नालासोपारा : विरारच्या ICICI बँकेत धारधार हत्याराने निर्घृणपणे असिस्टंट मॅनेजर या महिलेची हत्या (Murder) आणि कॅशियर महिलेला गंभीर जखमी करून, लूटमार (robbery) करणारा विकृत आरोपी अनिल दुबेने (Culprit Anil dubey) स्वत: मॅनेजर म्हणून काम करत असलेल्या अक्सिस बँकेतही घटनेच्या आदल्या दिवशी 26 लाख 84 हजाराचा अपहार (fraud) केले असल्याचे उघड झालं आहे. याबाबत शुक्रवार ता 30 रोजी वालीव पोलीस ठाण्यात (FIR) अनिल दुबे विरोधात भादवी कलम 408, 409 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (ICICI bank robbery and murder case culprit Anil dubey frauds in axis bank too-nss91)
वसईच्या नायगांव येथील अक्सिस बँकेत अनिल दुबे हा मॅनेजर पदावर काम करीत होता. आपल्या या पदाचा त्यांन दुरुपयोग करून, हा अपहार केल्याचं उघड झालं आहे. 28 जुलै रोजी बँकेत दिवसभरात जमा झालेली रोख रक्कम करन्सी चेस्ट करिता पाठवण्या ऐवजी, करन्सी साठी गाडीच आली नाही, असा बहाना करून, ग्राहकाच्या खात्यात अडजेस्ट करू असे बोलून ती रक्कम स्वत:च्या निळ्या रंगाच्या बॅग मध्ये नेऊन, ती स्वता कडे ठेवून अपहार केला आहे.
विरार च्या ICICI बँक दरोडयांच्या घटनेत अनिल दुबे यांचे नाव समोर आल्या नंतर, दुबे यांनी axis बँकेतील दिवसभराची कॅश 26 लाख 84 हजार रुपये ही करन्सी ची गाडी आली नाही असे दाखवून स्वताच्या घरी नेली असल्याचे तेथील कॅशियर ने ही माहिती आपल्या वरिष्ठ ना दिली. डहाणू ते नायगाव या परिसरातील axis बँकेचे क्लस्टर हेड बुरझिन दारा दादीमास्टर यांनी दुसऱ्या दिवशी बँकेत जाऊन पाहणी केली असता या रकमेचा अपहार झाल्याचे उघड झाले आहे. यावरून त्यांनी तात्काळ नायगाव axis बँकेचा मॅनेजर अनिल दुबे विरोधात वालीव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून वालीव चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कैलास बर्वे, पोलीस निरीक्षक राहुल कुमार पाटील यांनी तात्काळ घटनास्थळाची भेट घेऊन पाहणी केली आहे. आरोपी अनिल दुबे हा विरार पोलिसांच्या ताब्यात असल्याने त्याचा ताबा घेऊन या घटनेची अधिक तपास करण्यात येणार असल्याची माहिती तापासाधिकारी पोलीस निरीक्षक डी एस कारंडे यांनी दिली आहे. अनिल दुबे हा उच्च शिक्षित आहे.
त्याला मॅनेजर पदावर जवळपास 1 लाखा पर्यंत पगार असल्याची माहिती समोर आली आहे. पण त्याने हाऊसिंग लोन, कार लोन, पर्सनल लोन घेतले होते. पगार 1 लाख आणि कर्जाचे हप्ते 1 लाख 9 हजार भरावे लागत होते. 'अंथरून बघून पाय पासरावे' ही म्हण आहे. पण पगारा पेक्षा जास्त कर्ज काडून खोटे शोकच्या आहारी गेल्याने तो कर्जबाजारी झाला होता. आणि याच कर्जबाजारी पानातून त्याने शॉर्ट कट मार्ग निवडून विकृतीकडे वळला असल्याचे पोलीस सूत्रा कडून समजले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.