मुंबई

IIT मुंबईची पोरं हुशार!! मोठा प्रयोग केला यशस्वी

ज्याची टंचाई त्यावरच शोधला उपाय

दीनानाथ परब

मुंबई: कोरोनाच्या या संकटकाळात ऑक्सिजन (oxygen crisis) अत्यंत महत्त्वाचा आहे. कोरोना व्हायरसची लागण झाल्यानंतर शरीरातील ऑक्सिजनची पातळी खालावत जाते. अशावेळी कृत्रिमरित्या शरीराला ऑक्सिजन द्यावा लागतो. कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे मध्यंतरी ऑक्सिजनची मोठी कमतरता निर्माण झाली होती. ऑक्सिजन अभावी देशात अनेक रुग्णांचा मृत्यू सुद्धा झाला आहे. (IIT mumbai made devises way to reuse exhaled Oxygen)

ऑक्सिजनची हीच गरज लक्षात घेऊन, IIT मुंबईचे (iit mumbai) माजी विद्यार्थी आणि प्राध्यापकांनी ऑक्सिजनच्या पूनर्वापराचा अभिनव मार्ग शोधून काढला आहे. त्यामुळे कोरोना रुग्णांसाठी अत्यावश्यक बनलेल्या ऑक्सिजन सिलिंडरचा वापर वाढवता येणार आहे. सध्या कोरोनाच्या गंभीर रुग्णाला दिवसाला नऊ ऑक्सिजन सिलिंडर्सची गरज लागते. प्रस्तावित मेथडनुसार, दिवसाला एक ते दोन सिलिंडर्सची गरज लागेल.

आयआयटी मुंबईच्या टीमने श्वासोश्वासासाठी लागणारे 'द रीब्रिदर' नावाचे एक उपकरण बनवले आहे. या उपकरणामुळे ऑक्सिजनचा पूनर्वापर शक्य आहे. सद्य स्थितीत रुग्णालये ऑक्सिजन तुटवडयाचा सामना करत असताना, 'द रीब्रिदर' मुळे ऑक्सिजन वाया जाण्याचे प्रमाण कमी होईल. आयसीयूमध्ये दाखल असलेल्या कोरोना रुग्णांना प्रतिमिनिटाला ५० लीटर ऑक्सिजन दिला जातो. त्यातला १ ते दीड लीटर ऑक्सिजनचा प्रत्यक्षात वापर होतो. ९० टक्के ऑक्सिजन हवेमध्ये वाया जातो.

बॉटल ऑक्सिजनचा प्रभावी पद्धतीने वापर होऊ शकतो. रीब्रिदरच्या प्रदर्शनातून आम्ही हे दाखवून दिलेय, असे आयआयटी मुंबईचे प्राध्यापक संतोष नोरॉनहा यांनी सांगितले. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिले आहे. या उपकरणाच्या क्लिनिकल चाचण्या सुरु आहेत. हे प्रोटोटाइप बनवण्याचा १० हजार रुपये खर्च आला. आयआयटीने आता हे तंत्रज्ञान स्वीकारण्यासाठी, त्यावर अधिक काम करण्यासाठी इंजिनिअर्स, उत्पादकांना पुढे येण्याचे आवाहन केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gaurav Nayakwadi : भावी मुख्यमंत्री पराजित होणार....गौरव नायकवडी यांची जयंत पाटील यांच्यावर नाव न घेता टीका

Raj Thackeray: 17 तारखेला शिवाजी पार्कवर राज ठाकरेंची तोफ धडाडणार नाही, ठाकरेंनीच सांगितले सभा रद्द होण्याचे 'हे' कारण

Latest Maharashtra News Updates : पुण्यातील हडपसरमध्ये इमारतीला भीषण आग

Winter Skincare: हिवाळ्यात त्वचा सतत कोरडी आणि निस्तेज वाटते? मग हे ६ उपाय वापरून घेऊ शकता तुमच्या त्वचेची काळजी

Instagram Reels: इंस्टाग्राम रील्सवर 1 मिलियन व्ह्यूजसाठी किती पैसे मिळतात? रक्कम जाणून तुम्हीही व्हाल थक्क

SCROLL FOR NEXT