात विसर्जित करण्यात आल्या. मुंबईतील सर्व नैसर्गिक विसर्जन स्थळावर पालिकेने मूर्ती संकलन केंद्र सुरु केले आहे. तसेच काही विभागातही हे संकलन केंद्र सुरु केले आहे.

दीड दिवसाच्या गणपतीचे विसर्जन घरापासून जवळ असावं म्हणून मुंबई महापालिकेनं शिवाजी पार्क येथे सोसायटीच्या दारात वाहन आरोहीत विसर्जन हौद उभा केला होता. मुंबईत दीड दिवसाच्या गणपतीचे मुंबईतील दादर येथील कृत्रिम तलावात विसर्जन करण्यात आलं. तसंच गणेश मूर्तींच्या विसर्जनासाठी विशेष फिरत्या कृत्रिम हौदांची निर्मिती करण्यात आली होती. विसर्जनासाठी मोजक्याच व्यक्तींना प्रवेश दिला जात होता. विसर्जनासाठी फुलणारी दादर चौपाटी यंदा सुनीसुनी होती.

(संपादनः पूजा विचारे)

How Response Of citizens Mumbai municipality during one and half days ganpati immersion

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: “आचारसंहिता संपल्याबरोबर डिसेंबरचे पैसे बहिणीच्या खात्यात जमा होतील”; CM शिंदेंची घोषणा

Latest Maharashtra News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? जाणून घ्या एका क्लीकवर

Champions Trophy 2025: झुकेगा नहीं साला... म्हणत होते, पण BCCI समोर पाकिस्तानची शरणागती, भारताचे सामने 'या' देशात

Raj Thackeray: मुल्ला मौलवी उद्धव ठाकरेंसाठी फतवे काढताहेत, राज ठाकरेंचा आरोप! पुतण्याच्या बालेकिल्ल्यात काढला फतवा

Aditya Thackeray: सत्तेत आल्यास पहिला निर्णय शेतक-यांच्या कर्जमाफीचा! आदित्य ठाकरेंची मोठी घोषणा

SCROLL FOR NEXT