मुंबई

लॉकडाऊनमध्ये किराणा दुकानात जातायत ? 'या' गोष्टींची पूर्ण काळजी घ्या...

सकाळवृत्तसेवा

मुंबई : मुंबईसह महाराष्ट्रात कोरोनाचा धोका वाढत चालला आहे. महाराष्ट्रात कोरोबाधितांची संख्या तब्बल ८०० च्या घरात जाऊन पोहोचली आहे. त्यात देशात २१ दिवसांसाठी लॉकडाऊन करण्यात आलं आहे. मात्र जीवनावश्यक वस्तूंचे दुकानं सुरु ठेवण्यात आले आहेत.

तुही जर लॉकडाऊनच्या काळात बाहेर किराणा किंवा इतर जीवनावश्यक विकत घेण्यासाठी जाणार असाल तर सावधान. कारण तुम्ही ज्या दुकानांमध्ये जाताय ती जागा सुरक्षित असेलच असं नाही. अशा ठिकाणी जागी अनेक लोकं खरेदी करण्यासाठी येत असतात. त्यामुळे इथे कोरोनाच्या संसर्गाचा धोका जास्त प्रमाणात असतो. मात्र आता तुम्ही खरेदी गेल्यावरही तुमचं कोरोनापासून संरक्षण कसं करू शकता हे आम्ही आज तुम्हाला सांगणार आहोत.

असं करा खरेदी करताना स्वतःच संरक्षण:

वारंवार घराच्या बाहेर निघू नका:

जर तुम्ही घरातल्या जीवनावश्यक वस्तूंची खरेदी करण्यासाठी बाहेर जाणार असाल तर एकदाच किराणा भरा. वारंवार घराबाहेर येणं-जाणं करू नका. एक यादी तयार करून ठेवा. ज्यामुळे तुम्हाला काय काय खरेदी करायची आहे तुमच्या लक्षात  राहील. त्यामुळे तुम्हाला वारंवार घराबाहेर पडण्याची गरज भासणार नाही. तुम्ही जर वारंवार घराच्या आतबाहेर करत राहिलात तर हे विषाणू घरात धरण्याची शक्यता असते. त्यामुळे वारंवार घराबाहेर पडू नका

योग्य पद्धतीनं करा पेमेंट:

जर खरेदी केल्यानंतर तुम्ही कॅश किंवा कार्डनं पेमेंट करणार असाल तर आत्ताच तसं करणं थांबवा. कारण कार्ड किंवा कॅशनं पेमेंट करताना तुमचा संपर्क तिथल्या लोकांशी येऊ शकतो ज्यामुळे संसर्गाची भीती असते. त्यामुळे शक्य असेल तर ऑनलाईन पेमेंट करा ज्यामुळे तुमचा संपर्क न येता तुम्ही दुकानदाराला पैसे देऊ शकता. BHIM किंवा गुगल पे करा.

फूड पॅकेट्स स्वच्छ धुवून घ्या:

तुम्ही जर अत्यावश्यक गोष्टींमध्ये फूड पॅकेट्स म्हणजेच काही खाण्यापिण्याच्या गोष्टी खरेदी करणार असाल तर आल्यानंतर हे फूड पॅकेट्स स्वच्छ धुवून घ्या. ज्यामुळे यावरचे विषाणू निघून जातील आणि त्यानंतर तुम्ही ते वापरू शकता.

घरी आल्यानंतर हात-पाय स्वच्छ धुवा:

जर विषाणूंचा संसर्ग टाळायचा असेल तर आपले हात आणि पाय वेळोवेळी स्वच्छ धुणं आवश्यक आहे. खरेदी करून घरी आल्यानंतर शक्य असेल तर आपले हात पाय घराबाहेरच धुवून घ्या. ज्यामुळे विषाणू घरात पसरणार नाही आणि संसर्ग होणार नाही.

त्यामुळे बाहेर खरेदीसाठी जाताना या गोष्टींचं नक्की पालन करा. ज्यामुळे तुम्हाला विषाणूंचा संसर्ग होणार नाही.

how to take precautions while going for grocery shopping during pandemic corona crisis    

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Vidhansabha: ठाकरे, काँग्रेस, भाजप, पवार नाही तर 'हा' पक्ष लढवणार महाराष्ट्रात सर्वाधिक जागा!

Washim Assembly Election 2024 : युती-आघाडीला बंडखोरांचे आव्हान, वाशीम विधानसभा मतदारसंघात तिरंगी लढतीचे चित्र

Latest Maharashtra News Updates : पोलिस असल्याच्या बहाण्याने सराफाची फसवणूक

Sharad Pawar : पवार, मुंडे यांनी बीडमधील राष्ट्रवादीतील कलह मिटवला, महायुतीच्या क्षीरसागरांना मिळाले समर्थन

Pune Crime News: पाकिटावर लिहिलं ५० हजार रुपये! आतमध्ये निघाली कागदं; पुण्यात पोलिस असल्याचा बनाव करुन सराफाची फसवणूक

SCROLL FOR NEXT