Mumbai Bulldozer Action:
मीरा रोड येथील नया नगर परिसरात बेकायदा बांधकामे आणि अतिक्रमणे बुलडोझरने उद्ध्वस्त केली. महाराष्ट्र सरकारच्या सूचनांनंतर पोलिसांच्या मदतीने महापालिका कारवाई करत आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री (Devendra Fadnavis) देवेंद्र फडणवीस यांनी मिरा रोड परिसरातील अतिक्रमणांवर कारवाई करण्यात येईल, असे सांगितले होते. त्यानंतर पोलिसांनी अवघ्या ४८ तासांत ही मोठी कारवाई केली आहे.
बेकायदा अशी बांधकामे पाडून सपाट करण्याचे काम सुरू आहे. कायदा आणि सुव्यवस्था बिघडू नये म्हणून जवानांचा फौजफाटा घटनास्थळी तैनात आहे. पोलिसही घटनास्थळी फ्लॅग मार्च काढत आहेत. या परिसरात जे काही बेकायदा बांधकाम आहे ते पोलीस प्रशासनाकडून पाडण्यात येत आहे. (Mumbai News)
घटनास्थळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. लोकांची गर्दी होऊ नये म्हणून जवळच्या सोसायटीचे दरवाजे बंद करण्यात आले आहेत.
श्री राम शोभा यात्रा मीरा रोडच्या नया नगर परिसरातून जात असताना झालेल्या हाणामारीत सोमवारी रात्रीपर्यंत पोलिसांनी १३ हून अधिक लोकांना अटक केली होती. पोलिसांनी सांगितले की, जमावाने मिरवणुकीवर दगडांनी हल्ला केला, ज्यात भगवे झेंडे असलेल्या कार आणि दुचाकींचा समावेश होता, ज्यात काही लोक जखमी झाले. (Latest Marathi News)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.