मुंबई

शेतकऱ्यांसाठी 10 हजार कोटींचे पॅकेज ; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची घोषणा

तुषार सोनवणे

मुंबई - राज्य मंत्रीमंडळाची महत्वाची बैठक आज पार पडली. या बैठकीत राज्यातील अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत देण्याविषयी चर्चा करण्यात आली. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या मदतीसाठी 10 हजार कोटी रुपयांची मदत जाहीर करण्यात आल्याची माहिती दिली.

महत्वाचे मुद्दे : 

  • अतिवृष्टी, पूरग्रस्तांसाठी 10 हजार कोटीची मदत 
  • शेती, फळपिकांसाठी हेक्टरी वाढीव मदत 
  • एकूण केंद्राकडून येणं 38 हजार कोटी रुपये आहे पण मिळालेले नाहीत. 
  • अद्यापपर्यंत पूर, अतिवृष्टीसंदर्भात केंद्राचे पथक पाहणीसाठी आलेले नाही. आम्ही दोन तीनदा विनंती केली आहे 
  • या आपत्तीत 10 हजार कोटी रुपये मदत देण्याचे निश्चित केले आहे. यात रस्त्यांची दुरुस्ती, शेतजमिनीची दुरुस्ती व इतर नुकसान भरपाईचा समावेश आहे 
  • दिवाळीपर्यंत ही मदत दिली जाईल
  • पैशाची ओढाताण आहे, पण शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही हा आमचा शब्द आहे 
  • जिरायत, बागायत जमिनीसाठी 6800 प्रति हेक्टर ही केंद्राची मदत अपुरी आहे त्यामुळे आम्ही ती प्रति हेक्टरी 10 हजार दोन हेक्टरच्या मर्यादेत देणार आहे 
  • फळपिकांसाठी 18,000 रुपये प्रति हेक्टर ऐवजी 25 हजार रुपये प्रति हेक्टर मदत दिली जाईल

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अतिवृष्टीग्रस्त भागातील दौरा केला होता. त्यावेळी त्यांनी शेतकऱ्यांना येत्या काही दोन तीन दिवसात मदत देण्याचे जाहीर केले होते. आजच्या मंत्रीमंडळातील बैठकीत उच्च अधिकारी आणि मंत्र्यांनी घेतलेल्या नुकसान आढाव्यावर चर्चा करण्यात आली. याबाबत मुख्यमंत्री ठाकरे यांनी म्हटले आहे की, राज्यातील शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या नुकसानामुळे मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागते. त्यावेळी सरकारने त्यांच्या पाठीशी भक्कम पणे उभे राहणे गरजेचे असते. महाविकास आघाडीने सरकार स्थापन झाल्यापासून वेगवेगळ्या नैसर्गिक आपत्तीच्या वेळी नागरीकांना मदत केली आहे. शेतकऱ्यांची कर्जमाफी धरून हा आकडा 30 हजार कोटींच्या वर असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

केंद्र सरकारकूडन मुख्य येणे बाकी असेलेल्या रकमेबाबत मुख्यमंत्री म्हणाले की, नैसर्गिक चक्रीवादळाच्या मदतीची 1 हजार कोटी रुपये केंद्राकडून येणे बाकी आहे. पुर्व विदर्भात आलेल्या पूरामुळे केंद्राकडे 800 कोटींची मागणी करण्यात आली होती. तीही अद्याप राज्याकडे आलेली नाही. एकंदरीत राज्याला केंद्र सरकारडून 38 हजार कोटी रुपये येणे बाकी आहे. राज्यात कोरोनाचे संकट कायम आहे. त्यात राज्यात गेल्या 1 वर्षात नैसर्गिक आपत्तीमुळे मोठे नुकसान झाले आहे. राज्यासमोरच्या अनेक अडचणींवर मात करीत आपण मार्ग काढत आहोत. त्यामुळे सध्याच्या नुकसानीचा विचार करता नागरीकांना  म्हणून 10 हजार कोटींची तातडीची मदत जाहीर करीत आहोत असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे. मदतीची रक्कम दिवाळीच्या आधीपर्यंत शेतकऱ्यांपर्यंत पोहचवली जाईल असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे

Immediate package of Rs 10,000 crore for affected farmers Announcement by Chief Minister Uddhav Thackeray

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL Auction 2025 मधून तब्बल १००० खेळाडूंचा पत्ता कट; आता २०४ जागांसाठी ५७४ खेळाडू रिंगणात; जाणून घ्या तपशील

School Holiday: शाळांना ‘इलेक्शन डे’ सह तीन दिवस खरंच सुट्टीए का? शिक्षण आयुक्तांचं स्पष्टीकरण

Karad South Assembly Election : देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर माफी मागावी, अन्यथा त्यांना कराड तालुक्यात पाऊल ठेवून देणार नाही - शिवराज मोरे

SA vs IND 4th T20I: सूर्याने जिंकला टॉस! मालिका विजयासाठी टीम इंडिया, तर द. आफ्रिका बरोबरीसाठी सज्ज; पाहा Playing XI

Assembly Elections: 'एम' फॅक्टरचा कौल MVAच्या बाजूने, सर्वात मोठ्या संघटनेच्या पाठिंब्यानं बळ वाढलं, महायुतीला टेन्शन

SCROLL FOR NEXT