मुंबई: मुंबई महानगरपालिका (BMC) तसेच शिवसेनेचे नेते मंत्री आदित्य ठाकरे यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या कोस्टल रोडचं (coastal road) काम सध्या वेगाने सुरू आहे या कोस्टल रोडच्या कामामध्ये मोठ्या प्रमाणात समुद्रात भराव टाकला जात आहे. त्यामुळे वरळीसह (worli) मुंबईतील अनेक ठिकाणी पावसात पाणी तुंबणार असल्याची माहिती स्वतः मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर (kishori pednekar) यांनी दिली आहे. (In rainy season water logging at mumbai for two to three hours mayor kishori pednekar)
मागील वर्षी पावसात मुंबई त्याचप्रमाणे वरळी समुद्रकिनाऱ्यावर अनेक वस्त्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी शिरलं होतं. त्यानंतर मुंबई महानगरपालिकेवर मोठ्या प्रमाणात टीकाही झाली. मात्र आता पुढल्या वर्षी मुंबईत पाणी साठणार नाही अशी ग्वाही मागच्या वर्षी महापौरांनी त्याचप्रमाणे मुंबई महानगरपालिकेच्या अनेक महत्त्वाच्या अधिकाऱ्याने देखील दिली होती.
पण सध्या कोस्टल रोडच्या कामामध्ये ज्या पद्धतीचा भराव टाकला जातो आहे, ते पाहता यंदा ही मुंबईची तुंबापुरी होणार असल्याचं महापौरांनी स्वतः सांगितलं. शिवाय मुसळधार पावसामध्ये भरतीच्या वेळेस मुंबईत तीन तास पाणी साठणार असल्याचं स्पष्ट मतही महापौरांनी व्यक्त करून दाखवलं.
वरळी परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात लोकवस्ती आहे. बैठ्या चाळीत राहणाऱ्यांची संख्या देखील बरीच आहे. अशातच हाकेच्या अंतरावर सुरू असलेल्या कोस्टल रोडच्या कामासाठी समुद्रात टाकलेल्या भरावामुळे यंदाही अनेकांच्या घरी पाणी शिरण्याची शक्यता नाकारू शकत नाही. त्यामुळे मुंबईकरांनो यंदाही सावधान... कारण पावसात पुन्हा मुंबई तुंबई होण्यासाठी सज्ज झाली आहे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.