मुंबई

तयारीला लागा ! 'या' दिवशी मुंबईत दाखल होणार पाऊस, हवामान खात्याचा अंदाज...

सकाळवृत्तसेवा

मुंबई- मुंबईकरांसाठी एक गुडन्यूज आहे. गेल्या अनेक दिवसांपासून घामाच्या धारांनी त्रस्त असलेल्या नागरिकांची या त्रासातून सुटका होणार आहे. मुंबईमध्ये पुढच्या आठवड्यात मान्सूनपूर्व सरींचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. 1 जूनला केरळात दाखल होण्याची शक्यता आहे. 8 जूनला राज्याच्या दक्षिण भागात मान्सून प्रवेश करेल आणि 16 तारखेपर्यंत उत्तर भाग व्यापून टाकेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. 

गुरुवारी मुंबईत जाणवलेल्या ढगाळ वातावरणाच्या पार्श्वभूमीवर अनेक अफवा पसरवल्या गेल्य़ा. पश्चिम-मध्य अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. येत्या 48 तासांत याचे तीव्र कमी दाबाच्या पट्ट्यात रूपांतर होईल. त्यानंतर हे क्षेत्र दक्षिण ओमान आणि मध्य येमेनकडे येत्या तीन दिवसांत सरकेल. मात्र, याचा प्रभाव मुंबईच्या किनारपट्टीवर होण्याची शक्यता नसल्याचं हवामान विभागाने स्पष्ट केलंय. या क्षेत्रानंतर 31 मे ते 4 जून यादरम्यान कमी दाबाचा पट्टा तयार होईल.

यापूर्वीचा अंदाज काय होता?

मान्सून दाखल होण्याच्या आणि परतीच्या सर्वसाधारण वेळापत्रकात बदल होत असल्याचं स्कायमेटनं म्हटलं होतं. त्यानुसार, मान्सून कोलकाता आणि मुंबईत 11 जून, तर दिल्लीत 27 जूनला दाखल होईल, असं सांगण्यात आलं होतं. 

आजपासून राज्यातल्या तापमानात घट 

आजपासून राज्यातील तापमानात घट होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. 30 तारखेपासून म्हणजेच उद्यापासून पुढच्या तीन दिवसात राज्यात काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्‍यता आहे. 30 तारखेनंतर मान्सूनपूर्व हालचाली वाढण्याची शक्यता आहे. 

मान्सून 1 जूनला केरळमध्ये

पश्चिमी वाऱ्यांचा प्रभाव आता अधिक तीव्र होत आहे. मान्सूनने गुरुवार, २८ मे रोजी अंदमान-निकोबार बेटे, दक्षिण बंगालचा उपसागर, मालदीव-कोमोरीन क्षेत्राचा काही भाग व्यापला. येत्या 48 तासांमध्ये मालदीव-कोमोरिनचे आणखी काही क्षेत्रही व्यापले जाईल.

अरबी समुद्रामध्ये मान्सूनच्या पुढील प्रगतीसाठी अनुकूल परिस्थिती निर्माण होत आहे. आग्नेय आणि पूर्व-मध्य अरबी समुद्रामध्ये 31 मे ते 4 जून दरम्यान कमी दाबाचा पट्टा तयार होईल. यामुळे केरळमध्ये 1 जूनला मान्सून दाखल होण्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे. 

असा असेल यंदाचा पाऊस, हवामान विभागाचा अंदाज 

यावर्षी सरासरी इतका पाऊस पडणार असून जून ते सप्टेंबर महिन्यात सरासरीच्या 96 ते 100 टक्के पाऊस पडणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे. एप्रिल महिन्यात आयएमडीने यंदाच्या मान्सूनबाबत पहिला अंदाज व्यक्त केला होता. त्यानुसार यंदा मान्सून सामान्य राहणार आहे. यंदा पाऊस सरासरीच्या 100 टक्के पाऊस होईल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला. 

भारतात सामान्यत: जून महिन्याच्या मध्यात मान्सूनची सुरुवात होते आणि ऑगस्ट महिन्याच्या शेवटी आणि सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीला मान्सून परततो. यंदा पाऊसमान सामान्य राहण्याची शक्यता 21 टक्के आहे तर सामन्यापेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता 20 टक्के आहे. मान्सून 1 जूनच्या आसपास केरळच्या तिरुअनंतपूरममधून आगमन करेल, असाही अंदाज IMD ने आधीच वर्तवला आहे. मात्र यामध्ये 3 ते 7 दिवस पुढे-मागे होऊ शकतात, असेही संकेत आहेत.

IMD predicts monsoon date for mumbai mumbaikar get ready for monsoon 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sunil Tingre: शरद पवार ईडीला घाबरले नाहीत, तुमच्या नोटिशीला काय घाबरणार! सुप्रिया सुळेंचा टिंगरेंना टोला

DY Chandrachud: सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांचा कार्यकाळ अखेर संपला! ‘या’ महत्वाच्या खटल्यांवर दिले निर्णय

Latest Maharashtra News Updates: दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचा एका क्लिकवर....

Vadgaon Sheri News : पोर्शे अपघात प्रकरणी टिंगरेंनी दिली शरद पवार यांना नोटीस - सुप्रिया सुळे

Sakal Natya Mahotsav 2024 : संकर्षण कऱ्हाडे यांच्या उत्तमोत्तम नाटकांची रसिकांना मेजवानी १५ ते १७ नोव्हेंबरला

SCROLL FOR NEXT