मुंबईः कोरोना व्हायरसनं सर्वत्र विळखा घातला आहे. कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. मुंबई शहरात कोरोनाबाधितांचा आकडा जास्त आहे. कोरोनाचा प्रार्दुभाव या शहरात जास्त झालेला पाहायला मिळतो. अशातच एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. मुंबईतील कोरोनाचा प्रादुर्भाव पुढील दोन आठवड्या नियंत्रणात येईल, असा अंदाज आयआयटी मुंबईच्या प्राध्यापकांनी एका गणितीय प्रारूपानुसार व्यक्त केला आहे. एका वृत्तापत्रानं या संदर्भातलं वृत्त दिलं आहे. तर राज्यात पुढील दोन महिन्यांत संक्रमण रोखण्यात यश येईल, असंही अहवालात सांगण्यात आलंय.
आयआयटी मुंबईच्या संगणकशास्त्र विभागातील डॉ. भास्करन रमण यांनी हा अहवाल दिला आहे. पुढील दोन आठवडयात मुंबईतील संक्रमण नियंत्रणात येईल, असा अंदाज त्यांनी व्यक्त केलाय. ‘लेविट्स मॅट्रिक्स’ या गणितीय प्रारूपाच्या आधारे हा अंदाज व्यक्त करण्यात आलाय. रुग्णांची संख्या, मृत्यू दर त्यासाठीचा कालावधी याचा आधार डॉ. रमण यांनी यासाठी घेतला.
आयआयटीनं दिलेल्या अहवालानुसार मुंबईत कोरोनाचे रुग्ण बरे होण्याचा दर 70 टक्क्यांपर्यंत वाढला आहे. दोन आठवड्यात मुंबईत कोरोना नियंत्रणात येईल असा अंदाज या अहवालातून व्यक्त करण्यात आल्यानं मुंबईकरांना दिलासा मिळालाय.
मुंबईतली सद्यस्थिती
शनिवारी कोरोनाच्या रुग्णांनी १ लाखांचा टप्पा ओलांडल्यानं प्रशासनाच्या डोकेदुखीत वाढ झाली आहे. मुंबईत रविवारी दिवसभरात १०४६ नवीन रुग्ण आढळल्यानं कोरोनाशी दोन हात करणाऱ्या अत्यावश्यक सेवांवरील भार दिवसेंदिवस वाढतच आहे. मुंबईत रविवारी दिवसभरात ६४ जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात कोरोनाबाधित रुग्णांमध्ये मुंबई दुसऱ्या क्रमांकावर आहे.
रुग्ण दुपटीचा कालावधी ५५ दिवसांवर
मुंबईमधील कोरोना रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी ५५ दिवसांवर पोहोचला असून, रुग्णसंख्या वाढीचा दर १.२६ टक्क्यांवर आलाय. पालिकेने केलेल्या विविध उपाययोजनांमुळे मुंबईतील कोरोनाबाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७० टक्क्यांवर पोहोचले आहे.
IIT professor predicts covid 19 will reduce upcoming 2 weeks in mumbai
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.