मुंबई, ता. 12ः लाॅकडाऊन मधील कालावधीमध्ये नागरीकांची गर्दी टाळण्यासाठी डिलीवरी बाॅयच्या सहाय्याने गुरूवार (ता.14) पासून घरपोच मद्यविक्री सुरू करण्यात येणार होती. मात्र, मद्य विक्रेत्यांना डिलीवरी बाॅयची नियुक्ती आणि त्यांची वैद्यकीय तपासणी करून उत्पादन शुल्क विभागाकडून ओळख पत्र देण्यासाठी एक दिवसाची मुभा दिली आहे. त्यामूळे शुक्रवार (ता.15) पासून घरपोच मद्य विक्रीच्या आदेशाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.
राज्यात शासनाने महाराष्ट्र दारू बंदी अधिनयम 1949 च्या कलम 139 अंतर्गत होम डिलीवरी आॅफ लिकर विक्रीला मंगळवारी (ता.12)परवानगी दिली आहे. यामध्ये देशी वगळता भारतीय बनावटीचे विदेशी मद्य, बियर, सोम्य मद्य, वाईन ची सेवा घरपोच मिळणार आहे. त्यासाठी मद्य विक्रेत्यांच्या मोबाईल क्रमांकावर फोनद्वारे मद्याची मागणी करता येणार आहे.
एका दुकानदाराला सुमारे 10 डिलीवरी बाॅय नियुक्त करता येणार आहे. घरपोच मद्य विक्रीची सेवा फक्त मद्य परवाना धारकांनाच मिळणार आहे. ज्यांच्याकडे हा परवाना नाही त्यांनी https://stateexcise.maharashtra.gov.in किंवा https://exciseservices.mahaonline.gov.in या वेब साईटवरून ऑनलाईन मद्य परवाना मिळवता येणार आहे.
स्थानिक पातळीवर जिल्हाधिकाऱ्यांनी निश्चित करून दिलेल्या वेळेतच ही घरपोच मद्य विक्री करता येणार असून,चंद्रपुर , गडचिरोली, या कोरड्या जिल्ह्यासाठी व वर्धा जिल्ह्यातील परवाना धारकांसाठी हे आदेश लागू नसणार आहे.
असे असतील नियम
घरपोच मद्यविक्रीत अतिरीक्त वाढ नाही
घरपोच मद्यविक्रीची सेवा देतांना डिलीवरी बाॅयने ग्राहकांकडून कॅश किंवा डेबीट, क्रेडीट कार्डने स्वाईप मशिनच्या माध्यमातून पैसे घेता येणार आहे. तर यामध्ये छापील किरकोळ विक्री किंमत एमआरपी किंमत घेणेच बंधनकारक आहे. घरपोच मद्यसेवेसाठी कोणतेही अतिरीक्त शुल्क किंवा सेवा शुल्क आकारण्यात येऊ नये
डिलीवरी बाॅयसाठी बंधनकारक नियम
implementation online ordering and home delivery of liquor will start form 15th may
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.