raj kundra  Team esakal
मुंबई

'मी शरमेनं चेहरा लपवत नाही'; अखेर राज कुंद्राने सोडलं मौन

खटल्याला सामोरं जाण्यास तयार असल्याचं केलं स्पष्ट

स्वाती वेमूल

अश्लील चित्रफितनिर्मिती प्रकरणी जामिन मिळाल्यानंतर काही महिन्यांनी अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा (Shilpa Shetty) पती आणि व्यावसायिक राज कुंद्राने (Raj Kundra) आपली प्रतिक्रिया दिली आहे. 'न्यूज १८'ने दिलेल्या वृत्तानुसार, राजने या संपूर्ण प्रकरणाला 'विच हंट' म्हटलं आहे. त्याचप्रमाणे 'पॉर्नोग्राफी'च्या निर्मिती आणि वितरणात कधीही सहभागी नसल्याचं त्याने सांगितलं आहे. आपण खटल्याला सामोरं जाण्यास तयार असून न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास असल्याचं राज म्हणाला.

राजकडून जारी करण्यात आलेल्या निवेदनात त्याने म्हटलं आहे, "सर्वांत आधी मी हे सांगू इच्छितो की मी माझ्या आयुष्यात कधीही 'पॉर्नोग्राफी'ची निर्मिती किंवा वितरण केलं नाही. हा संपूर्ण प्रकार जणू एक 'विच हंट' (आपणच समाजाचे एकमेव कैवारी असल्याचं मानून केलेली दांडगाई) होता. हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. त्यामुळे मी यावर अधिक काही बोलू शकत नाही. परंतु मी खटल्याला सामोरं जाण्यास तयार आहे आणि न्यायव्यवस्थेवर माझा पूर्ण विश्वास आहे. सत्याचा विजय होईल."

"दुर्दैवाने मीडियाने मला आधीच 'दोषी' घोषित केलं आहे. त्यामुळे मला आणि माझ्या कुटुंबीयांना (सतत) त्रास सहन करावा लागत आहे, माझ्या मानवी आणि संवैधानिक अधिकाऱ्यांचं वेगवेगळ्या स्तरांवर उल्लंघन होत आहे. ट्रोलिंग, नकारात्मकता यांमुळे मानसिकदृष्ट्या मी खचतोय. मी शरमेनं माझा चेहरा लपवत नाही, परंतु या सततच्या मीडिया ट्रायलमुळे माझ्या खासगी आयुष्यात कोणाचीही घुसखोरी होऊ नये, अशी माझी इच्छा आहे. माझं प्राधान्य नेहमी माझं कुटुंब राहिलं आहे. या क्षणी इतर काहीही महत्त्वाचं नाही. माझा विश्वास आहे की प्रत्येक व्यक्तीला सन्मानानं जगण्याचा अविभाज्य अधिकार आहे आणि मीसुद्धा तीच विनंती करतो," असं राजने आपल्या निवेदनात म्हटलं आहे.

अश्लील चित्रफित निर्मिती आणि वितरणप्रकरणी जुलै महिन्यात मुंबई पोलिसांनी राजला अटक केली होती. याप्रकरणी राजची पत्नी शिल्पा शेट्टीचीही मुंबई पोलिसांकडून चौकशी करण्यात आली होती. मात्र या प्रकरणाशी आपला कोणताही संबंध नसल्याचं शिल्पाने स्पष्ट केलं होतं. २० सप्टेंबर रोजी मुंबई कोर्टाने राजला ५० हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामिन मंजूर केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Baba siddiqui case: बाबा सिद्दीकींच्या हत्येचा कट रचणाऱ्या शुभम लोणकरच्या निशाण्यावर पुण्यातील बडा नेता; पोलिस तपासात धक्कादायक माहिती

Mumbai Temperature: मुंबईच तापमान पुन्हा वाढलं, कमाल तापमान ३६.८ अंशांवर

Government Job: जिल्हा परिषद भरतीमध्ये घोळ? 19 नोव्हेंबरपर्यंत स्पष्टीकरण सादर करण्याचे कोर्टाचे आदेश

इलेक्शन ड्युटी नाकारणाऱ्या ८७२ कर्मचाऱ्यांना नोटिसा! प्रशिक्षणालाही दांडी, निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी काढली यादी; आता दाखल होणार गुन्हे अन्‌ शिस्तभंगाची कारवाई

Latest Maharashtra News Updates : गृह मतदान मोहिमत ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगांनी बजावला मतदानाचा हक्क

SCROLL FOR NEXT