Fake Doctor arrested esakal
मुंबई

Mumbai News: 12वी पास 'डॉक्टर'चा रुग्णांच्या जीवाशी खेळ; पाच वर्षांपासून चालवत होता दवाखाना, पोलिसांनी ठोकल्या बेड्या

रोहित कणसे

मुंबई : अवघ्या 12वी पास व्यक्तीने कथितरित्या गोवंडीत दावाखाना उभारून रुग्णांवर उपचार करणे सुरु केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या बनावट डॉक्टरला अखेर गुन्हे शाखेने अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार अल्ताफ हुसेन (50) असे आरोपीचे नाव असून तो गेल्या पाच ते सहा वर्षांपासून रुग्णांवर उपचार करत होता.

गुन्हे शाखेने दिलेल्या माहितीनुसार, शिवाजीनगर, गोवंडी परिसरात वैद्यकीय क्षेत्रातील कोणतीही पदवी किंवा प्रशिक्षण नसलेले काही लोक वैद्यकीय उपचार घेऊन आपले आरोग्य धोक्यात आणत असल्याची माहिती मिळाली होती. याच माहितीच्या आधारे पालिकेच्या स्थानिक सहाय्यक वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या मदतीने गुन्हे शाखेने बनावट रुग्ण पाठवून हुसेन याच्या रुग्णालयात छापा टाकला.

कोणताही अधिकृत वैद्यकीय परवाना नसताना आणि महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलकडे नोंदणी नसताना डॉक्टर असल्याचे भासवून विविध आजारांवर रुग्णांवर बेकायदेशीरपणे उपचार करताना त्याला पकडण्यात आले. स्टेथोस्कोप, विविध प्रकारच्या इंजेक्शनच्या बाटल्या, सिरिंज, विविध प्रकारची औषधे आणि अँटीबायोटिक गोळ्या असे वैद्यकीय साहित्य जप्त करण्यात आले. तो बारावी उत्तीर्ण असून गेल्या पाच-सहा वर्षांपासून हे क्लिनिक चालवत होता. त्याच्याविरुद्ध शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चौकशीदरम्यान हुसेन याने तो उत्तर प्रदेशातील त्याच्या गावातून बारावी पास असल्याचे सांगितले. तसेच यापूर्वी त्यांने मुंबईत कंपाउंडर म्हणून एका डॉक्टरच्या हाताखाली मुंबईत काम केलं असल्याचे देखील सांगितले. त्यानंतर औषधांबद्दल थोडी माहिती झाल्यानंतर त्याने गोवंडी येथील झोपडपट्टीत स्वतःचा दवाखाना सुरु केला.

भारतीय दंड संहितेच्या कलम 419 आणि 420 तसेच महाराष्ट्र मेडिकल प्रॅक्टिशन कमर्स ऍक्टच्या संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याला न्यायालयात हजर करण्यात आले, यानंतर त्याची रविवारी न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली, अशी माहिती शिवाजी नगर पोलिस ठाण्याच्या अधिकाऱ्याने दिली. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT