महाराष्ट्राची ओळख आज ही 'पुरोगामी महाराष्ट्र' अशी करून दिली जाते. परंतु ही ओळख काळानुसार बदलत चालली आहे. कोणे एके काळी ती संतांची भूमी म्हणून पुरोगामी होती. नंतर त्यात भर पडली ती छत्रपती शिवरायांच्या कार्य-कर्तृत्वाची. 19 व्या शतकात सत्यशोधक चळवळ आणि इतर सुधारणावादी चळवळीमुळे परिवर्तनाचे वारे वाहू लागले आणि जातीअंताची चळवळ करणारा महाराष्ट्र, स्त्री सन्मानासाठी उभा ठाकणारा 'महाराष्ट्र' अशी राज्याची ओळख झाली. पण राज्यातील सध्याचे वातावरण बघता ही ओळख आपण झपाट्याने पुसण्याचा प्रयत्न तर करत नाही? असा प्रश्न निर्माण होऊ लागला आहे. गेल्या काही दिवसांतील घटना पहिल्या तर हे प्रकर्षाने जाणवेल. त्यामध्ये कोपर्डी प्रकरण असो किंवा राईनपाडा हत्याकांड असे अनेक प्रकार आपल्या पुरोगामी महाराष्ट्रात घडू लागले आहेत.
महत्त्वाची बातमी - भाजपचेच प्रवक्ते म्हणतात 'त्या साध्वी मूर्ख आहेत, त्या आमच्या पक्षात आहेत हे आमचं दुर्दैव'
आता आजचं उदाहरण घ्या. जालन्यात चार जणांच्या टोळक्याने एका प्रेमीयुगुलाला बेदम मारहाण करुन तरुणीचा विनयभंग केला. यामध्ये सगळ्यात संताप आणणारी गोष्ट म्हणजे या टोळक्याने मारहाण करतानाचा व्हिडीओ बनवला. या टोळक्याने प्रेमी युगुलाला बेदम मारहाण केली. त्यानंतर मुलीची कॉलर पकडून तिला फरफटत आहेत. "आम्ही चुकीचं काही केलं नाही. इथे तळं होतं म्हणून आलो. दादा प्लीज, यानंतर नाही होणार, असं सांगत संबंधित तरुण टोळक्यासमोर तरुणीला सोडण्याची विनंती करत आहे. मात्र तरीही या टोळक्यानी त्या मुलीला तसंच पकडून ठेवलं. "हिच्या वडिलांना फोन लाव, बापाला बोलावून घे" असं बोलत त्यांना ते धमकवात होते. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार हे ते दोघे बुलडाणा जिल्ह्यातील आहेत. या हाणामारीचा व्हिडिओ वायरल झाल्यामुळे याची माहिती पोलिसांना मिळाली. आता पोलिसांनी तपास सुरु केला आहे. तपासात आता हे कोण आहेत हे पुढे येताना पाहायला मिळतंय.
महत्त्वाची बातमी - रेशन कार्ड 'आधार'ला जोडा, अन्यथा...
हल्ली प्रत्येकाच्या हातात स्मार्टफोन असल्यामुळे कोणत्याही गोष्टीचा व्हिडिओ बनवायचा ही मानसिकता तयार झाली आहे. व्हिडिओ तयार करण्याचा भूत इतकं डोक्यावर आहे, एखादा जखमी मदतीसाठी याचना करत असेल तर लोक त्याकडे दुर्लक्ष करत व्हिडिओ बनवत असतात. अशा लोकांनी आपले प्रिय पूज्य गेल्यानंतर हा प्रकार करू नये ही अपेक्षा धरणे धोक्याचे आहे असं वाटायला लागलंय. हे असं का होतंय? याच्या मुळाशी जाणं अत्यंत आवश्यक बनलं आहे. यातील सर्वात महत्वाचं कारण म्हणजे सध्या समाजामध्ये असणाऱ्या वातावरणामुळे मुलं ओव्हर एक्सपोझ होऊ लागली आहेत. एकदंरीत तिरस्काराची भावना देखील वाढीस लागल्याचे आढळत आहे.
महत्त्वाची बातमी - मालामाल होण्याची सुवर्णसंधी, फक्त मगरीच्या गळ्यातला टायर काढा..
पुरोगामी महाराष्ट्राची ओळख पुसट होत चालली आहे ही चिंतेची बाब आहे. महाराष्ट्र राज्य मुलांच्या विकासासाठी नेहमी अग्रेसर राहिले आहे. पण अशा घटनांनी राज्याची प्रतिमा डागाळत आहे. हे कुठे तरी बदलणे आवश्यक आहे. त्यासाठी आपल्यासारख्या लोकांनी आवाज उठवण्याबरोरच जण जागृती करणे गरजेचे आहे. या गोष्टींकडे दुर्लक्ष करून आपण अजाण राहू शकत नाही. अजाण अवस्थेत राहणं म्हणजे अंधारात राहण्यासारखं आहे. या ठिकाणी मला 'द आरटीआय स्टोरीज'च्या मराठी अनुवादित प्रस्तावना आठवते. त्यात म्हटले आहे की, कोणी व्यक्ती अजाण अवस्थेत राहत असेल तर तिची बुद्धिमत्ता क्षीण होते, तिच्यातील मानवी सामर्थ्याची झीज होत जाते आणि त्याहून वाईट म्हणजे अशा व्यक्तीवर अवलंबून असलेले लोक संकटात सापडतात. एखाद्या व्यक्तीच्या अजाणपणाचा परिणाम इतका भयानक असेल, तर सामूहिक अजाणपणाचा, अखंड लोकसमुदायाच्या अजाणपणाचा परिणाम किती होत असेल? स्वत्वाच्या जाणिवेबाबत नागरिक अंधारातच राहिले, ही परिस्थिती त्यांच्या वाट्याला येऊ शकते.
image of maharashtra is maligned due to horrible indecent of jalana moral policing
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.