मुंबई: गेल्या दोन महिन्यापासून कोरोनाचा (Coronavirus) प्रसार झपाट्याने वाढत होता. या संसर्गाला आळा घालण्यासाठी मुंबई पालिकेचे आयुक्त (Brihanmumbai Municipal Corporation) इकबाल सिंह चहल (Iqbal Singh Chahal) यांच्या नेतृत्वाखाली एक विशिष्ट मॉडेल राबवण्यात आले. त्याचा परिणामदेखील आकड्यांवर दिसून आला. एकेकाळी दररोज ५० हजारांवर आढळणारे नवे रूग्ण आता निम्म्यावर आले. खुद्द सुप्रीम कोर्टाने (Supreme Court) मुंबई पालिकेच्या (Mumbai Model) कार्यप्रणालीचे कौतुक केलं. तसेच, दिल्ली सरकार (Delhi Government) आणि केंद्र सरकारच्या (Central Government) कोविड टास्क फोर्सच्या सदस्यांनी मुंबई पालिकेच्या मॉडेलची नीट माहिती करून घ्यावी, असे निर्देशही दिले. याच मुद्द्यावर मुंबई पालिकेचे आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी इंडियन एक्सप्रेसला मुलाखत दिली. त्यावेळी त्यांनी काही मुद्दे स्पष्ट केले. (If someone laughs at Mumbai Model how can I share details with them Asks BMC Chief Iqbal Singh Chahal)
"सध्या मुंबई मॉडेलची वाहवा होत आहे. ही बाब आमच्यासाठी सुखद आहे. पण दोन महिन्यांपूर्वी भारत सरकारमध्ये असलेले प्रशासकीय सेवेतील काही मित्र मला फोन करायचे. त्यावेळी ते मला विचारायचे की मुंबई आणि महाराष्ट्रातच कोरोनाचा प्रसार एवढा का वाढतोय? इतकंच नाही, तर ते प्रश्न विचारून आमच्यावर हसायचे. आता माझा असा प्रश्न आहे की जे लोक आमच्या कार्यपद्धतीवर हसत होते, त्या लोकांशी मी मुंबई मॉडेल कसं शेअर करणार?", असा प्रश्न चहल यांनी उपस्थित केला.
"एक गोष्ट अत्यंत महत्त्वाची आहे. ती प्रत्येक अधिकाऱ्याने लक्षात घेतली पाहिजे. जेव्हा एखादी आपत्ती येते, तेव्हा अधिकाऱ्यांना अभ्यास करत बसण्याचा किंवा शिकत बसण्याचा वेळ मिळत नाही. इतरांचे मॉडेल्स कॉपी करून त्याची अंमलबजावणी करण्याचा वेळही फारसा मिळत नाही", असंदेखील चहल यांनी स्पष्ट केलं.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.