मुंबई : भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या ज्या नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले, त्यांची प्रकरणं बाहेर काढली. त्यामुळं त्यांच्याविरोधात ईडीच्या कारवाया सुरु झाल्या. पण तेच लोक आता भाजपसोबत सरकारमध्ये सहभागी झाले आहेत. यावरुन सोमय्या यांना सोशल मीडियावर ट्रोल केलं जात होतं. या ट्रोलिंगवर सोमय्या पहिल्यांदाच बोलले आहेत. (I did my duty Kirti Somaiya spoke for first time on NCP inclusion in government)
मुंबईतील माहिम रेल्वे स्टेशन इथं झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या १७ व्या वर्षपूर्तीनिमित्त श्रद्धांजलीपर कार्यक्रमानंतर मीडियाशी ते बोलत होते. सोमय्या म्हणाले, "मी माझं कर्तव्य पार पडलं आहे. शेवटी पक्षाचा निर्णय असतो. पक्ष विशिष्ट पद्धतीनं काम करत असतो. अनेक ठिकाणी न्यायालयीन कारवाई सुरू झाली आहे. न्यायालयात खटला सुरू असताना त्यावर बोलणं बरोबर नाही" (Latest Marathi News)
नागपूर इथं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात बोलताना "ते नागपूरला लागलेला कलंक आहेत", अशा शब्दांत उद्धव ठाकरेंनी कडाडून टीका केली होती. यावर बोलताना सोमय्या यांनी ठाकरेंवर सडकून टीका केली. म्हणाले, "वास्तविक ठाकरे हे व्यक्तीपेक्षा देशापेक्षा कलंक आहेत. उद्धव ठाकरेंनी हिंदुत्वाला तिलांजली वाहिली आहे, हाच मोठा कलंक आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाला त्यांनी तिलांजली वाहिली आहे" (Marathi Tajya Batmya)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.