मुंबई: हिवाळ्यात होणाऱ्या वातावरणाच्या बदलामुळे मुंबईकरांना सध्या सर्दी, खोकला आणि तापाचे रुग्ण वाढले आहेत. शिवाय, काही दिवसांपूर्वी मुंबईच्या सकाळी लागणारी थंडी, दुपारी अचानक वाढणारं ऊन आणि पुन्हा संध्याकाळी जाणवणारी थंड हवा यामुळे मुंबईकरांना सर्दी, तापाने त्रासलं आहे. नाकातून पाणी येणे, घसा खवखवणं, त्यातून डोकेदुखी, शिवाय श्वसनाचा होणारा त्रास असे आजार मुंबईकरांना होत आहेत.
अशाच वेगवेगळ्या तक्रारी घेऊन मुंबईच्या पालिकेच्या रुग्णालयात रुग्णांची मोठ्या प्रमाणात गर्दी वाढत आहे. पालिकेच्या नायर रुग्णालयात थंडी सुरु झाल्यापासून दररोज तापाचे 150 हून अधिक रुग्ण ओपीडीत दाखल होत आहेत.
नायर रुग्णालयातून मिळालेल्या आकडेवारीनुसार, 10 ते 16 जानेवारी या काळात तापाचे एकूण 22 जणांना रुग्णालयात दाखल करुन उपचार करावे लागले. शिवाय, मलेरियाचा 1, 2 डेंग्यू आणि 1 लेप्टोस्पायरोसिस या आजारांचे एकूण चार रुग्ण दाखल झाले होते.
मलेरियाचे 4 मृत्यू
दरम्यान, मलेरियामुळे या कालावधीत 4 जणांचा मृत्यू झाला आहे. तर लेप्टोस्पायरोसिस या आजारांनी ग्रस्त असलेल्या एका रुग्णाला आपला जीव गमावावा लागला. असे एकूण 5 जणांचे मृत्यू झाले आहेत. सर्वाधिक ओपीडीत तापाचे 944 रुग्ण दाखल झाले होते.
थंडीची सुरुवात झाल्यानंतर विषाणूजन्य आजार होण्याची शक्यता वाढते. श्वसनमार्गाच्या वेगवेगळ्या प्रकारच्या तक्रारी असलेल्या व्यक्तींना हा बदल मानवत नाही, याकडे वैद्यकीय तज्ज्ञ लक्ष वेधतात. त्यामुळे अनेकदा दिवाळीनंतर वाढलेल्या प्रदूषणामुळे डॉक्टर्स तोंडाला रुमाल किंवा स्कार्फ बांधून बाहेर फिरण्याचा सल्ला देतात.
याविषयी जनरल फिजिशियन डॉ. मधुकर गायकवाड यांनी दिलेल्या माहितीनुसार, "हिवाळ्यात खरंतर लोकं बाहेर फिरायला जातात. त्यामुळे त्यांना वातावरणात झालेल्या बदलांचा फरक जाणवतो. शिवाय, आता थंडी सुरू झाली आहे. त्यामुळे वातावरणात असलेल्या विषाणूंचा आपल्या श्वसनमार्गिकेवर परिणाम जाणवतो. त्यातून सर्दी, दमा किंवा श्वसनाचा त्रास जाणवू शकतो. बाहेर जाताना विशेषत: लहान मुलांची काळजी घेतली पाहिजे. बाहेरुन आल्या आल्या लगेचच थंडी पाणी पिणं टाळलं पाहिजे. त्याचा परिणाम आपल्या शरीरावर होतो. हिवाळ्यात मोठ्या प्रमाणात वातावरणात धूळीचे कण जमा होतात. त्याचा ही परिणाम सर्दी, खोकला मग दमा, पडसं असे आजार होतात.''
रोगप्रतिकारशक्ती कमी असलेली लहान मुले, ज्येष्ठ नागरिक, गरोदर महिला यांनाही हा त्रास जाणवतो. थंडी सुरू झाल्यामुळे खोकला तसेच घसादुखी या आजारांकडे सहज दुर्लक्ष केले जाते. त्यामुळे प्रतिजैविकांचा वापर होतो. घरगुती औषधे न करता डॉक्टरांकडे जायला हवे, असा सल्ला डॉ.गायकवाड देतात.
याविषयी नायर रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. रमेश भारमल यांनी सांगितले की, "सर्दी , खोकला किंवा श्वसन विकार असणारे रुग्ण नेहमीच येतात. पण, अनेकदा थंडी सुरू झाली की, तापाचे रुग्ण वाढले आहेत. सर्दी, खोकला हा आजार धुळीच्या कणापासून होणारा आहे. त्यामुळे घराबाहेर पडताना विशेष काळजी घेणं महत्त्वाचं आहे. तरी, दिवसाला रोजचे 150 हून अधिक रुग्ण तापाचे असतात. पाच जणांचा मलेरिया आणि लेप्टोस्पायरोसिसमुळे मृत्यू झाला आहे.
--------------------------------------
(संपादन- पूजा विचारे)
Impact of climate change on health Increased in patients with cold fever
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.