IIT Bombay Eureka 2023 eSakal
मुंबई

Eureka : आयआयटी बॉम्बे भरवतंय आशियातील सर्वात मोठी बिझनेस मॉडेल स्पर्धा; कोट्यावधींची बक्षीसे! अशी करा नोंदणी

Business Model Competition : यावर्षीची युरेका 2023 स्पर्धा ही आणखी भव्य असणार आहे.

सकाळ डिजिटल टीम

आयआयटी बॉम्बेमध्ये यावर्षी पुन्हा एकदा 'युरेका' स्पर्धा पार पडणार आहे. यासाठी नोंदणी सुरू झाली असून, यामध्ये कोट्यवधींची बक्षीसं देण्यात येणार आहेत. IIT बॉम्बेच्या ई-सेलने ही स्पर्धा आयोजित केली आहे.

आयआयटी बॉम्बेचा ई-सेल ही विद्यार्थ्यांमार्फत चालवली जाणारी भारतातील आघाडीची नॉन-प्रॉफिट संस्था आहे. देशातील तरुणांमध्ये उद्योजकतेची भावना निर्माण करणे, आणि त्याला चालना देणे हे या संस्थेचं उद्दिष्ट आहे. त्यांच्या या उपक्रमाला युनेस्को, स्टार्टअप इंडिया, मेक इन इंडिया अशा मोठमोठ्या संस्थांकडून समर्थन आणि मान्यता मिळाली आहे.

युरेका ही या संस्थेची बिझनेस मॉडेल स्पर्धा आहे. या स्पर्धेचं यंदा 26वं वर्ष आहे. जवळपास 15 हजारांहून अधिक टीम्सचा सहभाग आणि 1.2 कोटी रुपयांची रोख बक्षीसे असणारी ही स्पर्धा आशियातील सर्वात मोठी बिझनेस मॉडेल स्पर्धा ठरली आहे. (IIT Bombay)

युरेकाचा उद्देश हा स्टार्टअप्स आणि अभिनव स्टार्टअप कल्पना असणाऱ्या लोकांना मार्गदर्शन करणे, निधी उपलब्ध करून देणे, इनक्युबेशन, नेटवर्किंग आणि इतर अनेक प्रकारच्या संधी उपलब्ध करून मार्केट रेडी स्टार्टअप करण्यासाठी मदत करणे हा आहे. युरेकाने यापूर्वी झोस्टेल, प्रतिलिपी, देहाट, लीफ अशा प्रसिद्ध स्टार्टअप कंपन्या सुरू करण्यास मदत केली आहे. 2021 साली युरेका स्पर्धा जिंकणाऱ्या कंपनीने दुबई वर्ल्ड एक्स्पोमध्ये भारताचं प्रतिनिधित्व केलं होतं.

यावर्षीची युरेका 2023 स्पर्धा ही आणखी भव्य आहे. अ‍ॅक्सिस बँक, वेस्टब्रिज कॅपिटल, अमरा राजा बॅटरीज यांच्या संयुक्त विद्यमाने ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. यामध्ये इनोव्हेशन पार्टनर म्हणून मारुती सुझूकी, हेल्थकेअर पार्टनर म्हणून एमिल फार्मा आणि गोल्ड पार्टनर शिरू स्टार्टअप कॅफे हेदेखील आहेत.

ही केवळ एक स्पर्धा नाही, तर तुमच्या स्टार्टअपना सादर करण्याची आणि मोठं करण्याची एक सुवर्णसंधी आहे. जर तुमच्याकडेही अशी एखादी कल्पना असेल, जी लोकांचं जीवन बदलू शकते आणि स्टार्टअप ते युनिकॉर्न असा प्रवास करू शकते; तर या स्पर्धेत नक्कीच नोंदणी करा.

अशा प्रकारे करा नोंदणी

युरेका 2023 मध्ये सहभागी होण्यासाठी आता ecell.in/eureka या वेबसाईटला भेट द्या. याठिकाणी असणारा फॉर्म भरून तुम्ही या स्पर्धेत सहभागी होऊ शकता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahayuti Manifesto: महायुतीकडून कोल्हापूरच्या प्रचार सभेत वचननामा जाहीर; जनतेला दिली ‘ही’ १० आश्वासनं

Sharada Sinha: बिहारच्या गानकोकिळा शारदा सिन्हा यांचं निधन! दिल्लीच्या एम्समध्ये घेतला शेवटचा श्वास

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, महिन्याला मिळणार 2100 रुपये

Latest Marathi News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

Porsche Car Accident : रक्ताचे नमुने बदलण्यास सांगणाऱ्याचा अटकपूर्व जामीन सर्वोच्च न्यायालयानेही फेटाळला

SCROLL FOR NEXT